गीत भावानुवाद २ : इलाही मेरा जी आए....

Submitted by saakshi on 5 December, 2014 - 08:35

माणसानं आयुष्यभर भटकंच रहावं.
स्वाभाविक आहे की नाही, कोठेतरी सेटल व्हायलाच हवं वै. प्रश्न वेगळेच आहेत. त्यांचा इथे संबंधच नाही. भटकं म्हणजे मनातून भटकं.
नवीन गोष्टी जाणण्यासाठी उत्सुक असलेलं.जगण्यासाठी आसुसलेलं.

शामे मलंग सी
राते सुरंग सी
बागी उडान पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए ...

एखाद्या फकिरासारखं भटकावं. उद्याची चिंता न करता. कुंद संध्याकाळी पायाच्या पोटर्या सुजेपर्यंत आणि धुंद रात्री झोप उडेपर्यंत. दिशा, काळ, वेळ आणि भुकेची तमा न बाळगता.
त्या बंडखोर प्रवासावर मन भाळलेलं.

कल पे सवाल है
जीना फिलहाल है
खानाबदोशियों पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए

नेहमीचीच धावपळ.. पाचवीला पुजलेली. रोजचे हेलपाटे. लोकांनी केलेले झोलझपाटे.
डोक्यात जाणारया गोष्टी. हे सगळं असच चालू राहिलं तर?
जगणं हातातून निसटू देणारे अनेक जण आजूबाजूला. त्यांची मतं.
आपलं स्वच्छंदी मन. त्याची टोचणी, इतरांची बोलणी.
उद्यावर प्रश्नाची चिन्हं.
जगतोच तर आहोत की! आणखी काय असतं जगणं? असा प्रश्न विचारणारे आपलेच?! लोक.
पण त्या भटकेपणावरच मन भाळलेलं.

मेरा फलसफा कंधेपे मेरा बस्ता
चला मै जहाँ ले चला मुझे रस्ता
बूंदों पे नही गहरे समंदर पे
इलाही मेरा जी आए आए

सगळ्या गोष्टी नियोजित करायला लावणार्या जबाबदारया. त्यांच्यात अडकून पडलो तर उठलो आणि निघालो असं सुख कधी मिळणार? रस्ता मिळाला तसं चालत जाणं रादर जिकडे रस्ता नेईल तिकडे जाणं हे जमायला हवं. जमतं का हे कोणाला? की हे काहीना जमणार असं कोणीतरी ठरवलंय पूर्वनियोजितपणे? तो एखादा थेंब मिळाला की समाधानी होणारे आहेतच की मग त्या हजारो थेंबांच्या मालकाची ओढ का? त्या ओढीवर मन भाळलेलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>एखाद्या फकिरासारखं भटकावं. उद्याची चिंता न करता. कुंद संध्याकाळी पायाच्या पोटर्या सुजेपर्यंत आणि धुंद रात्री झोप उडेपर्यंत. दिशा, काळ, वेळ आणि भुकेची तमा न बाळगता.
त्या बंडखोर प्रवासावर मन भाळलेलं.

<<<
+1
I wish..

मस्त. गाणं आवडलंच होतं ललितदेखील आवडलं.

एकदा खरंच अशा सगळ्या काळज्या जबाबदर्‍या टाकून निवांत भटकायचं आहे.

सही ! मस्त लिहिलं आहे. कविता वाचल्याचा फील आला.

हे गाणं आवडतं होतंच पण आता हे ललित - कम - कविता वाचल्यावर जास्तच आवडलं गाणं.

*याच मुवीमधलं 'कबीरा' पण असंच अर्थपुर्ण आहे. लिरिक आणि म्युझिक दोनीही अप्रतिम.

सर्वांना खूप खूप धन्यवाद Happy
*याच मुवीमधलं 'कबीरा' पण असंच अर्थपुर्ण आहे. लिरिक आणि म्युझिक दोनीही अप्रतिम.>>>> या गाण्याबद्दल काय बोलावं? अप्रतिम गाणं आहे.

ये जवानी है दिवानी .. ओह्के.. थोडेफार तसे वाटलेलेच.. नवीन गाणी निसटतात हल्ली माझ्याकडून.. ऐकून बघेन नक्की आता.. धन्यवाद जिज्ञासा !

गाणं आवडलंच होतं ललितदेखील आवडलं. एकदा खरंच अशा सगळ्या काळज्या जबाबदर्‍या टाकून निवांत भटकायचं आहे. >> +११

*याच मुवीमधलं 'कबीरा' पण असंच अर्थपुर्ण आहे. लिरिक आणि म्युझिक दोनीही अप्रतिम.>> यावरही वाचायला आवडेल तुमच्याकडून

गाणं आवडलंच होतं ललितदेखील आवडलं. एकदा खरंच अशा सगळ्या काळज्या जबाबदर्‍या टाकून निवांत भटकायचं आहे.>>+१००
हे गाणे अर्जीत सिंग ने गायले आहे . चित्रपटाच्या शेवटीही हे गाणे जेव्हा वाजते तेव्हाचे म्युझिक जाम मस्त आहे. Happy

*याच मुवीमधलं 'कबीरा' पण असंच अर्थपुर्ण आहे. लिरिक आणि म्युझिक दोनीही अप्रतिम.>> यावरही वाचायला आवडेल तुमच्याकडून>>>>>>>.कबीरा वर लिहायचा प्रयत्न केला आहे Happy नक्की वाचा.

छान! Happy

Pages