३ डिसेंबर २०६४ सालच्या बातम्या:
१. अपघाताच्या वेळी पै. सलमान खान ह्या जुन्या पिढीतील गाजलेल्या अभिनेत्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता असे १०३ वर्षीय साक्षीदार अबक ह्यांनी सांगितले. बावीस वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली साक्ष आज त्यांनी स्वतःच अश्या प्रकारे नाकारली व त्यामुळे खटल्याला एक वेगळेच वळण लागलेले आहे.
२. प्रगत राष्ट्र कसे असते हे पाहण्यासाठी भारतात आलेले अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या भेटीच्या समारोपानिमित्त भारतीय पंतप्रधानांची वॉशिंग्टन येथे भेट घेणार आहेत. ह्या भेटीची तारीख कोणती ठेवावी त्याचा आदेश मिळावा अशी विनंती भारतीय पंतप्रधानांच्या मंगळ येथील कायमस्वरूपी निवासस्थानी पाठवण्यात आलेली आहे.
३. सचिन तेंडुलकर ह्यांना आकाशगंगा-रत्न हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मुंबईत लहानशी दंगल! ह्या विषयावर फेसबूकवर एका मिनिटाला सोळा अब्ज पोस्ट्स पडत असल्यामुळे फेसबूकचे नांव मेसबूक ठेवावे असा प्रस्ताव विचाराधीन!
४. भारतात पेट्रोलचे दर तीन रुपयांनी कमी झाले. आजपासून पेट्रोल फक्त ५६७६८ रुपये लिटर भावाने मिळणार!
५. शरद पवार साहेबांनी ध्येयवादी काँग्रेस नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
६. बोफोर्स घोटाळ्यातील चर्चेला नवीन हादरा! तोफा उडतच नाहीत हे आज समजले.
७. रामपालबाबांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्यात १७१ जवान ठार!
८. भारत हा काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री ह्यांचे प्रतिपादन!
९. होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेला अजून फक्त सहा आठवड्यांची परवानगी.
१०. कौन बनेगा अरबपती ह्या मालिकेच्या शीर्षकावर अरबस्तानाकडून हरकत घेण्यात आली.
११. मॅच फिक्सिंगचा एकही आरोप नसल्यास संघात प्रवेश मिळणार नाही - बी सी सी आय चा खणखणीत इशारा!
१२. गोपिका पदूकोण (पौराणिक अभिनेत्री दीपिका पदूकोण ह्यांची खापरनात) हिला पहिलाच ब्रेक शाहरुख खानबरोबर! लता मंगेशकरांच्या आवाजातील सहा गीते तिच्यावर चित्रीत!
१३. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एकही अपघात न झाल्याच्या तीव्र धक्क्याने तिघांचा टीव्ही बघताना घरातच मृत्यू!
१४. यंदा पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक ८६ तासात आटोपली.
१५. दहशतवाद संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध - केंद्रीय संरक्षणमंत्री आसाराम बापू
१६. काळा पैसा लवकरच देशात परत आणू - स्विस सरकारचे स्विस जनतेला आश्वासन!
१७. येत्या फेब्रुवारीत पुण्यात हेल्मेटसक्तीचा आणखी एक प्रयत्न करून पाहणार
१८. अनेक वर्षांनी नवज्योत सिद्धू खर्या विनोदावर हासले. अर्चना पूरणसिंग ह्यांना हे ऐकून तीव्र धक्का बसला.
१९. भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांबरोबर पाक सैनिकांचे तुंबळ युद्ध! भारतीय सेनेने व्हिडिओ घेतले.
२०. 'कुछ तो गडबड है दया' हे वाक्य म्हणण्याचा अधिकार आता खर्या सी आय डी अधिकार्यांनाही मिळणार!
======================
-'बेफिकीर'!
'ड्यु आय डी गंभीरतेने घेणारा
'ड्यु आय डी गंभीरतेने घेणारा आय डी' पुरस्कार गा मा पैलवान ह्यांना देण्यात येत आहे.
बेफिकीर, स्वत:चे सगळेच्या
बेफिकीर,
स्वत:चे सगळेच्या सगळे डुआयडी शोधून त्यांची जन्म, मृत्यू, वय, नावे, इत्यादि माहिती संगतवार लावून प्रकाशित केल्याबद्दल जामोप्या यांचा भव्य सत्कार आणि सोबत अतिभव्य माबो गटग आयोजित. त्यावेळी जोरदार गटगचर्चाही झाली. तिचा निष्कर्ष : जामोप्यांची इतकी तोतयानामे झालीयेत की लोकं त्यांना मूळ नावानेच ओळखू लागलेत. याबद्दल त्यांचा आजून एक भव्य सत्कार भविष्यात आयोजित करायचे बेत ठरले.
आ.न.,
-गा.पै.
सगळेच बेफीSSSS
सगळेच
बेफीSSSS
मस्त.......
मस्त.......
मस्त.....
मस्त.....
खुप हसलो . . . . . . .
खुप हसलो . . . . . . .
मस्त जमलयं.
मस्त जमलयं.
सही!!!
सही!!!
(No subject)
अनु. क्र. ११ विशेष आवडले.
अनु. क्र. ११ विशेष आवडले.
बी सी सी आय म्हणजे बॅचलर्स कम्युनिटी कंट्रोलर ऑफ इंडीया का ?
तुफान तुफान तुफान हसलो
तुफान तुफान तुफान हसलो


बेफिकीर यांचे खुमासदार लिखाण हल्ली दिसत नाही. त्यांचा एक प्रवासवर्णन आणि त्यावरील माबोकरांच्या प्रतिक्रिया असा लेख सुद्धा असाच भन्नाट आहे
खुप हसले.....
खुप हसले.....
अॅग्रीड!
अॅग्रीड!
मज्जा वाटली वाचून....
मज्जा वाटली वाचून....
अण्णा हजारेंचं ५००० वे आंदोलन आज दिल्लीत पार पडणार ...
बाबा रामदेवांचा १००००० व योग कार्यक्रम पाहण्यास शरदजी पवार साहेब खुद्द पावसात भिजताना दिसले.
मी पुन्हा येईन या घोषणेचा वर्धापन दिन ...
संजय राऊतांची पाकिस्तान आणि चीन मध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा.
Pages