३ डिसेंबर २०६४ सालच्या बातम्या:
१. अपघाताच्या वेळी पै. सलमान खान ह्या जुन्या पिढीतील गाजलेल्या अभिनेत्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता असे १०३ वर्षीय साक्षीदार अबक ह्यांनी सांगितले. बावीस वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली साक्ष आज त्यांनी स्वतःच अश्या प्रकारे नाकारली व त्यामुळे खटल्याला एक वेगळेच वळण लागलेले आहे.
२. प्रगत राष्ट्र कसे असते हे पाहण्यासाठी भारतात आलेले अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या भेटीच्या समारोपानिमित्त भारतीय पंतप्रधानांची वॉशिंग्टन येथे भेट घेणार आहेत. ह्या भेटीची तारीख कोणती ठेवावी त्याचा आदेश मिळावा अशी विनंती भारतीय पंतप्रधानांच्या मंगळ येथील कायमस्वरूपी निवासस्थानी पाठवण्यात आलेली आहे.
३. सचिन तेंडुलकर ह्यांना आकाशगंगा-रत्न हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मुंबईत लहानशी दंगल! ह्या विषयावर फेसबूकवर एका मिनिटाला सोळा अब्ज पोस्ट्स पडत असल्यामुळे फेसबूकचे नांव मेसबूक ठेवावे असा प्रस्ताव विचाराधीन!
४. भारतात पेट्रोलचे दर तीन रुपयांनी कमी झाले. आजपासून पेट्रोल फक्त ५६७६८ रुपये लिटर भावाने मिळणार!
५. शरद पवार साहेबांनी ध्येयवादी काँग्रेस नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
६. बोफोर्स घोटाळ्यातील चर्चेला नवीन हादरा! तोफा उडतच नाहीत हे आज समजले.
७. रामपालबाबांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्यात १७१ जवान ठार!
८. भारत हा काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री ह्यांचे प्रतिपादन!
९. होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेला अजून फक्त सहा आठवड्यांची परवानगी.
१०. कौन बनेगा अरबपती ह्या मालिकेच्या शीर्षकावर अरबस्तानाकडून हरकत घेण्यात आली.
११. मॅच फिक्सिंगचा एकही आरोप नसल्यास संघात प्रवेश मिळणार नाही - बी सी सी आय चा खणखणीत इशारा!
१२. गोपिका पदूकोण (पौराणिक अभिनेत्री दीपिका पदूकोण ह्यांची खापरनात) हिला पहिलाच ब्रेक शाहरुख खानबरोबर! लता मंगेशकरांच्या आवाजातील सहा गीते तिच्यावर चित्रीत!
१३. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एकही अपघात न झाल्याच्या तीव्र धक्क्याने तिघांचा टीव्ही बघताना घरातच मृत्यू!
१४. यंदा पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक ८६ तासात आटोपली.
१५. दहशतवाद संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध - केंद्रीय संरक्षणमंत्री आसाराम बापू
१६. काळा पैसा लवकरच देशात परत आणू - स्विस सरकारचे स्विस जनतेला आश्वासन!
१७. येत्या फेब्रुवारीत पुण्यात हेल्मेटसक्तीचा आणखी एक प्रयत्न करून पाहणार
१८. अनेक वर्षांनी नवज्योत सिद्धू खर्या विनोदावर हासले. अर्चना पूरणसिंग ह्यांना हे ऐकून तीव्र धक्का बसला.
१९. भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांबरोबर पाक सैनिकांचे तुंबळ युद्ध! भारतीय सेनेने व्हिडिओ घेतले.
२०. 'कुछ तो गडबड है दया' हे वाक्य म्हणण्याचा अधिकार आता खर्या सी आय डी अधिकार्यांनाही मिळणार!
======================
-'बेफिकीर'!
:ड
:ड
अजुन एक राहुल गांधी- ह्म क्या
अजुन एक
राहुल गांधी- ह्म क्या करना चाहते है- woman empowerment
(No subject)
१४.व्या ठळक बातम्यांत "फक्त"
१४.व्या ठळक बातम्यांत "फक्त" हा शब्द विसरलांत काय?
१४. यंदा पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक "फक्त" ८६ तासात आटोपली.
मेसबूक दीपिका पदूकोण ह्यांची
मेसबूक
दीपिका पदूकोण ह्यांची खापरनात << दिपिकाला पट्कन कामाला लागल पाहिजे :))
<< होणार सून मी ह्या घरची
<< होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेला अजून फक्त सहा आठवड्यांची परवानगी.>> <<अनेक वर्षांनी नवज्योत सिद्धू खर्या विनोदावर हासले>>
शिवाय, ' प्रदीर्घ वाटाघाटींनंतर आज महाराष्ट्रात २० मित्रपक्षांचं संमिश्र सरकार स्थापन होण्याचं निश्चित ! दर तीन महिन्यानी मुख्यमंत्रीपद चिठ्या काढून प्रत्येक मित्रपक्षाला !!! '
पण नवजोत आणि अर्चना इतकी वर्ष
पण नवजोत आणि अर्चना इतकी वर्ष जगतील का? त्यांचे नातू पणतू तरी म्हणायचं.
आगामी चित्रपटात आमिर खान
आगामी चित्रपटात आमिर खान साकारत असलेल्या शाळकरी मुलाचा लुक युट्युबवरुन रीलीज करण्यात आला.
.l मंजो व पैलवान यांचे
.l मंजो व पैलवान यांचे प्रत्येकी एक हजार आयडी झाल्याने दोघांचा सहस्त्र आय डी दर्शन सोहळा लंडनमध्ये दिमाखात संपन्न .
अरबी समुद्रात शिवाजी
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारकाची जागा परत बदलली. पर्यावरण खात्याकडुन हिरवा कंदील.
जैतापुर प्रकल्प होउ देणार नाही अशी ग्वाही शिवसेनाचे कार्यअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांना दिली.
कोकणाचा कॅलिफोर्निया बरोबर लॉसअँजल देखील बनवुन दाखवु आणि आमच्या पित्याचे स्वप्न साकार करु :- राणेबंधु.
महाराष्ट्र भारनियमनमुक्त बनवु :- प्रियांका गांधीच्या भावाची घोषणा.
१३. मुंबई-पुणे एक्स्प्रेस
१३. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एकही अपघात न झाल्याच्या तीव्र धक्क्याने तिघांचा टीव्ही बघताना घरातच मृत्यू!
१४. यंदा पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक ८६ तासात आटोपली.
१५. दहशतवाद संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध - केंद्रीय संरक्षणमंत्री आसाराम बापू
१६. काळा पैसा लवकरच देशात परत आणू - स्विस सरकारचे स्विस जनतेला आश्वासन!
१७. येत्या फेब्रुवारीत पुण्यात हेल्मेटसक्तीचा आणखी एक प्रयत्न करून पाहणार
१८. अनेक वर्षांनी नवज्योत सिद्धू खर्या विनोदावर हासले. अर्चना पूरणसिंग ह्यांना हे ऐकून तीव्र धक्का बसला.
१९. भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांबरोबर पाक सैनिकांचे तुंबळ युद्ध! भारतीय सेनेने व्हिडिओ घेतले.
२०. 'कुछ तो गडबड है दया' हे वाक्य म्हणण्याचा अधिकार आता खर्या सी आय डी अधिकार्यांनाही मिळणार!
जामोप्या व पैलवान यांचे प्रत्येकी एक हजार आयडी झाल्याने दोघांचा सहस्त्र आय डी दर्शन सोहळा लंडनमध्ये दिमाखात संपन्न.>>>>>:हहगलो:
भयानक आहे रे बाबा, खूप हसले.
भयानक आहे रे बाबा, खूप हसले.:हाहा:
मस्त! ६. बोफोर्स घोटाळ्यातील
मस्त!
६. बोफोर्स घोटाळ्यातील चर्चेला नवीन हादरा! तोफा उडतच नाहीत हे आज समजले. >>>> उडतात बरं का!
८. भारत हा काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री ह्यांचे प्रतिपादन! >>>> बोचर्या विनोदाचं उत्तम उदाहरण
१९. भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांबरोबर पाक सैनिकांचे तुंबळ युद्ध! भारतीय सेनेने व्हिडिओ घेतले. >>>>> "मेरे चोरीके इलाकेमें दुसरा चोर?" असं म्हणत लढा म्हणावं आपापसात. नंतर उरले सुरले सैनिक तुमच्या आपापल्या देशात पाठवून देऊ.
बरं त्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याला अख्ख्या माबोला बोलावणार का? तूला कश्याने करणार? तिकडे पण ह्यांच्या तूलेसाठी समोरासमोर तागड्या बांधल्या असतील तर बाजूच्या पारड्यातली वस्तू काढून एकमेकांवर फेकून मारतील. काही विधी असतील तर लिंबूटिंबू आहेच.
:हहगलो:
तूला कश्याने करणार? तिकडे पण
तूला कश्याने करणार? तिकडे पण ह्यांच्या तूलेसाठी समोरासमोर तागड्या बांधल्या असतील तर बाजूच्या पारड्यातली वस्तू काढून एकमेकांवर फेकून मारतील>>>>नाही, त्याना जर तुलेत ( पारड्यात ) बसवले ना तर सीसॉच करायचा. मग एक वर गेला की दुसरा त्याला मारु नाही शकणार.:खोखो:
मायकल जॅक्सन देखील माहीका लाल
मायकल जॅक्सन देखील माहीका लाल जय किशन होता म्हणे
त्याच्या खर्या आईचे नाव माहिमा सगळेजण त्याला लाडाने माही का लाल म्हणत असत. आणि त्याच नाव जयकिशन म्हणुन माही का लाल जयकिशन असे म्हणत होते. त्याचा लहानपणीचा नाच बघुन काही लोकांनी त्याला फितवुन आपल्याकडे नेले आणि तिथुन निर्माण झाला मायकल जॅक्सन : असा महत्वाचा दावा एका स्वामीने केलेला आहे 
तिकडे पण ह्यांच्या तूलेसाठी
तिकडे पण ह्यांच्या तूलेसाठी समोरासमोर तागड्या बांधल्या असतील तर बाजूच्या पारड्यातली वस्तू काढून एकमेकांवर फेकून मारतील<<<
बेफिकीरजी, २०६४च्या एका
बेफिकीरजी, २०६४च्या एका छोट्या बातमीचा समावेश करायचा राहीला असावा - ' प्रदीर्घ संशोधनाचा खळबळजनक निष्कर्ष - पुरूषाना जात्याच विनोदबुद्धी स्त्रीयांपेक्षां कमी असते ! '
(No subject)
चांगले आहेत. काही वयामुळी
भाऊ, तुम्ही ही चित्रं
भाऊ, तुम्ही ही चित्रं पेंटमध्येच काढता? कसले भन्नाट अविर्भाव असतात ह्या पात्रांच्या चेहर्यावर!
नाही, त्याना जर तुलेत (
नाही, त्याना जर तुलेत ( पारड्यात ) बसवले ना तर सीसॉच करायचा. मग एक वर गेला की दुसरा त्याला मारु नाही शकणार.खो खो>>>> रश्मी, अधुनमधुन ह्याला वर आणि त्याला खाली करावंच लागेल. नाहीतर बॅलन्स धरणार्यांवरच टीका होईल. आणि दोघेही कंटाळतील एकाच लेव्हलवर बसून. ते वर खाली करताना एका पॉइंटला दोघे सेम लेव्हलला येतील तेव्हा नक्की तुंबळ युद्ध.
अश्विनी. बॅलन्स होईल ना.
अश्विनी.:हाहा: बॅलन्स होईल ना. एकाच्या बाजूला त्याचे पाठीराखे आणी दुसर्याच्या बाजूला त्याचे. लय मज्जा येईल. नन्तर पाठी राख्याना पण पारड्यात बसण्याची सन्धी द्यायची. तेवढाच झोक्याचा आनन्द.:फिदी:
भाऊ.:हाहा:
(No subject)
सगळंच
सगळंच
छान
छान
रिया, तू असशील या बातम्या
रिया, तू असशील या बातम्या बघायला
हां ! खरच की तायडे, पण
हां ! खरच की
तायडे, पण आजकालची जीवनशैली बघता काही सांगता येत नाही.
सगळेच
सगळेच

काउ, >> मंजो व पैलवान यांचे
काउ,
>> मंजो व पैलवान यांचे प्रत्येकी एक हजार आयडी झाल्याने दोघांचा सहस्त्र आय डी दर्शन सोहळा लंडनमध्ये दिमाखात
>> संपन्न .
आमच्या खूऽऽऽऽऽऽऽप आधी तुमचा नंबर आहे म्हंटलं! अगोदर स्वत:चे डुआयडी शोधून काढा!
आ.न.,
-गा.पै.
Pages