नेपाळ हत्याकांड - ५००० ठार

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2014 - 05:22

जर हा मृतांचा आकडा मनुष्यवधाचा नसून पशूवधाचा आहे हे बघून आपल्याला दिलासा वाटला असेल तर हा धागा आपल्यासाठी नाही.

..............

नेपाळमधील पारंपरिक 'पशुबळी उत्सवात' तब्बल ५००० म्हशींची नृशंस कत्तल करण्यात आली.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/gadhimai-hindu-festival-over-50...

५००० हा आकडा केवळ म्हशींचा आहे, पण कोंबड्या-बकर्‍या हिशोबाते घेता हा आकडा पाच लाखांवर आहे.

नेपाळमध्ये देवीच्या यात्रेत ५ लाख जिवांची कुर्बानी
http://www.lokmat.com/storypage.php?catid=3&newsid=3760801

...............

स्वत:च्या मांसाहाराचे समर्थन करताना मी कित्येकदा अनिष्ठ प्रथांच्या नावाखाली मारल्या जाणार्‍या पशूंचे उदाहरण देतो.
पण हा आकडा मलाही हादरवून गेला. याचा एखादा एवढा मोठा उत्सव कसा काय होऊ शकतो.
बरे ही एखादी गावकुसात होणारी छोटीमोठी जत्रा नाही जिच्यामागे काही स्थानिक अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धा असते जी प्रामुख्याने अशिक्षितेतून आली असते. तर हा आकडाच पुरेसा बोलका आहे.

माझ्या, "या धाग्यावर" मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणाला देता आली नाही. पण ईथे तरी नक्की द्या.

नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापले जाणारे पशू खाद्य म्हणून वापरले जात नसतील. वा थोडेफार कोणी खातही असले तरी कोणताही मांसाहारी मनुष्य या प्रकारे आणि या कारणासाठी ते जीव घेण्याचा आग्रह धरणार नाही.

मग या हत्याकांडाला जबाबदार नक्की कोण?

बेकायदेशीर कृत्याला जर परंपरा व प्रथांची आणि धर्मिक भावनांची जोड दिली तर त्या कृत्यावर कारवाई अशक्यच नाही का! थोडक्यात नैतिकतेच्या निकषावर पुन्हा एकदा कायदा गंडला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Why am I not surprised to see another thread with a you-know-what bashing agenda! Enjoy!! Happy

कोकणस्थ, अ‍ॅज आय माय ईंग्लिश इज नॉट टू गूड दॅट्स सो व्हाय आय डिडंन्ट गेट व्हॉट यू वॉन्ट टू से, सो प्लीज कॅन यू पुट युआर व्हॅल्युएबल थॉट्स इन मायबोलीज ऑफिशिल लॅनगवेज Happy

भारतात ईदच्या वेळी दरवर्षी कापल्या जाणार्‍या जनावरांची आकडेवारी गोळा करता का?
म्हणजे तुलनेस जास्तं सोपं जाईल.

ह्म्म्म्म हादरवणारे, सुन्न करणारे, बेशुद्ध करणारे हत्याकांड Sad
भारतात ऋषी मुनींनी लोकांना मांसाहारापासुन परावृत्त करून शाकाहाराकडे वळविण्यासाठी फार प्रयत्न केले होते. पण ना रहे वो ऋषी और ना रहे उनके प्रयत्नों का फल Sad

ह्यातील म्हशींना हत्येच्या आधी बरेच दिवस उपाशी व पाण्याशिवाय ठेवले जाते. हा सरळ सरळ अ‍ॅनिमल अ‍ॅब्युज आहे . पेटा ह्या बद्दल आवाज उठवत आहे. ह्या क्रूर प्रथेचा निषेध. मी पेटिशन साइन करणार आहे.

जपान मध्ये शास्त्रीय संशोधनाच्या नावाखाली सील्स ची हत्या होते. ट्रॉफी हंटिंग ह्या नावाखाली स्पेशली
शिकारीसाठीच वाढवलेल्या गेम अ‍ॅनिमल्स म्हणजे सिंह वगिअरेंची हत्या होते व फेसबुकवर अभिमानाने फोटो शेअर केले जातात. ह्याचाही निषेध.

अधिक माहितीसाठी पेटाची वेबसाइट/ फेसबुक पेज बघा.

<<भारतात ऋषी मुनींनी लोकांना मांसाहारापासुन परावृत्त करून शाकाहाराकडे वळविण्यासाठी फार प्रयत्न केले होते.>>>

याला काही आधार?

आधी धाग्याचे नाव वाचुन दचकले, की पेपरमध्ये काहीच नाही, मग इथे हे नवीन काय? मला वाटल की ते पिचपिचे चिनी, नेपाळमध्ये घुसले आणी त्यानी काही उपद्व्याप केले.:अओ:

स्पार्टाकस,
अमुकने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू शकतो याला काही अर्थ नाही.
ईथे या धाग्याला धर्माचा रंग देण्याचीही इच्छा नाही.
पण शाकाहारात सात्विकता आणि धार्मिकता शोधणारा समाज याचे कुठल्याही प्रकारे समर्थन नाही करू शकत.

बाकी मी स्वता मांसाहारी आहे, नुसता मांसाहारी नाही तर मांसाहारीप्रेमी आहे. त्यामुळे मला कोणताही आव आणायचा नाहीये. पण याचा अर्थ मी असल्या मेळाव्यांचा/प्रथांचा विरोध करू शकत नाही असेही नाही.

नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी "धार्मिक रंग" देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
काही प्रतिसादानंतर हीच कलाकार मंडळी धार्मिक बाब धाग्यावर आणली म्हणुन इतरांवर आरोप लावताना दिसतील.

बाकी चालु द्या

ऋन्मेष,

तुम्हाला बहुतेक माझा प्रश्न कळला नसावा अशी शंका येते. मी स्वत:ही मांसाहारी आहे आणि मला मांसाहार मनापासून आवडतोदेखील.

तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने नेपाळ आणि भारत यात किती पशूंची हत्या केली जाते याचे आकडे मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि भारतात सर्वात जास्त जनावरांचे बळी ईदच्या दिवशी दिले जातात म्हणून मी ईदचा उल्लेख केला. धार्मिक रंग देण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, पण ज्यांचं अस्तित्वच असल्या वाद-विवादांवर आणि खुस्पटं काढण्यावर अवलंबून आहे, त्यांना सांगून काही उपयोग नाही.

ईथे या धाग्याला धर्माचा रंग देण्याचीही इच्छा नाही. >> >> ओह रिअली? Lol

मग यालाही विरोध करा. किती ती नासाडी:

(१) La Tomatina, Buñol, Valencia, Spain Tomato Festival in Spain

FestivalTomato.jpg

(२) Battle of the Oranges

FestivalOrange.jpg

(३) World Peashooting Championships, Witcham, Cambridgeshire, England

(४) La Raima, Pobla del Duc, near Valencia, Spain - द्राक्षांची नासाडी

FestivalGrapes.jpg

(५) Clean Monday Flour War, Greece

http://www.georgegeorgiou.net/gallery.php?ProjectID=167

FestivalFlour.jpg

(६) Songkran, Bangkok, Bongkok, Thailand Water Festival
The annual Songkran Festival in Thailand is the world’s biggest water fight. Hundreds of locals and tourists grab their Super Soakers, fill up, take aim and fire at all and everyone… repeatedly.

FestivalWater.jpg(कोण रे ते कोरडी होळी साजरी करा म्हणतंय?) Proud

(७) Custard Pie Championship, Kent, England
Pass by Coxheath near Maidstone on a weekend in May and you’ll see teams of people covered in the specially made floury mixture. A direct hit to the face scores you maximum points and judges can also award points for the most original or amusing throwing technique too.

FestivalPie.jpg

(८) 31 डिसेंबर जवळच आहे. मध्यरात्री भयानक फटाके फोडले जातील. या वेळी सगळ्या भारतवर्षात दिवाळीच्या चार दिवसात जितके फटाके फोडले जातात त्याच्या कैकपटीने जगभरात फटाके उडवले जातात. आणि शोभेच्या फटाक्यांनी प्रदूषण अधिक होते. त्या प्रदूषणालाही विरोध करा. नवा धागाच काढा बरं का. "न्यु इअरचे फटाका प्रदूषण".

(९) बकरी इदचा उल्लेख करणार होतो, पण वर स्पार्टाकस यांनी तो मुद्दा मांडलाच आहे.

कायेना, विरोध करायचा तर सगळ्यालाच करा. कसें?

जबरदस्त....काय प्रतिसाद आहे वाहवा....बोलती बंद केली जोशींनी सगळ्यांची....

कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या म्हशींना कित्येक किमी चालवत नेले जाते, अनेक जनावरे तिथे पोहचेपर्यंत अर्धमेली झालेली असतात...त्यांना मारणारे कसाई हे कसबी नसल्यामुळे ही जनावरे कित्येक तास प्रचंड वेदनांनी तडफडत राहतात आणि शेवटी रक्तस्त्रावाने मरतात...कित्येकांचे मांस खाण्यालायक नसते ते टाकून देतात

पण म्हणून काय झाले..टोमॅटोंना काय भावना नसतात का...कसली ही क्रुर माणसे..सरळ झाडावरून तोडलेले टोमॅटो फेकून मारतात एकमेकांना....

तिच गोष्ट पाण्याची...भारतात इतकी पाणीटंचाई आहे..लोकांना हंडेच्या हंडे डोक्यावरून वाहून आणावे लागतात आणि दुसर्या देशात हे खुशाल पाण्याची नासा़डी करतात. किती तो स्वार्थीपणा...तुमच्या देशात पाणी आहे म्हणून वा़ट्टेल ते करतात ही कृतघ्न माणसे...

जोशी मी सहमत आहे तुमच्याशी....मी तर म्हणतो नेपाळच्या धर्तीवर आता भारतातही हे बलीदान सोहळ्याचे आयोजन केले पाहिजे. शेवटी आपल्या थोर पारंपारिक संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे. त्याला विरोध केला तर हिंदुत्ववाद्यांच्या भावना दुखावतील ना....

त्यामुळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

सहमतीबद्दल धन्यवाद Wink
चला म्हणजे शाकाहारी (फळ, गव्हाचे पीठ, इत्यादींची) नासाडी योग्य आहे तर. Proud

नुसती नासाडी नाय करायची काय...त्या टोमॅटोंना अर्धवट चिरून टाकून द्यायचे..दुखु देत जरा त्यांना पण...आजकाल जो पण उठतो तो प्राण्यांच्या बद्दल बोलतो. आपल्या भाज्यांवर वर्षानुवर्षे इतके अत्याचार चाललेत त्याविरुद्ध कुणी आवाज उठवला का...
सगळे असेच हो भोंदू...फुकटचा कळवळा यांना

विरोध सर्वांचाच करावा.

...

अगदी सहमत कोकणस्थ... पण आधी तुम्ही तसा धागा तरी काढा.

म्हशीच्या धाग्यातच तुमचे टाम्याटु कशाला ? दुसरा धागा काढा.

मांसाहाराला विरोध करण्याचे श्रेय जैन आणि बौद्ध्ह लोकाना जाते. उगाच ऋशीमुनींच्या नावने विमाने उडवु नयेत.

बरोबर माझ्या भावना आपल्याबरोबर सदैव आहेत आशुचँप
एक वळवळणारी चळवळ उभीच राहिली पाहिजे

नेपाळात केल्या जाणार्या या कत्तलिबदल इथे निषेध करुन किन्वा इतर काहीही करुन काय उप्योग?? अर्थात हिंदु धर्माला झोडपण्यासाठी याचा उत्तम उपयोग करता येईल. पण कत्तलीवर बंदी घालण्यासाठी किंवा इतर काही उपाय करण्यासाठी आपण काहीच करु शकत नाहि. मायबोलीवर अतिशय निरोगी, संयत अशी चर्चा करुन असल्या प्रथेविरुद्ध जनमत तयार करता येईल पण मुळात ज्यांच्यापर्यंत हे विरोधी जनमत पोचायला हवे ते नेपाळी मराठी मायबोली वाचण्याची शक्यता शुन्य आहे, त्यामुळे माबोकरांच्या या समाजसेवेवर पाणीच पडणार आहे.

कोकणस्थ, ट्रस्ट मी!!
अन्नधान्यांना पायाखाली तुडवले जाणार्‍या प्रकाराच्या मी देखील विरोधातच आहे. किंबहुना अन्न ज्या ताटातून खातो त्या रिकाम्या ताटाला जरी पाय लागला तरी लगेच आपण पाया पडतो हे आपले संस्कार असताना ते साहजिकच आहे.

पाण्याची नाशाडी म्हणाल तर येस, दुष्काळात जेव्हा आसाराम बापूंनी पाण्याची नाशाडी केली आणि वर मी माझ्या दैवी सामर्थ्याने पाऊस पाडू शकतो अश्या वल्गनाही केल्या तेव्हा त्या ही डोक्यात गेल्या होत्या.

फरक ईतकाच तेव्हा मी मायबोलीवर नव्हतो अन्यथा पिसे उपटली असती.

मात्र तेव्हाही मी धागा काढला असता तर आपणच पुन्हा ती पहिलीच ईंग्लिश पोस्ट (जी माझ्या डोक्यावरून गेली ती) टाकली असती.
जर तुम्हाला या कत्तलीत जरा जरी चुकीचे आहे असे वाटत असेल तर याचा निषेध करणार्‍यांना विरोध करू नका.

या प्रकाराची चर्चा जगभरच्या प्रसारमाध्यमांतून चालली आहे. मायबोलीवरच का नको?

प्राणी-मित्र संघटनांच्या प्रयत्नामु़ळे २००९ च्या तुलनेत (२००० म्हशी आणि दोन लाखांहून अधिक बकर्‍या हा तेव्हाचा आकडा) संख्या खाली आली आहे.
या उत्सवा(?)साठी जाणार्‍यांत मोठ्या संख्येने भारतीय भाविक असतात.
या उत्सवासाठी भारतातूनही पशू पाठवले जात असत त्यासाठी यंदा सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. भारतातून जिवंत पशूंच्या निर्यातीवर कायद्याने बंदी आहे.

जर तुम्हाला या कत्तलीत जरा जरी चुकीचे आहे असे वाटत असेल तर याचा निषेध करणार्‍यांना विरोध करू नका.>>

सहमत. मात्र सिलेक्टिव्ह निषेध हा वाईटच. Happy

स्पेनला टोमॅटो निर्यात होतात का भारतातून?
असल्यास त्यालाही बंदी घाला.

मागे कुठल्याश्या सिनेमात पाहून लोक हे टोमॅटोचं वेड बंगळुरातपण सुरू करू पहात होते. सूज्ञ लोक वेळीच सावध झाल्याने या प्रकाराला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळेच दुसर्या देशांच्या बर्यावाईट प्रथांबद्दल आपण मराठीत आणि मायबोलीवरही चर्चा करण्यास हरकत नाही आपल्याकडे अश्या प्रथा त्यामुळे नाकारता येऊ शकतात.

(पण वेगळा धागा काढा बुवा , इथे म्हशींत मध्येच टोमॅटो नकोत)

कोकणस्थ आणि स्पार्टाकस , तुम्ही बकरी ईदसाठी वेगळा धागा काढलात तर आम्ही तिथे तुम्हाला अनुमोदन देवू.

पण मुळात ज्यांच्यापर्यंत हे विरोधी जनमत पोचायला हवे ते नेपाळी मराठी मायबोली वाचण्याची शक्यता शुन्य आहे, त्यामुळे माबोकरांच्या या समाजसेवेवर पाणीच पडणार आहे.

साधनातैई - इथल्या चर्चा पंतप्रधान मोदी, राहूल गांधी किंवा गेला बाजार उद्धव ठाकरे वाचतात असा तुमचा समज आहे का काय...कारण ज्यांची चर्चा सुरु आहे त्यांच्यापर्यंत त्याची माहीती गेली तरच धागा काढण्यात अर्थ असेल तर माबोवरचे निम्म्याहून अधिक धागे बंद पडतील....हे तुम्हाला अनुमोदन देणाऱ्या जोशी यांना समजाऊन सांगणार का??

आशुचँप,
मोदी, राहुल इ. लोक इथले धागे नसतील वाचत पण त्यांचे पीआरओज नक्कीच वाचत असतील.
पॉलिटिशीयन्स, पॉलिसीमेकर्स शक्यतो एक टीम ठेवतातच जनमानसाचा अंदाज घ्यायला . पूर्वी वर्तमानपत्रे/टिव्ही इ. सोर्देस होते, आत्ता अश्या सोशल साईटस, फेसबुक , ट्विटर इ. आहेत.(कुणास ठाऊक इथे माबोवरही काही डायरेक्ट ऑब्जर्वर असतील - माबोचा व्याप इतका मोठा झालाय की मध्यमवर्गीय मराठी मनाचा आढावा इथे आल्यास सहज घेता येतो)
बाकी देशांचे पॉलोटिकल लीडरही जगात आपल्याबद्दल आणि आपल्या देशाबद्दल जगात काय प्रतिमा आहेत हेपण जगभरच्या प्रसारमाध्यमांचा आढावा घेऊन ठरवतच असतात.
(पूर्वी लोकमत इतक्या सहज व्यक्तं होत नसे किंवा पॉलिटिशीयन्सनी दखल नाही घेतली तर त्याचे परिणाम मतपेटीतून दिसत नसत. आत्ता मात्रं लोकमानसाची दखल घेणे नेत्यांना/पॉलिसीमेकर्सना भाग आहे.)

मी अजून तरी याच्याशी सहमत नाही. इथल्या चर्चेचा जरा देखील परिणाम होत असता तर होसुमियाघ किंवा जुयेरेगा सुधरल्या असत्या..:)
.त्यामुळे इथली चर्चा माबोकर सोडून कुणी वाचत असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहचत असेल ही शक्यता शून्य आहे...
बाकी राजकारणी म्हणालात तर माबो काय एका शहरापुरती नाही आणि कुठलाही अनुभवी राजकारणी मध्यमवर्गीय मराठी माणसाकडे ढुंकुनही बघत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांना माहीती आहे हे लोक नुसतेच बोल बोल बोलणार आणि मतदानाच्या दिवशी सहलीला जाणार...
त्यामुळे पहारा असू दे वा घुमजाव हे सर्वस्वी स्वांतसुखाय (बरोबर आहे ना हा शब्द) असल्याची धारणा ठेवावी हे उत्तम...

Pages