ज्ञानेश्वरांच्या चरित्रविषयक मतभेद

Submitted by मी मी on 29 November, 2014 - 12:20

संतसाहित्य वाचत आहे सध्या. आपल्याच संस्कृती बद्दल बऱ्याच गोष्टी नव्याने कळत आहेत विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांबद्दल वाचतांना विश्वास बसू नये अश्या काही बाबी वाचनात आल्यात. त्यांच्या ज्ञानेश्वरी बद्दलही अनेक वादंग आहेत त्यावर सांगोपांग चर्चा झाल्या आहेत आणि संशोधन सुद्धा सुरु आहे. काही शंका आणि तर्कांचे प्रमाण मिळालेत काहींचे नाही पण धूर उठलाय तर कुठेतरी काहीतरी आहे हे नक्की … त्यातले काही मुद्दे खाली मांडते … जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
१) ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडाचे कर्तृत्व आणि गुणं ज्या पद्धतीने प्रसिद्धीस आले ते पाहता हा कल्पनाविलास असावा असा अंदाज बोलला जात आहे. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांचे भक्तिमार्ग आणि वैराग्यकाळ बघता त्यांना बरच ज्ञान प्राप्त झालं असावं आणि 'ज्ञानेश्वरी' हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ असावा आणि ज्ञानेश्वर हे त्यातले एक चरित्रात्मक पात्र असावं …. असा एक तर्क संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांमध्ये बोलला जात आहे. इतर संतांच्या अभंगांमध्ये एक दोन संशयित ओव्या आहेत त्याचे पुरावे मात्र सढळ असे नाहीत.
२) ज्ञानेश्वरी लिहिणारे आपेगावचे ज्ञानदेव वेगळे आणि भक्तीमार्गी चौदाव्या शतकातील आळंदीचे ज्ञानदेव वेगळे असावे या दोघांनी लिहिलेले साहित्य भिन्न आहेत … हा तर्क वेगवेगळ्या साहित्याची शैली, शब्दांची ढब भिन्न असल्याने मांडला गेला आहे.
३) निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता हि सन्यासांची नावे वाटतात किंवा वैराग्य स्वीकारल्या नंतरची नावे वाटतात म्हणजे मग त्यांची जन्मानंतरची खरी नावे वेगळी असावी असाही एक तर्क बोलल्या गेला.
४) ज्ञानदेवादी भावंडांच्या जन्माकाळाबद्दल देखील वादंग आहे. नैतिक मार्गाचा अवलंब करून सामाजिक कार्य करू शकत असतांना देखील त्यांनी आयुष्याच्या केवळ एकेविसाव्या वर्षी संजीवनी समाधी का घ्यावी ? हा आणखी एक भेडसावणारा प्रश्न आहे.
यातील किती प्रश्नांची उत्तर मिळतील माहिती नाही मात्र हे ऐकून जिज्ञासा जागृत झाली आहे. याबद्दल कोणतीही माहिती मिळणार असेल किंवा वैचारिक चर्चा संभाव असेल तर नक्की करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे संवादाहून वादच जास्त दिसला …. मी आधीपासून सांगितले आहे मी माझी आग्रही भूमिका मांडली नाहीये. मी वर मुद्दे मांडले म्हणजे मला ते मान्य आहे आणि मी तीच भूमिका घेऊन इथे आलेय असा अर्थ काढू नये हे मी आधीच सांगितले आहे. ज्ञानेश्वरांच्या वाचनातून सकारात्मक जे जे काही वाचले ते पटणार नाही असे नव्हतेच म्हणून ते इथे मांडण्याच औचित्य वाटले नाही. जे लिहिलेय ते पटवून घ्यावे कि नाही हा द्वंद्व माझ्याही मनात आहे. मला कुठेतरी ते मांडून माझ्या मनातल्या शंका माझी जिज्ञासा शमवायची होती … म्हणून मी ते इथे मांडले आहे. आणि हा विषय इथे मांडू नये हा नियम असेल अस वाटत नाही.
कोणी काय लिहावं किंवा असेच लिहावे हेच लिहावे असे बोलण्याला अर्थ नाही ज्यांना ह्या विषयात रस नाही त्यांनी ज्या विषयात रस आहे तिकडे जाण्यास फ्री आहेत. मी कुणालाही आग्रह करत नाहीये. वर मी सर्वांशी व्यवस्थित बोलले आहे कुठेही कुणाला उगाचच उद्धट बोलले नाहीये. ज्यांच्याशी (एकीशीच) सडेतोड बोलले आहे त्यांना त्यांच्याच भाषेचे ते उत्तर होते. चांगल बोला वागा चांगलाच प्रतिसाद मिळेल. जो बोवोगे वही पाओगे (ज्ञानदेवांनी पण तसं सांगितलंय Lol ) ) लक्षात असू द्या.
जाणकारांना मात्र रिक्वेस्ट आहे योग्य तो प्रकाश टाकावा… माझी भूमिका समजून घेतलेल्या मित्रांना धन्यवाद

वरती कोणीतरी मुद्देसूद काही प्रश्न उपस्थित केले आहे …. म्हणजे ज्ञानदेव नव्हतेच असे मानले तर नावांचा प्रश्न उद्भवत नाही असे काहीतरी >>>>> वर धाग्यात लिहिलेले प्रश्न वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या काळात, वेगळ्या परिस्थितीतून मांडले आहेत म्हणजे पहिला मुद्दा मांडला त्याला तिसर्या मुद्द्याचा संदर्भ नसेल किंवा असेल तरी ज्याने त्याने त्यांचे मुद्दे मांडलेत. आपल्याला देखील हे सर्व मुद्दे सेपरेट चर्चायचे आहे. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्याला काहीही अर्थ नाही.>>>
ते मुद्दे मीच मांडले होते

वर धाग्यात लिहिलेले प्रश्न वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या काळात, वेगळ्या परिस्थितीतून मांडले आहेत
>> हे संदर्भ देता आले तर प्लीज द्या. म्हणजे, एखादे पुस्तक, संशोधक इ इ,

संदर्भ फेसबुकचे असतील तर नाही दिले तरी चालतील

वाचनात आलेल्या शंका मांडल्याने लगेच ज्ञानदेवाबद्दलचे लोकांचे मत बदलणार आणि आजपासून त्यांना लोकं शंकेच्या नजरेने पाहू लागणार अस काही होत असतं का ?? एका पोस्ट ने मत कायम होत असेल तर खोडून काढणाऱ्या एखाद्या प्रतिक्रियेने ते मोडीत पण निघत असेल ना ??

मित्रांनो आपण लगेच इथे काही निष्कर्ष काढून निष्पन्न काढायला काहीतरी फळ लाभ घ्यायला चर्चा करत नाहीये …. चर्चेतून काय निष्पन्न होणार हे विचार्नार्यांची पण कमाल वाटली … चर्चा मंडळी म्हणून नव्या गोष्टी काळात नाहीये एका मुद्द्याने जरी ज्ञान वाढत असेल तर पुरे नाहीये का ?? कि अश्या चर्चा करायच्याच कशाला निव्वळ एंटरटेन व्हायलाच इथे यायचं??

इतरांच माहिती नाही पण मला त्याचा फायदा होणार आहे माझ्या अभ्यासासाठी आणि लगेच आज नसले तरी चांगल्या मुद्द्यांची मदत पुढे आणखीही कुणाला होऊ शकेन. वादच घातला तर काहीच शक्य नाही.

चिखलु पान एक वर प्रतिक्रियांमध्ये मी काही लेखमाला आणि पुस्तकांबद्दल लिहिलंय. संशोधकांची नावं लिहिली आहेत. ते संदर्भ तुम्ही ताडून बघू शकता कोणत्याही ग्रंथालयात ते उपलब्ध होऊ शकतील कदाचित.

इथे चर्चा उघडून काहीच निष्पन्न होणार नाही. तुमच्या स्वतःकडे काही वेगळी माहिती, असलेल्या माहितीचे वेगळ्या पण तर्कसुसंगत दृष्टीकोनातून नवीन विश्लेषण असं काही असेल तर उपयोग आहे.>>>>>> वरदा ताई तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणून तुम्ही म्हणताय काहीतरी नवीन मांडा. माझ्यासाठी तर हेच नवीन आणि शॉकिंग आहे. निष्पन्न काय होणार हे पूर्ण चर्चा झाल्यावरच कळेल अस वाटतं.

इब्लिस,

ता.क.
दाभोळकरांचा व फलज्योतिषावर विश्वास नव्हता, असेही यातून दिसून येते. (हे लिहायचे राहिले होते)

म्हणुन मी फलज्योतिष शिकलो आणि माझा हे शास्त्र आहे यावर विश्वास आहे.

मा. डॉ दाभोळकर कधी कधी चर्चा भलत्याच टोकाला न्यायचे हे सांगण्यासाठी ते वाक्य तसेच्या तसे लिहले आहे. वास्तविक हे पत्र मी त्यांच्याच पुस्तकातील वाक्याला अनुसरुन लिहले होते. यावर त्यांनी काही काही शास्त्रीय विधानातुन हे कसे अशक्य आहे हे लिहणे मला अपेक्षीत होते तसे घडले नाही.

असो, त्यांनी केलेल्या बुवाबाजी च्या विरोधातल्या कामाविषयी आदर आहेच तो व्यक्त करुन माझ्या बाजुने ही चर्चा इथेच समाप्त करतो.

<<<<हे विठ्ठलपंत तरी अस्तित्वात होते का? >>>>>>>>>>>>>ज्ञानदेवा ह्यांना माफ करा… ज्या ज्ञान्देवांसाठी हि लोकं इतक्या हिरीरीने भांडताहेत विठ्ठलपंत हे त्यांचे वडील होते हे सुद्धा ह्यांना माहिती नाही … ज्ञादेवांचे वडील अस्तित्वात नव्हते अशी शंका अजूनतरी उपस्थित झाली नव्हती (ती झाली अस समजायला हरकत नाही) हाहा>>>> खरं आहे तुमचं म्हणणं. माफीसाठी ज्ञानदेवांकडे रेकमेंड केल्याबद्दल धन्यवाद Happy

इतिहासातील प्रत्येक व्यक्ती आणि घटना यांचे पुरावे मिळतीलच असे नाही. प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवा किंवा पुरावे द्या ,अन्यथा आम्ही सांगू तो (विकॄत ) इतिहास मान्य करा, असे हल्लीच्या ब्रिगेडी (कथित) विचारजंतांचे म्हणणे असते. तेच मग अशा शंका- कुशंका काढून सूर्यावर थुन्कण्याचे उद्योग करत असतात . >>>>>>>>>>>>>>>>१०००००००००+ अनुमोदन

महाराष्ट्रातल्या देशभक्तांच्याबाबतच्या / संतांच्या चरित्राबाबत शंका उपस्थित करणे यामागे कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. इतर राज्यात अश्या गोष्टी घडत नसाव्यात/ नाहीत.

अगदी १९४७ सालानंतर काळात छ. शिवाजीमहाराजांना वाट चुकलेले देशभक्त संबोधणे किंवा त्यांची संभावना लुटेरे म्हणुन करणे इ. गोष्टी जाणिवपुर्वक केल्या जात आहेत असे मला वाटते. हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांकडुन केले जात होते त्यामागे अनेक कारणे असतील.

आज परिस्थीती अशी आहे की महाराष्ट्रातला समाजच पुरोगामित्व जपण्यासाठी नको त्या वादाला अकारण जन्म देत आहे. यात पाकिस्थानाप्रमाणे पोथीनिष्ठ असायला पाहिजे असे नाही. पण जे वादाचे विषयच नाहीत ते निष्कारण निर्माण होतात. याविरुध्द समाज विघातक कृती असे घोषीत करुन कायदेशीर कारवाई होईल का याची शक्यता तपासुन पहायला हवी.

<< इतर राज्यात अश्या गोष्टी घडत नसाव्यात/ नाहीत. >> मला वाटतं इतर राज्यांतच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र अशा गोष्टी घडतच असाव्यात. शेक्सपियरच्या नांवावरची नाटकं त्याने स्वतः लिहीलीच नव्हती तर कुणाची तरी चोरलेली होतीं, लिंकन हा निग्रोद्वेष्टा होता अशा तथाकथित पुराव्यानिशी आरोप करण्याच्या घटना इतर देशातही होतच असतात. अशा प्रत्येक गोष्टीकडे आपण किती गंभीरपणे पहायचं हें आपणावरच असतं. किंबहुना अशा बर्‍याच प्रकरणात [सर्वच नव्हे] कांहींतरी सनसनाटी लिहून प्रसिद्धी मिळवण्याचीच हांव असते व त्यावर 'दुर्लक्ष करणं' हाच एक जालीम उपाय असावा.

ऋषीचे कूळ अन नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. अन त्याच बेसिसवर विरोध सुरू आहे, पण हे असे म्हणतात, ते का?

अपेक्षाभंगाचे दु:खच होईल असे नसते. अनेकदा अपेक्षाभंगाचा आनंदही होऊ शकतो.

भाऊ नमसकरजी,

मराठी माणसे राजकारणात दिल्लीवाल्यांना भारी पडतात. यासाठी बर्‍याच वेळा शिवाजी महाराजांना विरोध हा अमराठी लोकांनी केलेला मराठी लोकांच्या श्र्ध्देवरचा आघात असतो. महाराजांविषयी श्रध्दा जर जागरुक असतील तर दिल्लीकरांच्या विरोधाची धार तीव्र असेल असा विचार करुन त्यांच्या जन्मतारखे विषयी तर कधी त्यांच्या देशभक्ती विषयी प्रश्न उपस्थीत केले गेले. शेवटचा प्रयत्न पत्रकार खुशवंतसिंगांनी केला. लोकांनी ते मासीक जाळल्यानंतर परत असा प्रयत्न झाला नाही.

राजकारणासाठी मग खास करुन संतांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी आणला. याचाच पदर ओढुन ज्ञानेश्वर महाराजांना बदनाम करण्याचा घाट घातला जातो आहे. ज्ञानेश्वर महाराज मराठीचे आद्य प्रवर्तक आहेत. एकदा त्यांच्या चरीत्रावरुन त्यांना बदनाम केले म्हणजे त्यांच्या कार्यावर शंका उपस्थित होतील. मग पुढे मराठी भाषीकांना आपला आद्य प्रवर्तक कोण याचाही विसर पडेल हा डाव आहे.

दुर्दैव इतकेच की मायबोलीवर मराठी माणसे ह्या डावाला बळी पडली. एका बाजुला ज्ञानेश्वरांचे साहीत्य हे विद्यावाचस्प्ती ( डॉक्टरेट ) च्या प्रबंधाला उपयोगी होत असताना ज्याचा उपयोग नाही अश्या विषयावर चर्चा करत बसणे. विराण्या लिहलेले ज्ञानेश्वर हे कोणी वेगळेच होते हे म्हणणे अर्थ हीन आहे.

वाल्मीकी आधी वाल्या होता म्हणुन रामायणाच्या पठणाने मिळणारा आनंद, शाश्वत जीवनमुल्ये यात काही कमतरता येते का ?

हे असले प्रश्न सामान्य जनाचे बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न असतो. परिणामी संस्क्रुतीच्या मुळशी असलेली श्रध्दा स्थाने डळमळीत होतील की काय अशी भिती ग्रासते म्हणुन मला प्रतिवाद करण्याची इच्छा होते.

>>हे असले प्रश्न सामान्य जनाचे बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न असतो. परिणामी संस्क्रुतीच्या मुळशी असलेली श्रध्दा स्थाने डळमळीत होतील की काय अशी भिती ग्रासते म्हणुन मला प्रतिवाद करण्याची इच्छा होते.

अगदी मनातले बोललात Happy
खरे तर असे हेतूतः बुद्धीभेद करणारे काही असेल तर ते रोखलेच पाहिजे.

<< वाल्मीकी आधी वाल्या होता म्हणुन रामायणाच्या पठणाने मिळणारा आनंद, शाश्वत जीवनमुल्ये यात काही कमतरता येते का ? >> नितीनचंद्रजी, मीं देखील नेमकं हेंच म्हणतोय. फक्त, एखादं संशोधन खोडसाळपणाचं वाटलंच, तर हा एखाद्या कटाचा भाग आहे असं मानून त्यावर तुटून पडण्यापेक्षां 'दुर्लक्ष करणं' हाच उपाय असावा. [मला नाही वाटत अशा तिरसट संशोधनामुळे शेक्सपियरच्या वाचकवर्गात किंवा लिंकनच्या चाहत्यांत तसूभरही फरक पडला असेल]. शिवाय, संशोधनाची खुमखुमी ही निर्हेतूक व निरागसही असूं शकते, हेंही आहेच -

abcde2.JPG

अगदी १९४७ सालानंतर काळात छ. शिवाजीमहाराजांना वाट चुकलेले देशभक्त संबोधणे किंवा त्यांची संभावना लुटेरे म्हणुन करणे इ. गोष्टी जाणिवपुर्वक केल्या जात आहेत असे मला वाटते.

.......

महराष्ट्रच नै नितिन भौ गुजरातचे गांधीजी आणि काश्मिरचे नेहरु यांच्यावरही टीका होतच असते.

<<ऋषीचे कूळ अन नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. अन त्याच बेसिसवर विरोध सुरू आहे, पण हे असे म्हणतात, ते का?

अपेक्षाभंगाचे दु:खच होईल असे नसते. अनेकदा अपेक्षाभंगाचा आनंदही होऊ शकतो.>>+१

ज्याचा उपयोग नाही अश्या विषयावर चर्चा करत बसणे. विराण्या लिहलेले ज्ञानेश्वर हे कोणी वेगळेच होते हे म्हणणे अर्थ हीन आहे.>>

आणि तसे म्हटले गेले नाही तरी 'असा प्रवाद आहे' अशी घाणेरडी मखलाशी केली जातेच जाते.

>>हे असले प्रश्न सामान्य जनाचे बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न असतो. परिणामी संस्क्रुतीच्या मुळशी असलेली श्रध्दा स्थाने डळमळीत होतील की काय अशी भिती ग्रासते म्हणुन मला प्रतिवाद करण्याची इच्छा होते.

+१००००००००००००००००००

<< परिणामी संस्क्रुतीच्या मुळशी असलेली श्रध्दा स्थाने डळमळीत होतील की काय अशी भिती ग्रासते म्हणुन मला प्रतिवाद करण्याची इच्छा होते.>> अशा फुटकळ वावटळी सोडाच पण प्रचंड चक्रीवादळानाही दाद देत नाही हीच तर खर्‍या संस्कृतिची खरी ओळख आहे, असं नाही वाटत ?

>>>> अशा फुटकळ वावटळी सोडाच पण प्रचंड चक्रीवादळानाही दाद देत नाही हीच तर खर्‍या संस्कृतिची खरी ओळख आहे, असं नाही वाटत ? <<<<
भाऊ, तेव्हा तशा खर्‍या संस्कृतीच्या ठाम ओळखीला "अन्धश्रद्ध" ठरविणार्‍या चळवळी अन वळवळी यांनाहि नजरेआड करू नका बर का!

संस्कृतीवरच्या (विशेषतः मराठी) 'खोडसाळ हल्ल्याने' विचलित-व्यथित होणार्‍या आपल्या सर्वांना एकच बाब नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, हे बहुतांशी वाद-विवाद विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाले. आणि यात भाग घेणारे सर्वजण संतसाहित्याचे सश्रद्ध अभ्यासक होते. त्यांच्यामागे राजकारण, ब्रिगेडी-संघिष्ट-कम्युनिष्टी अशा कुठल्याही विचारसरणींनी अवास्तव प्रेरित होऊन हे लेख आलेले नव्हते. याउप्पर शंका असेल तर स्वत: आधी ते लेख वाचा आणि मग अर्थहीन्/घाणेरडी मखलाशी/ खोडसाळपणा/बुद्धीभेद वगैरे शब्दयोजना या वादांसाठी करा.
कृपया. धन्यवाद.

हेमाशेपो.

हो,
बाष्कळ बडबडीचा फुगा अधिकारवाणीने फोडला, की ह्या असल्या कॉमेंट्स जोशींकडून येणारच.

@ जमा...
>>>> माय बाप विठ्ठल. त्याची चार मुले
>>>> संसारातून निवृत्ती मग ज्ञानाच्या सोपानावरून पुढे गेले कि मुक्ती. हे सर्वच एक रूपक आहे असे वाटू लागते. <<<<<

संसारातुन अर्थात सांसारिक मायापाश मोहातून तसेच दैहिक वासनेतुन "ज्ञानाशिवाय" निवृत्ती होऊच शकत नाही, तर ज्ञान आधी हवे ना? पण त्याचबरोबर स्मशानवैराग्यासारखी काही घटनातून्/शारिरिक अनुपलब्धतेमुळे भौतिक घटना/प्रसंगामुळे वा उपजत क्षमतेमुळे (उदा.रामदासस्वामी) वैराग्य अर्थात निवृत्ती आधी आली असेल तरी पुढे जायला, त्या निवृत्तीमुळेचे नि:ष्पन्न शोधायला ज्ञान हवेच ना? म्हणजे निवृत्ती आधी की ज्ञान आधी हा प्रश्न आधी अंडे की आधी कोंबडी या सारखा झाला......
बर कोणीही आधी असो, त्या दोहोंच्यामधेच सोपान हवे ना? ते तिसर्‍या क्रमांकी येऊन कसे चालेल? कारण निवृत्ती व ज्ञान व्यक्तिच्या ठाई एकत्र एकवटले की मुक्ति आपोआपच येते, त्याकरता वेगळ्या सोपानाची गरज नाही. मात्र निव्वळ निवृत्ती वा निव्वळ ज्ञान यांचेदरम्यान सेतू नसेल, तर मात्र पुढील कोणतीच बाब अशक्य.
असो, हे आपले माझे तर्क...
बाकीच्यांचे चालुद्यात.

माफ करा, पण थोडेसे विषयांतर..... द्य्नानेश्वर व समाधी यांचा संबंध आहे म्हणून इथे.
नीट विचार केला तर 'समाधी' घेणे ही आत्महत्याच नाही का?
तसेच 'प्रायोपवेशन', 'संथारा' सुद्धा आत्महत्याच नाहीत का?
सद्ध्याच्या कायद्यानुसार अजून तरी आत्महत्या हा गुन्हा समजला जातो. पण तरीही वरील तिन्ही प्रकारांचे मात्र उदात्तीकरण केलेले आहे..... असे का? हे प्रकार कायद्याच्या कक्षेबाहेरचे का? एखाद्या विधी जाणकाराचे मत जाणून घ्यायला उत्सुक आहे.

<<भाऊ.... खर्‍या संस्कृतीच्या ठाम ओळखीला "अन्धश्रद्ध" ठरविणार्‍या चळवळी अन वळवळी यांनाहि नजरेआड करू नका बर का! >> 'भिंत चालवली', रेड्याकडून वेद वदवले' इ.इ. हा संस्कृतिचा गाभा नसून 'ज्ञानेश्वरी' हाच आहे, असं मला वाटतं. 'अंधश्रद्धा निर्मूलनाचा' रोंख नेमका कशावर आहे, हें जाणूनच तशा चळवळी नजरेआड करायच्या कीं नाहीं हें मीं , तुम्ही व आपण सर्वानीच ठरवायचं आहे.

भाऊ,
झोपल्याला जागे करता येते. या सोंग घेणार्‍यांना जागे करणे अशक्य.
प्राचीन भारतीय सोन्स्क्रूती कित्ती बै ग्रेट, अन सायन्स किती अ‍ॅडव्हान्स्ड असं म्हणणार्‍या खासदारांचे संसदेतले तारे ऐकले नाहीत का तुम्ही?

हे बहुतांशी वाद-विवाद विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाले. आणि यात भाग घेणारे सर्वजण संतसाहित्याचे सश्रद्ध अभ्यासक होते. त्यांच्यामागे राजकारण, ब्रिगेडी-संघिष्ट-कम्युनिष्टी अशा कुठल्याही विचारसरणींनी अवास्तव प्रेरित होऊन हे लेख आलेले नव्हते. >>>> इथेच तर ग्यानबाची मेख आहे. दुर्दैवाने बहुतांश लोकांबद्दल आज अस म्हणता येत नाही ही वस्तुस्थिती नाही का? यू. म . पठाणांसारखे खरे अभ्यासक आज कितीसे दिसतात ?

अरे, भाग्याने भारतात,जन्म लाभलाय, मराठी सारखी सुंदर समृध्द भाषा मायबोली म्हणून लाभली आहे. काही पूर्वजन्मी ची बहुत सुकृताची जोडी असेल म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा होतेय.... अन करतायत काय तर .............. ? Sad

त्या जुन्या काळच्या आदरणीय अभ्यासक लोकांबद्दल नाही लिहित. पण एक विनोद आठवला.
एक भिकारी असतो त्याला एक माणूस विचारतो तुला एक कोटी रुपये मिळाले तर काय करशील ?
तर भिकारी उत्तर देतो की एक शानदार ऑफीस उघडेन, एक झकास पैकी मोटार गाडी घेइन...... त्या गाडीने रोज ऑफीसला जाईन ...... आणि भीक मागेन !

विनोद थोडा चुकीचाच आहे. ज्ञानेश्वरीच मोल रुपयात करता येत नाही.

या तर्‍हेचे वाद निर्माण करण्यासाठी (च) संशोधनाचा आव आणणारे लोक मला त्या भिकार्‍या सारखे वाटतात. हे कुणा एकाला उद्देशून लिहिले नाही. वैयक्तिक पणे घेउन अर्थाचा अनर्थ न व्हावा ही विनंती. ज्ञानेश्वरांबद्दल वाचाव, ज्ञानेश्वरी वाचावी अस वाटतय हेच खर महत्वाच. बाकी वादविवाद काय मायबोलीवर सुरुच असतात.

असो या प्रतिसादात कुणाचा अधिक्षेप घडला असेल, दुखावले असेल तर त्या माउलींनी क्षमा करावी.

आपण फार संशयित झालोत का ??

कुणीतरी काहीतरी बोलतंय, काळजी करतंय, नम्र वागतोय म्हणजे त्यामागे काहीतरी राजकारणच असावं.
प्रवाहाच्या बाहेरचे प्रश्न पडलेत कुणाला हे म्हणजे लक्ष केंद्रित करायला किंवा उगाच वायफळ आहे.
कुणाशी फार चांगले वागू नये डोक्यावर बसतात.
कुणी नुसती फुंक मारली तरी लगेच आपली संस्कृती, धार्मिक परंपरा नेस्तनाभूत होतील.
देवावर कुणी बोट जरी ठेवला तरी एकतर देव कोपेल तरी किंवा श्रद्धा बाटली जाइल.

मी मानते परिस्थितीने कधीतरी असे अनुभव पदरी टाकले असतात पण म्हणून प्रत्येकवेळी तसाच अनुभव येईल अस थोडंच आहे. कदाचित कल्पनेबाहेरच चांगला अनुभव येईल … नवा अनुभव देऊन जाइल.
दुधानं तोंड पोळलय तर ताक सुद्धा फुंकून प्यावं म्हणतात … म्हण आहे तशी … पण खरंच अस वागायला हवंय काय ? ताक फुंकून पितांना आपणच मूर्ख नाही का ठरणार. थोडा अँगल बदलून बघा ना… सतत काय तलवारी उपसून तयार असता. प्रत्येक गोष्टीला गरज नसतांना डीफेन्सीव होणे जरुरी आहे का ?? याशिवाय दुसरा मार्ग नाहीचेय का ??

कुणाला तरी प्रश्नांची उत्तर हवीयेत … आम्हाला उत्तर आलीत तर द्यावीत … नाही आली तर निदान इतरांना देऊ द्यावे … नाही आम्ही तलवार उपसून तयार

कुणाला चर्चा करायचीय…त्यातून जसा होईल तसा अभ्यास होणार हे तो ओरडून सांगतोय…. नाही … आम्ही विश्वास ठेवणार नाही इतरांना ठेवू देणार नाही.

एखाद्याला जेन्युइनलि काहीतरी चांगलं करायचंय … आम्ही ते होऊ देणार नाही. स्वताही ते करणार नाही.

आम्हाला सतत २४/७ डीफेन्सिव राहायला आवडतंय. त्या माझ्या इंसेक्यूरेटीज, माझ्या मनातल्या भीती मी पाळत राहणार आणि परिसरात समाजात देखील पेरत राहणार.

खरतर मला माहिती आहे माझ्या या प्रतिक्रियेवर पूर्वीपेक्षाही जास्त लोकं तुटून पडणार आहेत. मस्करी होईल. मला वेड्यात काढतील. तलवारी निघतील सपासप चालतीलही…चालू द्या … पण दमून थांबलात कि विचार करा यावर एकदा नक्की

Pages