आहे रे नाही रे , हिरावणे आणि तुलना उपदेश या बाबत थोडेसे ...

Submitted by निमिष_सोनार on 28 November, 2014 - 01:20

मला सुचलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला पटले किंवा नाही ते कळवा:

(१) आहे रे आणि नाही रे...!!

(अ) "आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे" - इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय??
(ब) "आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही" - आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका. ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली गेली तर काय कराल??

(२) हिरावून घेणे

तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्ती ची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेते.

(3) तुलना आणि उपदेश:

दोन व्यक्तींमध्ये तुलना करणाऱ्या तुलनाबाज लोकांचा कोणताही उदात्त हेतू कधीच नसतो. तसेच उपदेश करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो. कारण तुलना करून त्या दोन व्यक्तींपैकी कुणीच सुधारत नाही पण त्या दोघांमध्ये द्वेष भावनाच वाढीस लागते. लोक तुलनेतून नाही तर प्रेरणेतून सुधारतात आणि लोक उपदेशातून नाही तर तुम्ही कसे वागता त्या उदाहरणातून शिकतात कारण उपदेश करणारा सुद्धा स्वत: कधीच बिनचूक बागात नाही.
तुलनाबाज लोकांचा हेतू एकच असतो: दोन्ही व्यक्तींची तुलना करून त्या दोघांवर अंकुश ठेवणे. उपदेशबाज लोकांचा एकच हेतू असतो: समोरच्या व्यक्तीच्या सतत चुका काढून उपदेश करून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे आणि त्याचेवर अंकुश ठेवणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) राग, लोभ, मत्सर, द्वेष .. वगैरे या नैसर्गिकरीत्या उपजणार्‍या भावना आहेत. ज्या मनुष्यात या उपजल्या नाहीत तो जगलाच नाही! तर, या मनात येऊच न देणे हे शक्य नाही, तर त्या आल्यावर आपण रिअ‍ॅक्ट कसे करतो हे जास्त महत्वाचे. आणि हे रिअ‍ॅक्शनच खरे तर व्यक्तीव्यक्तींमधील फरक दर्शवून जातो.

२) नियती वगैरे असे काही नसते, हे फक्त मनाचे खेळ आहेत जे समाधान मिळवून देतात. अर्थात कोणाचा यावर ठाम विश्वास असेल तर त्यातून मिळणारे समाधानही फायदेशीरच.

३.अ) तुलनेबाबत सहमत - पण मुळात तुलना करायचा हेतू कधीही त्या दोन व्यक्तींना फायदा व्हावा हा नसतोच.

३.ब) उपदेशबाबत असहमत - उपदेश देणार्‍याच्या हेतूवर शंका घेण्यात काही फारसा फायदा नाही. तसेही कोणाचाही सुप्त हेतू आपण नाही ओळखू शकत. त्यापेक्षा पटेल तेवढे घ्यावे, उरलेले सोडून द्यावे.

>>> कोणत्याही भावना ह्या माणसाला जगायला जास्त लायक बनवीतात... हे एका मानसशात्रच्या पुस्तकात वाचलेले आहे... तेव्हा माणासाने भावना दाबुन फार काहि साध्य होत नाही... पण कोणती भावना किती ताणायची यावर मात्र नियत्रण हवे.