डेंग्युच्या निमीत्ताने - स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचा आरोग्य विभाग

Submitted by नितीनचंद्र on 27 November, 2014 - 07:36

डेंग्युची साथ पसरली आणि रोग निवारणाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाचे नविनच तंत्र उदयास आले की काय असे वाटले.

डेंग्युचे डास म्हणे शुध्द पाण्यात वाढतात. त्यामुळे त्याचा प्रसार हा घरातुनच होतो या अर्ध सत्यावर हे तंत्र आधारीत आहे असे दिसते. याचा अर्थ शुध्द पाणी फक्त घरातच साठवले जाते असे ग्रुहीतक मांडुन त्यावर केंद्रित सर्व उपायोजना दिसतात.

शासनाने असे सामान्य जनतेला सांगीतले की आता आम्ही तुमच्या घरात येऊन पाण्याची तपासणी करणार आहोत. जर घरच्या पाण्यात या डासाच्या अळ्या सापडल्या तर पाच हजार रुपये दंड करण्यात येईल.

शासनाची जबाबदारी आता संपली अश्या थाटात शासन वागत आहे. बहुदा हे डास धुराने मरतच नाहीत असा समज करुन धुर फवारणी ( किमान पिंपरी चिंचवडच्या ब प्रभागात तरी दिसत नाही. )

या मागे धुर्त शासनाचे दोन डाव दिसतात.

१) ज्या घरात डेंग्युचा पेशंट सापडेल त्याच्या घरातले पाणी शोधुन अळ्या मिळोत अथवा ना मिळोत ती जबाबदारी घरच्यांवर टाकायची.

जसे एखाद्या गाडीतला ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत असताना त्याच्या बरोबर इतरांवर दारु पिउन गाडी चालवणार्‍यावर सुध्दा टेस्ट निगेटीव्ह आली असता खटला दाखल करायचा त्यातला प्रकार आहे.

२) आरोग्य विभागावर या काळात दोषारोप होतात आणि यंत्रणा सुसज्ज करावी लागते या त्रासापासुन सुटका होते.

यात हॉस्पीटले आणि पॅथोलोजिस्ट यांची मिलीभगत या आरोग्य खात्याबरोबर आहे की काय असा संशय येतो.

याचे कारण असे की मुळात घरात हे डास येतात कुठुन हा प्रश्न अनुत्तरीत रहातो. अर्थातच सार्वजनिक जागी जिथे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते अश्याच ठिकाणाहुन. यावर नियंत्रणाचे काम पध्दतशीर पणे टाळले जाते. चिंचवडला पवना नदीत हायसिंथ अर्थात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर आहे. महानगरपालिकेने यावर या काळात किंवा वर्षभरात काय केले ह्याचा रिपोर्ट जनतेसमोर आणला पाहिजे.

पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागात या आधीही अनेक वर्षे डेंग्युचे पेशंट सातत्याने सापडत होते. या साठी शासनाने कोणती काळजी घेतली ?

ह्या जलपर्णीच्या बरोबर नदीमध्ये डेंग्युच्या आळ्या नाहीत हे एखाद्या एन जी ओ च्या मदतीने सिध्द केले पाहिजे. मग अचानक सर्व ठिकाणी हे कसे झाले ह्याचा शोध घ्यायला हवा.

एकाच वेळी भारतात सर्वत्र डेंग्यु कसा होतो ? याचे उत्तर शोधले म्हणजे यामागे नेमके काय आणि कोण आहे हे बाहेर येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डासाच्या अळ्या सापडल्या तर जनतेला शिक्षा हे चुकीचेच आहे.

मग पिण्याचे पाणी दुषीत होऊन साथे येतात तेंव्हा शिक्षा कुणाला करायची ?

आणि डेंग्युच्या अळ्या सापडल्या तर शिक्षा ! मालेरियाच्या अळ्या , जंताच्या अळ्या सापडल्या तर ? त्याला का शिक्षा नाही ?

नितिनभौ, अगदी कालच मी विचार करत होतो या विषयावर लिहायचा....
वैतागलोय यांच्या तपासण्यान्ना.... आमच्या गल्लीत दोघातिघान्ना हजार रुपयांचा दंड केला...
बंगलेवाले म्हणून मऊ लागतील तर कोपराने खणायला निघालेत...
प्लेगच्या साथीवेळेस इंग्रज सोजीर पुण्याच्या घराघरात घुसून दहशत पसरवीत जवळपास तशीच दहशत पिंचिमधे पसरली आहे.
पाणी साठवूच नका म्हणे.....
२४ तास पाणी देणार म्हणून इकडे घर घेतले, टाकीही नाही बांधली. आता कसेबसे एकवेळ कमी दाबाने वगैरे येते.
गेल्या निवडणूकीवेळेस म्युन्सिपालिटीच्या एका अधिकार्‍याने नगरसेवकासमक्ष तारे तोडले होते की म्युन्सिपालटी म्हणे जमिनीपासून केवळ काही इंच इतक्या उंचीपर्यंत पोहोचेल इतक्या दाबाने पाणीपुरवठा करायला बांधिल आहे. केवळ एका गावाचे पाणी तोडू ह्या धमकीवरुन गदारोळ झाला, पण आम्ही पाणी (जवळपास) तोडल्याचेच अनुभवलेले आहे.

तर आता त्याचा सूड म्हणून की काय पण डेन्ग्यूचे निमित्त करून छळवाद चालला आहे. आम्हाला सांगितलय की १००० लिटरची जमिनीवरील सिन्टेक्स टाकी रिकामी करून उपडी घालून ठेवा. नाही तर दंड. काय करणार? रविवारी करावे लागेल.

तिकडे मुंबईत म्हणे एका पॉश सोसायटीच्या बिल्डिंगमधे डेन्ग्युच्या अळ्या सापडल्या म्हणून हौसिंग सोसायटीच्या अध्यक्ष व सेक्रेटरीवर गुन्हा दाखल केलाय.

तुमच्या वस्तीत कुणी डेन्ग्यू रुग्ण आढळला तर त्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी सरळ सरळ धमकी दिली जात्ये.

चोर सोडून सन्याश्याला बळी देण्याचा हा प्रकार आहे.

स्वःच्छता, साठलेले पाणी जास्त दिवस राहू न देणे वगैरे बाबी पाळतोच आम्ही, पण म्हणून सर्रास बाथरुममधे बादल्या भरुन ठेवू नका, अमुक इतके लिटर पाणीच वापरा, साठवू नका वगैरे फतवे?

अक्कल गहाण टाकून सरकारी खाक्याने डेन्ग्युची साथ व डेन्ग्युला कारणीभूत डास अशा प्रकारे खरोखरच आटोक्यात येणारेत का? की या डेन्ग्युच्या निमित्ताने विशिष्ट वस्तीतील विशिष्ट नागरिक समुहाला टारगेट करण्याचे होतय ही शंका यायला भरपूर जागा आहे.

अन भयानक दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत / या महिन्याच्या सुरवातीपर्यंत याच सरकारी महानगरपालिका आमच्या इथे डेंग्यूची साथच नाही, हे आकडेवारीनिशी सांगत होत्या, अजुनही सांगत असतील.

स्वच्छतेचा हा अतिरेकी मोगलाई अंमल, लोकांच्या मनात विरोधी मते तयार करून त्याद्वारे मोदीन्च्या स्वच्छतेच्या अभियानाला हरताळ फासण्याकरता व मोदीन्च्या बाबतीत विरोधी जनमतप्रवाह तयार करण्याकरता तर होत नाही ना? कारण नुकत्याच झालेल्या निवडणूकात सत्ताधारी बदलले असले तरी पूर्वाश्रमींची बहुसन्ख्येने असलेली हुकमाची प्यादी आजही आहेत तिथेच आहेत.
असो. येता काळच याचे उत्तर देईल.

याच नगरपालिकांनी बरेच वर्षांपूर्वी झाडांची मोजदाद केली होती व सही घेऊन गेले होते.
झाडान्ना पाणी लागते, व मोरीचे सांडपाणी डायरेक्ट सोडले तर घाण दिसते/होते. म्हणून पाइपाने नळाचे पाणी दरहजारी पैसे मोजून वापरुन झाडे वाढवलीत. आता पाण्याची इतकी बोम्ब की सान्डपाण्यावरच झाडे जगवावी लागतील. झाडांचा गळलेला पाला काढून जाळून टाका अशा सूचना... पण हाच पाला जमिनीत मुरून त्याचेच खत/माती बनते हे कुणी सांगायचे?
पाला जाळला वा त्यावर पाणी तापवले तर धुर होतोय, प्रदुषण होतय(?) म्हणून लोकान्च्या अन यांच्याच तक्रारी.
पाला पडून कचरा(?) होतो, चांगले दिसत नाही म्हणून तक्रारी करणारे नागरीक, व त्या तक्रारी उचलुन धरणारे सरकारी सेवक असल्यावर निरनिराळ्या ठिकाणची झाडे याच कारणाने पण अधिक्रुतरित्या दुसरे कारण दाखवून तोडलेली माहितीत आहेत.
दुसरा प्रकार म्हणजे, वृक्षप्राधिकरण नावालाच आहे, व तुम्हीच लावलेल्या वीस वीस वर्षे वाढविलेल्या झाडाला धोकादायक झाल्यामुळे तोडायची वेळ आली तर मात्र परवानगी करता यांच्याच बोडक्यावर फीया भरायला लागताहेत... तेव्हा लोक मोठी झाडे लावायचीच बंद झालीहेत.

आता मी फक्त वाट बघतोय सरकारी संशोधन प्रतिवृत्ताची की डेन्ग्यूचा डास उत्पत्तीस्थानापासून केवळ इतकेच काही अंतर उडत वा चालत प्रवास करीत असल्याने जिथे डेन्ग्युचा रोगी सापडेल त्याचे आजुबाजुचे तितके मीटर अंतरावरील सर्व निवासी आस्थापनांवर दंड लागेल.

हे आकाशीच्या प्रभू...... आमचे रक्षण कर ! आमेन.

लिंबुभौ ते संशोधन आधीच झालेले आहे.. डास किती दुर किंवा उंच उडतो याचे पुस्तकात वर्णन आहे.. सध्या हा आकडा माझ्या लक्षात नाहि

गप्पी मासे सार्वजनिक तळ्यात हैदत सोडतात.

घरचे फ्लॉवर पॉट , पिण्याच्या पाण्याची टाकी यात गप्पि मासे कसे सोडणार ?

असे खुप प्रश्न अनुत्तरीत आहेत. धन्यवाद, जे प्रश्न मला पडत आहेत ते तुम्हालाही पडत आहेत.

>>> लिंबुभौ ते संशोधन आधीच झालेले आहे.. डास किती दुर किंवा उंच उडतो याचे पुस्तकात वर्णन आहे.. सध्या हा आकडा माझ्या लक्षात नाहि <<<
प्लिज शोधुन सापडेल तेव्हा इथे द्याल का ती माहिती?
त्यातही प्रश्न असा आहे की डासाची उंच वा दूर उडण्याची वैयक्तिक क्षमता हा एक विषय पण वारा/हवेच्या झोताबरोबर तो किती दूर्/उंच जाऊ शकतो ही दुसरी बाब या आकडेवारीत "संशोधली" आहे वा नाही हे तपासायचे आहे.
मी ऑफिसात दुसर्‍यामजल्यावर बसतो, तिथेही टेबलखाली मला डास चावत असतात, व आख्ख्या बिल्डिंगमधे डासांचे उत्पत्ती स्थान नाही. तेव्हा दुसर्‍या मजल्यावर हा डास कसा आला? बरे लिफ्टही नाहीये हो बिल्डिंगला म्हण्जे लिफ्टमधे बसुन नै आला.

लिंबुजी,

वार्‍याच्या झोताबरोबर डास कितीही उंचीवर जाउ शकत असेल याबाबत शंका नाही.

आम्ही पण पिं चिं नगरपालिकेतच >>आम्ही पण,
पाण्याची बोंबाबोंब आहे... शिवाय साठवू नका. गच्चीत टाकीचे पाणी पडले नाही पाहिजे हरेराम!

दुसरा प्रकार म्हणजे, वृक्षप्राधिकरण नावालाच आहे, व तुम्हीच लावलेल्या वीस वीस वर्षे वाढविलेल्या झाडाला धोकादायक झाल्यामुळे तोडायची वेळ आली तर मात्र परवानगी करता यांच्याच बोडक्यावर फीया भरायला लागताहेत... तेव्हा लोक मोठी झाडे लावायचीच बंद झालीहेत.>>अनुमोदन!

पीसीएमसीत जास्त चहाटळपणा आहे. अधिकारी गुंडांसारखे माजलेत. आणि गुंड जंगलातील झाडांसारखे फोफावलेत