केसेस उभ्या झाल्या असत्या

Submitted by वैवकु on 25 November, 2014 - 05:10

केसेस उभ्या झाल्या असत्या जर का फिर्यादी असते
हे आयुष्याचे अवडंबर बनले प्रतिवादी असते

का निश्चित बाप कधी नसतो ह्या ..जन्माच्या इच्छेला
नेहमीच का आपली जिंदगी हरामजादी असते

दोन जीव पण एक प्राण हे सगळे सगळे हंगामी
आपल्यात नर असतो बस अन बायकोत मादी असते

मी वरातीत माझ्या बिलकुल नाचणार नाही आहे
अब्दुल्ला नाचत असतो ती बेगानी शादी असते

प्रेमात कधी पडलो नव्हतो त्यामुळेच माहित नव्हते
डोळ्यामंधली भाषासुद्धा इतकी संवादी असते

मी बिड्या फुंकतो इतक्या की म्हणतात श्वासही तौबा
आयुष्यावरती ओळ मला सुचली एखादी असते

ह्या विषमपणाच्या चाकांवरती समाज चालत असतो
इकडे आबादी असते तर तिकडे बरबादी असते

मी माग तुझा घेताना ह्या टप्प्यावर आलो आहे
अपुल्या व्यतिरिक्त जगामधले सगळे इत्यादी असते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माग तुझा घेताना ह्या टप्प्यावर आलो आहे
अपुल्या व्यतिरिक्त जगामधले सगळे इत्यादी असते<<< व्वा व्वा

इतर आवडलेले शेरः

केसेस उभ्या झाल्या असत्या जर का फिर्यादी असते
हे आयुष्याचे अवडंबर बनले प्रतिवादी असते

का निश्चित बाप कधी नसतो ह्या ..जन्माच्या इच्छेला
नेहमीच का आपली जिंदगी हरामजादी असते

मी वरातीत माझ्या बिलकुल नाचणार नाही आहे
अब्दुल्ला नाचत असतो ती बेगानी शादी असते<<< मस्त!

गझल आवडली.

दोन जीव पण एक प्राण हे सगळे सगळे हंगामी
आपल्यात नर असतो बस अन बायकोत मादी असते

कल्पना छान. नवरा-बायको ऐवजी स्त्री-पुरुष असा संदर्भ आला असता तर शेर कदाचित खुलला असता.

प्रेमात कधी पडलो नव्हतो त्यामुळेच माहित नव्हते
डोळ्यामंधली भाषासुद्धा इतकी संवादी असते

नाट्यमय पण छान शेर.

ह्या विषमपणाच्या चाकांवरती समाज चालत असतो
इकडे आबादी असते तर तिकडे बरबादी असते

अकबरच्या पुढील शेराची आठवण झाली:
ये सच है, बेख़बर है निस्फ दुनिया निस्फ दुनिया से
कि ये मातम में है मसरूफ, और वो चैन करती है

चाकांचा रेफरन्स दुस-या ओळीत स्पष्ट झाला असता तर शेर छान होऊ शकला असता.

का निश्चित बाप कधी नसतो ह्या ..जन्माच्या इच्छेला
नेहमीच का आपली जिंदगी हरामजादी असते

दोन्ही ओळीत लय पूर्णतः वेगळी असल्याने वाचताना अडखळायला होत आहे. पहाल.
बेगानी शादी आणि तौबा शेर अजिबात आवडले नाहीत.
प्रतिसाद सकारात्मकतेने घ्याल ही आशा.
शुभेच्छा.

छानच..

मी माग तुझा घेताना ह्या टप्प्यावर आलो आहे
अपुल्या व्यतिरिक्त जगामधले सगळे इत्यादी असते

चांगली द्विपदी.

अनेक शेर आवडले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नाहीत Proud

हाहाहा. लेखन गद्यही करता आलं असतं यातलं मादी,शादी,संवादी,बरबादी (काफियाच म्हणतात ना याला) शब्द आले नसते तर तर वैचारिक निबंध बिबंध नक्की छान झाला असता. Happy

’केस उभे राहीले असते तर नाव्ह्याला सोपे गेले असते” असं भन्नाट सुचतंय. थ्यांक्स अ लॉट यार मेरे वैवकु. Happy

-दिलीप बिरुटे

आता असे वाटते आहे की बिरुटेंच्या मागे लावावे लागणार विठ्ठलाला जसे जनू म्हात्रेच्या मागे लावला तसा !!

असो

कोकणस्थ !! नाहकच चुकीचे वागत आहात आपण इतकेच आपणाला सांगून थांबतो

असो

मी आता माझी व्यक्तिगत माहिती वाढवणार आहे अनेक आयडींबद्दलची त्यांचे खरे नाव गाव पत्ता फोन नंबर इत्यादी इत्यादी ..म्हणजे जो आयडी माझं डोकं खाईल त्याला आधी फोन करून त्याच्या राहत्या गावात राहत्या घरात घरच्यांसमोर त्याचा जीव जाईस्तो ठोकून काढणार आहे माझ्या खास दंडुक्याने !!!!!! Wink

असो

वैचारिक निबंध बिबंध नक्की छान झाला असता. <<<

काही म्हणा, पण बिरुटेंना 'बि'ने सुरुवात होणारे शब्द बरेच सुचतात!

बिझल - गझल

बिविता - कविता

बितबो - बिरुटेंशी तरी बोलायचंय

बिवा - दिवा

Light 1

Happy

बाळा वैवकु, माझा पत्ता देतो फक्त आपल्या डोक्यावर राहीलेले केस तरी शाबूत राहतील का याचा विचार नक्की करा. मी तितका सोपा नाही. Happy

बाकी, बाळा बेफिकीर तुम्हाला अजून भाषा समजलीच नाही. कधी ''माती-बिती'' शब्द ऐकला असेल तर माती बरोबर असलेल्या बितीचा अर्थ माहिती नसेल तर मला विचारा मग अशा शब्दांचा अर्थ मी तुम्हाला नक्की सांगतो.

-दिलीप बिरुटे

डोक्यावर केस उभे राहीले असते..

केस उभे राहीले असते तर नाव्ह्यास सोपे झाले असते
रवीवारच्या दिवशी पहाटे काही चहापाणी झाले असते.

सुचेल तसं लिहितोच.

-दिलीप बिरुटे

अशा शब्दांचा अर्थ मी तुम्हाला नक्की सांगतो.<<< बहुधा ब्यांनी बशा बब्दांची बेखादी बिक्शनरी -बिक्शनरी बेली बसावी बसा बेकंदर बोलण्याचा बाज बाटला

बाकी बितीचा अर्थ सांगण्यास इच्छुक असलेले महाशय आपण स्वतःच्या आडनावाचा अर्थ सांगू शकलात तरी तेवढे मनोरंजन आमच्यासाठी खूप आहे .

मी तितका सोपा नाही. << तुम्ही किती सोपे आहात ह्याने कुणाला फरक तो काय पडतोय म्हणा ! पण काही असो माझ्याइतके अवघड नक्कीच नाही आहात तुम्ही.... माझ्याहून तर नाहीच नाही तेव्हा ............. !!

असो

बिरुटे आपला माझ्याशी संबंध मी गझल लिहितो म्हणून आहे आपण बिरुटे महाराज आहात ह्यासाठी नाही आहे हे आपण लक्षात घ्याल तर आपणास बरे पडेल बाकीच्या फंदात कशाला पडताय ?

>>>>बिरुटे आपला माझ्याशी संबंध मी गझल लिहितो म्हणून आहे

हाहाहा ! बाळा वैवकु , देवाची शप्पथ घेऊन सांगतो मी अजुन एकदाही आपल्या रचनेला गझल म्हटलेलं नाही. कृपया माझ्यावर काहीही आरोप करू नये.

अर्ज किया है ( हे तुम्हाला उद्देशून नाही ,मायबोलीकरांसाठी आहे) बशीर बद्र म्हणतात.

गजलो का हुनर अपनी आखो को सिखायेंगे
रोयेंगे बहुत लेकिन आसू नहीं आयेंगे.

-दिलीप बिरुटे