क्रोश्याचा छोटा डबा : Earring Holder + Jewelry Box.

Submitted by आरती on 16 November, 2014 - 05:52

झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्‍याचा योग्य वापर पण होतो.

थोडक्यात वीण देते आहे.

४ सखळ्यांचा गोल करुन घेतला. त्यात १२ अर्धे खांब घातले. जास्त खांब घातल्याने सुरुवातीपासुनच घट्ट्पणा येतो. दुसर्‍या ओळीला १,२,१,२ [ | \/ | \/ | ] असे करत वाढवत नेले. साधारण वाटी एवढा गोल झाल्यावर, शेवटच्या ओळिच्या साखळ्यांच्या "बाहेरच्या कडिवर" जेवढ्या साखळ्या तेवढेच अर्धे खांब घातले. (असे केल्यने आपोआप बाहेर वळते). मग एक मुक्या खांबांची ओळ घातली. हे पण घट्ट्पणा येण्यासाठी. मग हवी तेवढी उंची येइपर्यंत सरळ सरळ अर्धे खांब विणत गेले.
.

Jewelry Box.jpg

.

photo(24).JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना धन्यवाद Happy

आतमधे स्टिफनेससाठी काहीतरी ठेवावे ही सुचना मान्य. अश्विनीची डबीची कल्पना एकदम मस्त आणि सुटसुटीत. Happy

आरती., शुगोल
स्टेप्स लिहीते नक्की एक-दोन दिवसांत.

पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना Happy

प्राजक्ता,
सॅटिन रिबीनची कल्पना छान आहे. थँकु Happy

लिंबु, याला फार वेळ नाही लागत, करुन बघा.

Pages