क्रोश्याचा छोटा डबा : Earring Holder + Jewelry Box.

Submitted by आरती on 16 November, 2014 - 05:52

झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्‍याचा योग्य वापर पण होतो.

थोडक्यात वीण देते आहे.

४ सखळ्यांचा गोल करुन घेतला. त्यात १२ अर्धे खांब घातले. जास्त खांब घातल्याने सुरुवातीपासुनच घट्ट्पणा येतो. दुसर्‍या ओळीला १,२,१,२ [ | \/ | \/ | ] असे करत वाढवत नेले. साधारण वाटी एवढा गोल झाल्यावर, शेवटच्या ओळिच्या साखळ्यांच्या "बाहेरच्या कडिवर" जेवढ्या साखळ्या तेवढेच अर्धे खांब घातले. (असे केल्यने आपोआप बाहेर वळते). मग एक मुक्या खांबांची ओळ घातली. हे पण घट्ट्पणा येण्यासाठी. मग हवी तेवढी उंची येइपर्यंत सरळ सरळ अर्धे खांब विणत गेले.
.

Jewelry Box.jpg

.

photo(24).JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स! रुनीला अनुमोदन. आरती खूपच गोडुला आहे हा डबा.:स्मित: अजून काही आधाराला घातले आहे का यात? म्हणजे रिन्ग वगैरे?

रुनी, रश्मी, सुजा
वर अजुन एक फोटो टाकला आहे. आधाराला आत्तातरी काही घातलेले नाही. अर्ध्या खांबाची विण (तीनाचा एक) असल्याने मुळातच घट्ट आहे. आणि त्यात दागिने ठेवल्यावर तो आपोआपच ताठ राहील असे वाटते. शिवाय खाली काही गळुन पडण्याची शक्यता पण नाहीये.

तरीही तो खाली जो क्राफ्ट पेपर आहे तो गोल कापुन आत घालावा असा माझा विचार आहे. लोकरीत / दोर्‍यात काही अडकु नये म्हणुन Happy

छान

आरती, तो आतुन पण मस्तच दिसतोय. छोटुल्या गोष्टी सहज मावतील, आणी मला कलर कॉम्बिनेशन पण मस्त वाटलेय.

छानच झाला आहे. याची कृती/पॅटर्न सांगणार का? किती चेननी सुरवात केली? कसं वाढवलं?

मस्त झालाय डबा. छोटीशी मापाची डबी असली तर त्यात ठेवून दे. स्टिफनेस येईल आणि लोकरीचा डबा धुवायचा असेल तेव्हा डबी काढून धुताही येईल.

मस्त !!!!

मस्तच डबा. खूपच छान. गिफ्ट देण्यासाठी मस्तच आयडीया. आरती, आता कृतीपण द्या. कधी वेळ मिळेल तेव्हा ट्राय करेन.

तो आतुन पण मस्तच दिसतोय. छोटुल्या गोष्टी सहज मावतील, आणी मला कलर कॉम्बिनेशन पण मस्त वाटलेय.
>>>"
+१११११११११११११११११११११११११

खुपच आवडला हा पिल्लू डब्बा Happy
पुन्हा पुन्हा येऊन पहातेय

Pages