मूंगर्‍याची भाजी ( रॅडिश पोड्स)

Submitted by स्नू on 13 November, 2014 - 02:41

लागणारा वेळ:
४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

मूंगरे - पाव किलो
बटाटा - 1 मध्यम - साले काढून फोडी केलेला
हिंग -चिमूटभर
हळद - पाव चमचा
लाल तिखट - पाव चमचा
मीठ - चवीनुसार
धन्याची पूड -एक चमचा
जीरे - १/२ चमचा
तेल - फोडणीपुरते

क्रमवार पाककृती:

1. तर असे दिसतात हे मूंगरे.

11.jpg

2. मूंगर्‍यांची टोके तोडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.

12.jpg

3. १ बटाटा सोलून फोडी करून घ्यावा
४. तेल गरम करून त्यात जीरे घालावेत.
५. बटाटा आणि मूंगरे घालून एकदा हलवून घ्यावे.
६. मीठ, मिरची, मसाला इत्यादि टाकून झाकण बंद करून अत्यंत कमी आचेवर बटाटा शिजेपर्यंत शिजवावे.

13.jpg14.jpg

भाजी शिजल्यानंतरचा फोटो काढायचा राहून गेलाय. सुज्ञ वाचकांनी फरसबी बटाटा भाजीची कल्पना करावी.. Proud

वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी

अधिक टिपा:

1. मेथी प्रमाणेच हे मूंगरे देखील शिजल्यावर खूप आकसतात. त्यामुळे मीठ आणि मसाला बेताचाच घालावा.
2. मूंगर्यांचे देठ तोडणे हे अत्यंत कंटाळवाणे काम आहे. शक्य झाल्यास घरातील सगळ्यात रिकामटेकड्या व्यक्तीकडून ( उदा. नवरा) गोड बोलून करून घेणे. असे शक्य ( जे अवघडच आहे )झाल्यास आपणास भाजी अधिक गोड लागू शकेल फिदीफिदी

धोक्याचा इशारा : ह्या भाजीची चव थोडी थोडी मुळ्याच्या भाजी सारखी लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चवदार लागते हि भाजी. मुंबईत या जांभळ्या रंगाच्याही असतात.
देठ काढण्यासाठी अख्खी जुडीच जरा आपटून समपातळीत आणायची आणि मग सुरीने एकदमच देठे कापायची. गवारी, फरसबीसाठी पण असे करता येते.

विदर्भात ह्याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात कारण ह्या शेंगा मुळ्याला लागतात. पांढरे, गुलाबी, जांभळे मुळे मिळतात पण पांढरा मुळा आकारानी मोठा आणि लांब असतो. गुलाबी जांभुळी मुळे गोलसर मोदकासारखे असतात.

ह्या शेंगा चवीला गोडसर असतात आणि अतिशय नरम असतात.

ओह या तर डींगर्‍या (मुळ्याच्या शेंगा). मस्त लागतात. पटकन मिळत नाही हल्ली. मी ह्या डायरेक्ट कुकरला पाणी अगदी हबका मारल्यासारख्या वाफवुन घेते. मत लसणाच्या फोडणीत घालुन दा. कुट टाकते.

monalip, वाशी ला सेक्टर ९ च्या भाजी मार्केट मधे मिळतात. काल च घेतल्या मी.
ही भाजी आम्ही चण्याची डाळ घालून करतो.

ही तर डिंगरी! मला लहान असताना डिंगरीची भाजी खाल्ल्याचे आठवते आहे. या भाजीला एक उग्रट वास असतो. त्यामुळे डब्यात देण्याच्या भाज्यांच्या यादीतून ही भाजी वगळलेली होती हे नक्की!

मी आजच जांभळ्या रंगाच्या डिंगर्‍या आणल्या. पण त्या गड्ड की सब्जीमध्ये गेल्यात.

वरच्या फोटोत भाजी मस्त दिसतेय.

अरे याला आम्ही डिन्गर्‍या म्हणतो. परवाच केली भाजी. चक्क खूप दिवसानी मिळाली. थोडी उग्र चव पण मस्त लागते.:स्मित: स्नू, आम्ही दोन्ही टोके चिरुन बाजूला टाकुन बाकी भाजी चिरुन घेतो ग.

डिंगर्‍या ह्या मी श्रीरामपुरला बघितल्या होत्या. डोंबिवलीत नाही बघितल्या कधी.

तिथेपण मी कधीच आणल्या नाहीत कारण त्याची भाजी कशी करायची मला माहीतीच नव्हतं.

फोटोवरून चवळीच्या शेंगासारख्याच वाटत आहेत. काय वाट्टेल ते मसाले घातले तरी भाजीला मनासारखी चव येत नाही.

आत्ता आठवलं, संक्रांतीला मिक्स भाजी करतात त्यात ह्यापण घातल्या होत्या आमच्या मालकीणबाईंनी आणि दिली होती मला भाजी पण तेव्हा बरेच प्रकार त्यात असल्याने एवढी चव कळली नव्हती.

डोंबिवलीला मिळाल्या तर आणून अशी करुन बघेन भाजी.

अन्जू, हो हो श्रीरामपूरला गाडीवाले घेऊन यायचे या शेंगा Happy मंडईत पण मिळायच्या.

डिंगर्‍या मिठाच्या पाण्यात उकडून नुसत्या पण खातात बहुतेक तरी. माझे चुलत आजी-आजोबा आले की हमखास आणल्या जायच्या. आता मिळतात की नाही माहिती नाही.

हो सिंडरेला, अशी भाजी असते हे मला तिथेच कळलं. खुप फेमस होती ती आजुबाजुच्या लोकांत. मंडईत असायची नेहेमीच. मिळत असणार अजुनही.

भाजी फारशी आवडत नाही पण याच शेंगा वाळवणाच्या मिरच्यांसारख्या दही मसाला लावून वाळवतात तेव्हा दही भाताबरोबर तळून काय ऑस्सम लागतात!

या डिंगर्‍या म्हणजे मुळ्याच्या शेंगा. या कच्च्याच खूप मस्त लागतात तोंडी लावायला मात्र निवडून कोवळ्या आणाव्या लागतात कच्च्या खायच्या असतील तर. भाजीला जरा उग्र वास येतो त्यामुळे कधी आवडीने खाल्ली गेली नाही. मला एकदाच इथे उसगावात मिळाल्या होत्या पण फार जरड होत्या. तोंडी लावता आल्या नाहीत.

डिंगर्‍यांची भाजी मस्त होते. पण त्या खूप शिजवायच्या नाहीत. विशेषतः वरच्या रेसिपीसारखं कच्चा बटाटा शिजेपर्यंत तर अजिबात नाही. एका वाफेवर शिजलेल्या डिंगर्‍या मस्त लागतात.

मामी, श्रावणघेवडा आणि फरसबी एक नसतं का? मला वाटलं आपला तो श्रावणात उगवणारा घेवडा आणि इंग्लिश मधल्या French Beans च मराठीत येता येता नाव झालं फरसबी... Lol

आनंदी, चॉपर अंजली कंपनीचा आहे. मी पुण्यात घेतला होता 3 वर्षापूर्वी. पण ऑनलाइन देखील त्याच किमतीत मिळतो आहे.

http://www.amazon.in/Anjali-CW01-ANJALI-CUT-N-WASH-DELUX/dp/B00N3S9G10/r...

अवांतरः डिंगर्‍याची भाजी सुरिनामी भारतियांमध्ये पण फेमस आहे. भारताबाहेर अ‍ॅमस्टरडॅमला एका सुरिनामी हॉटेलमध्ये खाल्ली होती. हॉटेलचं नाव रामलाल. Happy

Pages