मागे वळून पहाताना

Submitted by चाऊ on 12 November, 2014 - 08:20

ठेच लागली म्हणून
कळ दाबून, उद्वेग बाजूला सारुन
थबकून मागे वळून पहाताना
दिसली हिरवळ,
पार केलेल्या वाटेवरची
दूरवरचे जिंकलेले निळे डोंगर
अनुभवलेले हास्याचे खळाळ
चढताना उभे कातळ
धडपडतानाचा थरार
आणी कोसळताना
मिळालेले समर्थ आधार
नाचणा-या मोराच्या
पिसा-यातल्या डोळ्यांसारखे
लखलखणारे लाख क्षण
पापण्यांच्या कडांना थबकलेल्या
ह्ळुवार थेंबांचे सल
आणी ते मायेने टिपणा-या
स्निग्ध स्पर्शाची सय
किलबिलणारी ममत्वाची
असंख्य कोवळी पाखरं
ठेच लागली म्हणून
आलेली कळ दाबून
मागे वळून पहाताना
मनात आली
फक्त कृतज्ञतेची भावना
फक्त कृतज्ञतेची भावना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पापण्यांच्या कडांना थबकलेल्या
ह्ळुवार थेंबांचे सल ....खुप अलवार .
शेवटही तसाच योग्य शब्दात हवा होता .म्हणजे तोच भावार्थ ठेवुन.
.. पण छान कविता..