ठंडाई

Submitted by दिनेश. on 10 November, 2014 - 03:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार,
फ्रीजमधे २/३ दिवस नक्कीच राहील. पाणी कमी वापरून वाटायचे. फ्रिजमधे ठेवताना साखर मात्र मिसळावी लागेल.

दिनेश दा , गेल्या वर्षी अशीच केली होती... सहीच जमते ....
यंदा त्यातच भांग करता येइल का अशी विचारणा झालीये

हो घारूअण्णा, यात थोडा भांगेचा पाला किंवा गोळी लावायची. मग तांब्याचा पैसा उगाळून लावायचा आणि वरून ओतायची.... एक के दो, दो के चार... दिसायला लागतील Happy

निवांत, भारताबाहेर कुठे हो मिळणार खसखस ? एक पाकिट सापडलं ते सत्कारणी लावलं.
कोल्हापुरात बहुतेक हिच पण त्यात सुका मेवा जास्त असणार !

मस्कतमधे एरवी खसखस मिळायची नाही पण महाशिवरात्रीला तिथल्या राजवाड्याच्या शेजारील शिवमंदिरात प्रसाद म्हणून ही ठंडाई मिळायची.. रात्रभर रांग लागायची तिच्यासाठी Happy एवढी खसखस कुठून पैदा करायचे कुणास ठाऊक ?

मुंबईत होळीला काही उत्तर भारतीय लोक घरी बनवतात. हे माहीत होतं पण त्यात मीरं आणि बडीशेप घातल्याने दुध कसं लागत असेल म्हणुन मी कधी थंडाई प्यायली नाही .दुसरं कारण हेच भांग . त्यामुळे कधीही थंडाई पिण्याचा प्रश्न आला नाही .पण तुमची रेसिपी एकदम मस्त आहे आणि हेवी पण .ही पण करुन पाहीन . ते बेसिल पान म्हणजे एकप्रकारची तुळशीची पानेच ना.

दुसर्या फोटोतली प्लेट चा रंग आणि टेक्स्चर मस्त आहे. Happy

सोप्पी आहे कृती. यात वेलची, आलं ही वापरतात ना?

थंडाई मस्त लागते. मुंबईत गुरुजी ब्रँडची मिळते ती छान असते. मॅप्रोच्या थंडाईत आल्याचे धागे येतात.

रच्याकने, ती बेसिल का ठेवलीये?

सिनी, आपली पुजायची ती होली बेसिल.. हि खायची बेसिल. हा प्रकार मस्तच लागतो.

मामी, वेगवेगळे स्वाद वापरता येतात. गुलाबकळी पण वापरतात वाटताना. बेसिल सहज.. शोभेसाठी. प्रत्येक फोटोत घरचा पुदीना असतो म्हणून तिला वाईट वाटू नये म्हणून. गुरुजी ब्रांडची चांगली असते पण साखरेमुळे मला नाही ना चालत. म्हणून हा खटाटोप.

ना, गांजा ओढतात आणि भांग पितात..
>>>
खसखस म्हणजे गांजाच्या झाडाचे बी..त्याला जे फळ येते त्यापासुन अफु बनवतात....आता त्याच झाडाची पाने म्हण्जे गांजा...मी अस एकल आहे की तीच पाने वाटुन भांग तयार करतात...

खसखसीच्या झाडालाच अफू म्हणतात कारण त्याच्या बोंडातील चिकापासून अफू बनते. पण ती काढून घेतल्यावर खसखसीत फारसे काही मादक द्रव्य रहात नाही. मी मुद्दाम फारसे म्हणतोय, कारण थोड्या प्रमाणात ते असतेच. खसखस घातलेले पदार्थ खाल्ल्यावर नशा जरी येत नसली तरी प्रचलित ड्रग टेस्ट्स पॉझिटीव्ह येऊ शकतात.
याच कारणासाठी अमिरात आणि सिंगापूर एअरलाईन्स खसखस सामानातूनही न्यायला परवानगी देत नाहीत.

भारतात खसखसीचाच नव्हे तर अफूचाही वापर पूर्वापार होत आला आहे. ( अजूनही होतोच आहे .) पुर्वी आजीबाईच्या बटव्यात अफूची बोंडे असत. लहान बाळांना झोपवण्यासाठी कष्टकरी महिला ती वापरत असत. आमिर खानच्या,
मंगल पांडे चित्रपटात, मोना आंबेगावकर त्याचा प्रयोग करताना दाखवलीय.

खसखसीच्या पानांची भाजी, अफिम की सब्जी म्हणून उत्तर भागात प्रसिद्ध आहे. भारतात खसखसीची लागवड सरकारच्या कडक नियंत्रणाखाली होते. तरी महाराष्ट्रातही चोरटी लागवड होतेच.

त्या पानासोबत आणखीही काही पाने भांगेसाठी वापरतात. पुर्वी मुंबईला महालक्ष्मीच्या देवळामागे ती मिळत असे.
आम्ही मालाडला रहात होतो, त्यावेळी तिथे गोठे होते. तिथले भैये होळीला, महाशिवरात्रीला भांग बनवत असत आणि
प्रसाद म्हणून आम्हाला देतही असत. त्यावेळी माझे वय आठ दहा वर्षाचे असेल. मला काय त्याची चव फारशी
आवडायची नाही पण घोटभर पित असे मी.
आमच्या शेजारी माझी शाळासोबती रहात असे. ती एकदा अर्धा कप प्यायली होती. ( माझ्यापेक्षा वर्षानी लहान ) थोड्या वेळाने तिने पिंगा घालायला सुरवात केली, ती थांबेनाच. दोन तीन जणांनी तिला धरून ठेवली त्यावेळी
तिला आवरता आले.
मायबोलीवर अरुंधती कुलकर्णीने पण एक अनुभव लिहिला होता या संदर्भातला.

हम्म्म हेच काय ते...

भारतात खसखसीचाच नव्हे तर अफूचाही वापर पूर्वापार होत आला आहे. ( अजूनही होतोच आहे .)
>>>
एकदम बरोबर लहानपनी मी पन पाहीलीये...अगदि खसखस एवडी देतात दुधातुन लहान बाळाला...

वा! छानच!
"गुरुजी" ची ठंडाई आणली जाते घरी..........उन्हाळ्यात. पण मला त्याची तिखटावर जाणारी चव आणि मिर्‍यांचा वास आवडत नाही. पण बाकी घरचे आवडीने पितात दुधात घालून.

भारी दिसतंय प्रकरण!
हे आपलं बरं दिसतंय करायला, खांडोळीइतकं किचकट नाही वाटत>> हे पण भारीये Happy

डिश नव्या दिसतायत ह्या, आणखी किती आहेत. कधीतरी नुसत्या रिकाम्या डिशेसचेच फोटो टाका Happy

डिश नव्या दिसतायत ह्या, आणखी किती आहेत. कधीतरी नुसत्या रिकाम्या डिशेसचेच फोटो टाका स्मित >> याला म्हणतात कुणाला कशाचं..... Lol

याला म्हणतात कुणाला कशाचं..... >> मला आवडल्या डिशेस.. पदार्थ तर काय करणार नाहीच मग निदान तशा डिशेस तरी आणता येतील ना! Lol

Pages