दोन गझला

Submitted by वैवकु on 6 November, 2014 - 10:28

_____________________________________________________
गझल : माझ्या लक्षातच नाही

हा माल सुखाचा माझा का विकला जातच नाही
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

का नको त्यातिथे टाके घालत आहे हा शिंपी
आंधळाच आहे हा की काही पाहातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही

________________________________________

गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

_____________________________________________________

आर्ता = आर्त आहे अशी ती . आर्त करते अशी ती . अंतःकरणाच्या आर्ततेतून अस्फुटपणे ओठांवर येते ती "आह!" ही दाद .ह्या शब्दाचे अनेकवचनही मी आर्ता असे योजले आहे ( हिंदीत "आहेँ" ) ह्याच अनेकवचनी अर्थाने हा शब्द शेरात वापरला आहे.>>>>विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता <<<<
(हा शब्द मुलीचे नाव म्हणूनही खूप सुंदर नाव ठरेल असे वाटत आहे .असो ! )
धन्यवाद .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैवकु,

तुमचा वरील प्रतिसाद म्हणजे तुम्हाला ह्या क्षेत्रात किती लवकर 'ग' ची बाधा झालेली आहे ह्याचे जिवंत उदाहरण होय.

वाचकाच्या अपेक्षा तुम्हाला अवास्तव आणि अवाजवी वाटताहेत आणि रचनेवर प्रतिसाद आले नाहीत की खट्टू होऊन ते जाहीररीत्याही मान्य करता. जर प्रतिसाद हवे असतील तर वाचकाला काय म्हणायचे आहे ते जाणून घेण्याचे सौजन्य ठेवा. आणि प्रसंगी त्या म्हणण्यावर सांगोपांग चर्चा करून जे माहीत नाही ते माहीत करून घेण्याइतपत मनाचा मोठेपणाही! उगाच काहीतरी अद्वातद्वा बरळले किंवा विक्षिप्त वागले की मोठा कवी होताच येते असे नाही.

आणि गुरूवर्यांना तुमची गझल जपायची आहे की मन हे न कळण्याइतके आम्ही बथ्थड नाही आहोत.

असो, असाच दृष्टीकोन राहिल्यास आपण लवकरच महान कवी व्हाल!

बिरुटे आपली पुस्तकी का असेनात पण मते व्यक्त केलीत मनमोकळेपणाने आजच इतके बोललात त्याबद्दल आभारी आहे . आपली गझलजाणीव ५० एक वर्षेतरी जुनी असावी जग बदलत आहे महाराजा आणि गझलही
असो

बाकी एका आत्ममग्न माणसाचे आत्मज्ञान पाहून प्रभावित झालो >>अद्वातद्वा बरळले किंवा विक्षिप्त वागले की मोठा कवी होताच येते असे नाही.<< देवसर सहा वेळा डच्चू मिळाल्यानंतर का होईना आपल्याला हे समजले ह्यातच मी समाधानी आहे बघा

आणि माझ्याबद्दल म्हणलच तर आपण आजपावेतो जाणलेच असेल की ........

मी असाच आहे बरका त्यामुळेच जगतो आहे
नाहीतर मी नसते का मरण्याचे धाडस केले

चालूद्या

मी आहेच इथेच Happy

ह्या मार्गाने का होईना प्रतिसादसंख्या वाढते आहे हेही नसे थोडके>>>

काय पॅरामीटर आहे बघा दर्जा मोजण्याचा.

काय पॅरामीटर आहे बघा दर्जा मोजण्याचा.<<<<<<

दुसर्‍याच्या जन्मावरती हळहळ करणे सोडुन दे
तू चिंता कर की आपल्याच ताटात काय पडते

अशा लोकांच्या जमातीचा मर्ढेकरांनी खूप पूर्वीच समाचार घेतला आहे,<<<

Rofl

मर्ढेकरांच्या नंतर पृथ्वी अस्तित्वात उरली हे ज्ञात नसणार्‍यांच्या संख्येत एकाची भर!

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

निव्वळ वास्तववादी शेर आहे!! वा!
सुरेख गझला आहेत !!

Pages