Submitted by हर्ट on 3 November, 2014 - 01:30
इतर ठिकाणी माहिती नाही पण पुण्यात खूपशा ठिकाणी इडली डोशाचे तयार सारण मिळते. मी एक दोनदा विकत आणले. पण, इडलीचा वास नासका येत होता आणि उरलेले पिठ परत वापरता आले नाही. नक्की कुठे हे पिठ चांगले मिळते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा, मी खूप खूपदा हे प्रयोग
अमा, मी खूप खूपदा हे प्रयोग करुन पाहिले आहे. कधी पिठ उत्तमरित्या आंबते तर कधी तिथल्या तिथच राहते. मला वाटत हे इथल्या पावसाळी हवेमुळे होत असेल पण रोज ब्रेफाला तमिळ लोक इडल्या आणतातच की. मग? आणि मला ते तेलकट धिरडी प्रकार आवडत नाही. माझ्याकडे दही देखील नीट विरजत नाही. पुर्वी हे सर्व यथासांग नीट नेटक व्हायच. हल्ली साडेसातिमुळे हेही जमेनास झाल आहे. मला माझे चकीत व्हायला होते की काही स्किल्स ह्या नष्ट होत नाहीत. स्वैपाक एक!
>>
बापरे! साडेसातीत हे ही घडते? माहितीच नव्हते.
हल्ली साडेसातिमुळे हेही
हल्ली साडेसातिमुळे हेही जमेनास झाल आहे. << काहीही
धागा भरकटवु नये ! मी
धागा भरकटवु नये !

मी विकतचे तयार पीठ आणुन डोसे करुन पाहीले , पण पीठ नीट आंबले नव्हते ,त्याचे जाड डोसेच करता आले.त्याची चव बरी होती ,पण मला तरी एवढे आवडले नाही.
हॉटेलसारखे पातळ आणि क्रिस्पी
हॉटेलसारखे पातळ आणि क्रिस्पी डोसे होण्यासाठी टीप्स द्या बरं कुणीतरी....
१. तवा चांगला गरम हवा
२. डोसा पीठ जाडच ठेवा. वाटी किंवा मोठ्या चमच्याने पीठ मध्यभागी घाला आणि पातळ पसरा
कडेने तेल थेंब थेंब तेल सॉड
३. ब्रऊन झाला कि काढा. पुढचा दोसा घालायच्या आधी किचन तॉवेलघ्या तवा पुसुन घ्या
मी तर ऐकले आहे डोशासाठी उलट
मी तर ऐकले आहे डोशासाठी उलट बारीक पीठ हवे असते. ईडलीसाठी जाड असले तरी चालते. पण डोशाला अगदी बारीक पीठ लागते.
मी आजच घरी केलेल्या पीठाचे
मी आजच घरी केलेल्या पीठाचे केले होते. फ्युच्युराचा डोशाचा जाड तवा वापरला. जराही तेल वापरले नाही पण मस्त कुरकुरीत झाले होते. (माझा मिक्सर एका स्टेजनंतर तांदूळ बारीक करायचे नाकारतोच. थोडे कण कण रहातातच. पण पाणी अगदी कमी घालून वाटले तर छान वाटले जाते. वेट ग्राईंडर केवळ यासाठी घेण्यास मन होत नाही)
माझा मिक्सर एका स्टेजनंतर
माझा मिक्सर एका स्टेजनंतर तांदूळ बारीक करायचे नाकारतोच>> सेम माझेही होते आहे.
मिक्सरच्या कंपनीला साडेसाती
मिक्सरच्या कंपनीला साडेसाती असेल
(No subject)
पिठ आंबाव ह्यासाठी टिप्स
पिठ आंबाव ह्यासाठी टिप्स सांगा प्लिज ़
पिठ आंबाव ह्यासाठी टिप्स
पिठ आंबाव ह्यासाठी टिप्स सांगा प्लिज>>>>बंद ओव्हन मध्ये, ओट्याखाली, उबदार जागेत ठेवावे.
२. डोसा पीठ जाडच ठेवा.>>
२. डोसा पीठ जाडच ठेवा.>> म्हणजे पाणी घालून पातळ नका करू
बी , एकदम सोपी आहे रेसिपी
बी ,
एकदम सोपी आहे रेसिपी ,जमेल तुम्हाला.
ही आहे पातळ (पेपर )डोशाची रेसिपी जी बर्यांच जणांना माहीतही असेल.बाकीची बटाट्याची भाजी.व खोबरयाची चटनी नेहमीप्रमाणेच करुन घ्यायची.
प्रमाण साधारण - १ वाटी उडीद डाळ ४ तास भिजवुन पाणी काढुन मिक्सर मधे वाटुन घ्या.मग त्यात १/२टीस्पुन मीठ घालुन ते पीठ फक्त उडदाचे तसच झाकुन गॅस जवळ रात्रभर ठेवा. सकाळी ६ ला त्यात ३ १/२(साडेतीन) वाट्या बारीक रवा(बारीक लाडवाचा न भाजता ,० नंबर देखील म्हणतात त्या रव्याला)घ्या .व पाणी घाला ४ वाटया.(पीठ अगदि पातळ नाही झाले पाहीजे जरा घट्ट्च हवे)त्यात रवा भिजवुन त्यातले पाणी वरचे लगेच काढुन ,तो रवा उडीदाच्या आंबलेल्या पीठात घाला.व चवीप्रमाणे परत पीठात मीठ घाला .(१/२ टी स्पुन पुरते) त्यानंतर दोन तासांनी पीठ डोसा करायला तयार होते(तासभरानेही पीठ होते, घाई असेल तर) .म्हणजे८ च्या सुमारास, नॉनस्टीक तव्याला आधी गरम करुन ,मग त्यावर दोन तीन थेंब तेल शिंपडावे ,मग त्यावर पाणी शिंपडावे (चुर असा आवाज होतो)मग चिमटयाने ओले कापड पकडुन पटकन पुसुन ,तव्यावर पेल्याच्या साहाय्याने डोसा आतुन बाहेरच्या दिशेने (एकदाच)फिरवावा. मग जरा कडा सुटायला लागल्या की लाकडाच्या चमच्याने तो उलगद सुटुन येतो तो पेपर डोसा.मग त्यात भाजी घालुन मसाला डोसा करता येईल. या साहित्याचे बरेच डोसे होतात. हे डोसे पातळ छान होतात अगदी हॉटेल्मधल्या सारखे.
अधिक माहीती साठी ही लिंक पहा.यावर कसे डोसे तव्यावर फिरवायचे ते दिले आहेत.त्याप्रामणे कृती करा.
https://www.youtube.com/watch?v=aV_M3EvgOJY या प्रमाणेदेखील छान होतात. पण मी दिलेली रेसिपीने मी नेहमी करते चुकत नाहीत .
सिनि डोसा काय सुंदर दिसतोय
सिनि डोसा काय सुंदर दिसतोय युट्युब वर. बॅटर फरमेंट झाल्यावर परत एकदा मिक्सर मधुन काढल का व्हिडीओ मधे?
नाही.मी दिलेल्या
नाही.मी दिलेल्या रेसिपीप्रमाणे फक्त एकदाच डाळ आदल्या दिवशी वाटायची ,नंतर दुसरया दिवशी फक्त रवा मिक्स करायचा. परत मिक्सर वर नाही फिरवायला लागत बॅटर फरमेंट झाल्यावर.चम्च्याने एकत्र करायचे पीठ डोश्याचे.
विडिओ मी डोसा कसा तव्यावर घालायचा यासाठीच रेफरंस म्हणुन दिला आहे समजण्यासाठी.पण मी दिलेल्या रिसिपीचाही तसाच दिसतो.
हे डोश्याचे प्रकारही छान आहे. मी केलेत व सोपे आहेत करायलाही.
http://www.maayboli.com/node/51705
http://www.maayboli.com/node/23942
ही ममाझी पेपर डोशाची
ही ममाझी पेपर डोशाची रेसीपी
http://www.maayboli.com/node/24512
Pages