घोटाळॆ-गोंधळ _ लग्नसराईतले

Submitted by bnlele on 2 November, 2014 - 23:37

लग्न कौटुंबिक सोहळा असला तरि त्याला सामाजिक प्रतिष्ठाही तेवढीच किंबहुना जास्तच असते.
मुलाच किंवा मुलीच लग्न ही जबाबदारी पेलताना कुटुंबाची लक्षणीय त्रेधातिरपिट होते. सर्व चालिरिती, विधि सुरळीत व्हावे
म्हणून अनेक बारिकसारिक गोष्टींचा आराखडा खूप विचारपूर्वक केला जातो.
खरतर, नवरा-नवरी मधे मुहूर्तावर धरलेला अंतर्पाट दोन्ही कुटुंबांच्याही दरम्यान असतो आणि मंगलध्वनि त्यांच्या नात्याची
सामाजिक प्रतिमाही प्रतिष्ठित करतो. दोन्ही पक्षी मंजूर झालेल्या आराखड्यानुसार कार्यक्रम होताना अनेकदा थॊडा घोटाळा किंवा गोंधळ होतॊच. निस्तरताना, त्यावेळी त्रास झाला तरि त्या प्रसंगांची उजळनी आनंददायक असते. आणि म्हाणून हा प्रयास:-

वार्तमान पत्र
कार्यालयात दोन्ही पक्षांची सोय होती. वरपक्षाची मंडळी आदल्या दिवशी संध्याकाळी येऊन आपल्या शिबिरात विसावली.
वधुपक्षाची सरबराईची धावपळ सुरू; चहाफराळाचा मारा झाला. वांग्निश्चय इ, ची तयारी, रात्रीच्या मेजवानीची व्यवस्था चोख असल्याची आणि लग्नानंतरच्या मेजवानीच्या बेताची आचारीवर्गासोबत उलटतपासणित सर्व दंग झाले.
नियोजित विधि आणि जेवणा नंतर वरपक्ष लहानलहान समूहात विभाजून आपसात गप्पागोष्टी करत झोपण्यासाठी दालनात गेली,
वधुपक्ष उशीरानी टाळता येईना म्हणून झोपी गेल्याच सोंग रचून - दिवे मालवून अर्धजागृत झाला. ऒळीनी आम्ही जमीनीवर उशी-पांघरूण घेऊन पढतो. पहाटे तीनचा सुमार. मंद दिव्याच्या उजेडात कुणाचा पाय पायावर पडला आणि पाहिल तर वघूची आजी दिसली. मी उठून बसलो आणि आजी थबकुन पुट्पुटत काळजीच्या स्वरात म्हणाली - दूधच आलेले नाहिए;कुणि जाऊन आणायला हंव, आणतोस? रतीब देणारा ५/६ मैल दूर म्हणून सायकलवर हँडलला दोन मॊठ्या बरण्या लावून निघालो तेव्हां तिला हायस वाटल. दोन्ही बरण्यात धारोष्ण दूध घेऊन परत येताना एक चाक पंक्चर झाल ! एतक्या पहाटे पायी येण्यापलिकडे पर्याय नव्हताच. दम लागेल अशा वेगात आलो. पण अनपेक्षित उशीरा. एव्हाना इतर मंडळीही उठली होती आणि माझ्या येण्याकडे डोळे न लवता पहात होती. "जवाबदारीची काम नव्या पिढीतील तरूण शिस्तिनी करतच नाहित आजकाल" हे शब्द येतायेता कानावर पडले ! असो. आत चहा गाळून झालेला होता. उशीर का झाला अस कुणिच विचारल नाही. दूध आल्याच्या समाधानात.
जेमतेम पाच वाजत होते. वरपक्षाचा एक दूत व्याहींना वर्तमानपत्र हांवय अस सांगून गेला.
इतक्या पहाटे कुठुन येणार वर्तमानपत्र ? आठनऊ वाजेस्तोवर अशक्य. कुणितरि सल्ला दिला- "पोर्‍या येण्याची वाट पहावीच लागेल. पाचदहा मिनिटांच्या अंतरावर तो दूत चार-पाच वेळा आठवण देण्या करिता येऊन गेला आणि ते अति आवश्यक आहे म्हणाला. थोडा धीटपणा घेऊन मीच त्याला "इतक्या लौकर मिळत नाही" हे सांगताच तो म्हणाला- "आहो, आजचच हंव अस नाही , जुनं चालेल" ऑफिस उघाडल्याशिवाय ते सुद्धा शक्य नाही हे ऎकून दूत म्हणाला- "तुमच्या व्याहींना वाचल्याखेरीज होत नाही"
मग लढवली शक्कल आणि बाजारातून आलेल्या पुड्या उलगडून तयार केल ’वर्तमानपत्र’ आणि सोय झाली !
आडमुठा जावई
ओळखीचा नवरदेव म्हणून आम्ही दोन-चार मित्र त्याच्या लग्नाला हजर होतो. त्याच्याशी मैत्रि फारशी नसली तरि एक मदत्नीस होता. नाटकांच्या तालमींना हजर असायचा
आणि मुख्यम्हणजे तालिम संपल्यावर स्त्रिपात्रांना त्यांच्यात्यांच्या घरि परत जाताना सोबत करून सुरक्षा देण्याची जबाबदारी चोख सांभाळायचा. स्वभावानी अघळपघळ पण विश्वासू.
विधिवत लग्नानंतर जेवणाची पंगत होती.. मुली कडून जावयाला आणि आम्हा मित्रांना रीतसर आमंत्रण आल. आम्ही उठलो पण तो खिळल्या सारखा लोडाला टेकलेला. आमंत्रण देणार्‍या वडिल मंडळींकडे मान वर करूनही बघत नव्हता. पंगत ताटकळलीए, चलाकि जेवायला अशा विनविण्या होतच होत्या. जावईबापू मख्ख बसलेलेच. विनोद करीत असावा या समजुतिनी आम्हीच पुढाकार घेत त्याला बकोट्याला धरून उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला न जुमानता विरोध करून "आधि मागणी मान्य करा " म्हणाला. वधुपक्षाकडून काय हंवय अशी विचारणा होताच "विमान पाहिजे" म्हणाला. लग्न झाल म्हणजे खेळणी मागण्याचे वय नसल्याची आठवण देत आम्ही हंसलो. तो रागानेच म्हणाला- "खेळण्यातल नाही, खरंखुर मिळायला पाहिजे. वधुपक्षाचा संयम अजून शिल्लक होता. ते म्हणाले अजून दुसर काहि मागा. त्याची दृष्टि खालीच. म्हणला कार द्या फ़ोर्डची. कात्रित सापडलेला वधुपक्ष गयावया करीत म्हणले-"ऎपत नाहिए एवढी आमची. आता मात्र आंम्हा मित्रांचा संयम तुटला. त्याला स्वखुषीनी आणण्याची जवाबदारी स्विकारून आम्ही त्या मंडळींना ताटकळलेल्या पंगतिकडे जाण्याची सूचना केली-"पुढे व्हा तुम्ही, येतो आम्ही तुमच्या जावयाला घेऊन. साशंक मुद्रेनी ते वळले.
आम्ही भडकून त्याला कॊंडी करून चोप देण्याची धमकी देताच निदान सायकल तरि मिळवून द्या म्हणत उठला. पंगतीत त्याच्या आजुबाजूला आमचीच पानं होती !

रुखवत
हा समारंभाचा एक विशेष आकर्षणाचा अभिन्न भाग. सासरी जाताना मुलीला दिलेल्या उपयोगी आणि कुटुंबियांच्या कलात्मक आठवनींच प्रदर्शन.
गम्मत म्हणून सांगायच तर या शब्दाची उर्दू भाषेतील ’रुखसत’ या शब्दाशी जवळिक वाटते. एका जबाबदारीतून मुक्त झाल्याच समाधान अभिप्रित असाव . थोडकेच क्षण, कारण आई-वडील मुलांच्या जवाबदारीतून संपूर्णपणे मोकळे होतच नाहीत कधि.
एका सोसायटीत, अध्यक्षाच्या मुलीच्या लग्नात घडलेली गोष्ट. शंभर फ्लॅट्सनी घेरलेल्या मध्यवर्ति लॉन मधे भव्य मंडप घातलेला होता. सर्व घरातील स्त्रि-पुरूष, मुलं-मुली स्वेछॆनी लहानलहान समूह करून कामाला हातभार लावून होते.कुणी भाजिपाला निवडून,कुणि मण दोन मण पनीर आणायला, फुलं,हार-गुछ आणायला सरसावून होते. आपसातली एकी निर्विवाद होती. एकानी वरपक्षाच्या जानोस्यासाठी स्वतःचा मोठा फ्लॅट सर्व सोयी सज्ज करून दिला तर अन्य सात-आठ मंडळींनी त्यांचे फ्लॅट वधुपक्षाच्या पाहुण्यांकरिता मोखळे करून दिले! डिसेंबर महिन्यातली थंडी;पारा दोन अंश इतका खाली असताना उत्साह शिगेला होता.
अशा सहकारात थोडा गोंधळ-घोटाळे झालेच. अदल्या रात्रि दोनच्या सुमारास आचारी तक्रार करिन म्हणाला तुम्ही आणवलेले गाजर फार लहान आहेत;हलव्यासाठी किसणे अशक्य- बदलून आणा किंवा हलवा वर्ज्य करा. ज्यानी आणले होते त्यानी ओळखीच्या अडतियाला झोपेतून उठवून तत्परतेनी हवेतसे मोठे आणून घोटाळा सावरला. पण ते येईपर्यंत त्या थंडीतही यजमानांना घाम फुटला होता.
शेजारच्या पोक्त काकूंनी मणभर दुधाच दहि विरजायला घेतल. थंडी म्हणून जवळपास उकळत्या दुधाला विअरजण घातल आणि दोन्ही पीप ब्लॅंकेटनी झाकली. उजाडता बघितल तर सर्व नासून गेलेल. मग दोन मुलांनी स्कूटरवर जाऊन मिळेल त्या हलवायाकडचे आणून वेळ भागवली.
नियोजित मुहुर्तावर लग्न लागल आणि पहिली पंगत सुरू झाली. वधुपक्षाला आधि कल्पना नसता "विहिणीची स्वतंत्र पंगत हवी" ही फुसफुस जोर धरू लागली. परिचयाचा पंजाबी केटरर सहानुभूतिपोटी सरसावून आला- लगेच व्यव्वस्था झाली आणि नाराजीची सनई बंद झाली.
चारच्या सुमारास अंधार पडु लागला. वरात अजून थोडा उजेड असता वरात परतावी म्हणून घाईनी आवरासावर सुरू झाली.. वरपक्षाकडून हुकुम सुटलेला कानी पडला- रुखवद संपूर्ण आवरून बरोबर घ्या कुणितरि. त्याचे कडील कुणि कामाला लागले. सर्व रुखवद हलविल्यानंतर रिकाम्या आछादित टेबलांवर झुलत्या पताका-तोरंणं थंडगार वारा फुंकीत होति. सोसायटीतील लोक पांगून घरोघरी गेले.
केटरर आणि आचारी आपआपआपले सामान आवरून, हिशेबाचे पैसे मोजत मार्गी लागले. वधुपक्षानी समाधानाचा सुस्कारा सोडला.
इतक्यात, मुलीच्या आईची गंभीर किंकाळी आली आणि सगळे हबकले. " आहो, रुखवद मांडायला पाच-सात घरातून स्टीलची ताटंवाट्या आणली होती ती कुठे गेली? कुणि चोरली कि काय ? नसता भुरदंड !"
थोडा संयम ठेऊन वडिलधारी मंडळी म्हणाली-- शोधू, पाहू काय करायच ते; या वेळी काहिक्षण विसावून घेऊ, गरम गरम चहाचा घोट घेऊ. मुलीच्या सासरच त्यांच्या घरच्या पुजेला येण्याच निमंत्रण होत. अन्य दोघांना विनंति करून तिथे जाण्यास सांगून मुलिचे आई-वडील हरपलेल्या ताटांची चिंता करून थकून गेले; कुणाकुणाची होती त्यांना नवी देण्याशिवाय उपाय नव्हताच.
उशीरानी रात्रि घरात फोनची घंटी वाजली. मुलिचा आवाज ऎकून वडील काही विचारपूस करण्याआधि तीच बोलली- रुखवदासोबत आपल्या सोसायटीतल्या लोकांची ताटं वगैरे इथे आली आहेत. हो नं. कोरलेली नांव पाहूनच लक्षात आलं. आता उद्या पोहोचती होतॊल.
अन्य मंडपात अशा तर्‍हेचे लहानसहान प्रसंग तर भरपूर आठवतात- नवरदेवाचा पोषाख ऎन वेळी कार्र्यालयात आणायचा राहून गेला, कौतुकानी लिहून छापून ठेवलेल्या मंगलाष्टकाचा गठ्ठा प्रेसमधून उचलायचाच राहिला वगैरे,
अस वाटत कि रंगित तालमी अभावी घोटाळे होतात. लहानपणि बाहुला-बाहुलीचे लग्न साधारणपणे सर्वांनी खेळलेल / बघितलेल असत. त्याच धर्तिवर खर्‍याखुर्‍याची रंगित तालीम करून संपूर्ण कार्याचा आराखडा आणि कामाच्या विभागणीचा तपशील आधिच करण श्रेयस्कर होऊ शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users