एक कळी फुल झाली

Submitted by भक्तिप्रणव on 31 October, 2014 - 06:39

हरखली थरथरली...
सुवासाचं लेणं ल्याली,
लांघुन सीमा गोड लाजली
एक कळी फुल झाली ॥

लवलवली झगमगली....
आभा प्रकाशाची ल्याली,
भावात भक्ती वसली
एक वात ज्योत झाली ॥

उचंबळली झुळझुळली....
जीवनाचा अर्थ ल्याली,
तीरे संस्कृती फुलली
एक झरणी नदी झाली ॥

गुणगुणली समरसली.....
अर्थगूढ कोंदण ल्याली,
शब्दालंकारे ती सजली
एक भावना कविता झाली ॥

- संदीप मोघे
08989160981
sandeep.moghe@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.