भाजप सरकारचा शपथविधी सोहळा - राजेशाही आणि वादग्रस्त?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 12:24

१) वानखेडे मैदानावर सुरक्षाव्यवस्थेवर ताण टाकत हा सोहळा करणे खरेच गरजेचे आहे का?

२) कोट्यवधींचा खर्च होणार आहे. भले कोणी कितीही पार्टी फंड मधून तो येणार असा दावा केला तरी एण्ड ऒफ द डे सामान्य जनतेच्या खिशातूनच वसूल होणार ना?

३) हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?

४) समुद्रामध्ये कित्येक कमळांचे होर्डींग जाहिरातबाजी करत तरंगत आहेत. याचा अर्थ हा सोहळा महाराष्ट्र सरकारचा म्हणून नसून सर्वस्वी भाजपाने आपल्या राजकीय पक्षाचे मार्केटींग करायला केला आहे असाच होतो ना? मग एक महाराष्ट्राचा नागरीक म्हणून मला याचा अभिमान वाटावा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच कोकणी गप्पांच्या [ 'गजाली' ] धाग्यावर पोस्ट केलेलं व्यंगचित्र केवळ गंमत म्हणून इथंही पोस्ट करावसं वाटलं -

asohalaa_0.JPG

बाकी समारंभात कुठलाही सवंगपणा म्हणा वा थिल्लरपणा म्हणा झाला नाही याच्याशी अनुमोदन
पण त्याचबरोबर ते अपेक्षितही होतेच. तिथे "मराठी बाणा" जपणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन काही वेगळे केले असते तर भाजपाचेच कठीण होते.

>> हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?<<
माझ्या मते ध्यानात आल नसावं. भाई जगतापांनी लक्षात आणुन देईपर्यंत निखिल वागळेंच्या तरी लक्षात आला होता का हा मुद्दा. पण ही बाब खटकली हे मात्र नक्की. तसेच सोहळा असावा पण एवढा खर्चिक असू नये भले तो खर्च भाजप ने केला असेल.

काय खटकलं? उलट हे खटकणं म्हणजे एक अंधश्रद्धा आहे. एखाद्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी शपथविधी करु नये या अंधश्रद्धेविरुद्ध लढा उभारला पाहीजे. Light 1

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार शेवटी स्थापन झाले. बर्याच वर्षांपासुन वाजपेयींचे असलेले स्वप्न पुर्ण झाले. इतका झगमगाट करण्याची गरज नव्हती पण शेवटी पहिले अपत्य पहिला आनंद काही औरच असतो.
त्याच बरोबर श्री. तावडेंना मिळालेली अपमानास्पद वागणुकीवर देखील राजनाथ या अजुन कोणी नेत्याने किमान खेद तरी व्यक्त करायला हवा होता. अजाणतेपणी का असेना हटकले गेलेलेच होते.
असो. आता देवेंद्र साहेब सिंचण घोटाळा वगैरे आरोपींना किती दिवसात तुरुंगाच्या मागे टाकतात ते बघु

ईंदिराजींच्या पुण्यतिथीच्या मुद्द्याबाबत मी सुद्धा माझ्यातर्फे ठाम विरोध नोंदवला नाही. कारण या बाबत काय प्रोटोकॉल आहेत याची मला कल्पना नाही. याउपर ते तसे असल्यास मुद्दामून केलेय वा अनवधानाने याचीही कल्पना नाहीच. बस्स काल चर्चेत हा मुद्दा देखील पाहिला म्हणून मांडला इथे, प्रश्नचिन्हासह. जाणकार प्रकाश टाकतील या अपेक्षेने.

बाकी खर्च, सुरक्षाव्यवस्था आणि जाहिरातबाजी.. येस्स कमी अधिक प्रमाणात विरोध राहील.

तरीही एक मतप्रवाह असाही आहे की दणक्यात आणि आत्मविश्वासाने एका नवीन इनिंगची सुरुवात करणे गैर नाही. पटणेबल आहे. पण हेच साधेपणाचे उदाहरण देत साध्य करणे शक्य नव्हते का हा प्रश्न आहेच.

+++++हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही? +++++++

प्रश्न काय आहे ? अश्या तारखा बघायला गेल तर दररोज कोणाची तरी पुण्यतिथी निघेलच मग काय असा सोहळाच करु नये ? का ईतरांच्या पुण्यतिथी तितक्या महत्वाच्या नसाव्यात ?

>>पण हेच साधेपणाचे उदाहरण देत साध्य करणे शक्य नव्हते का हा प्रश्न आहेच. <<
हो नाहितर काय? एटीकेटी मिळालेल्या विध्यार्थ्याने गोल्ड मेडल मिळालाच्या थाटात पार्टी देण्यासारखं आहे... Happy

आत्तांच श्री. गिरीश कुबेर यानी 'सह्याद्री'वर घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत पाहिली. त्याना असलेली राज्याच्या प्रश्नांची पक्की जाण, ते मार्गीं लावण्यासाठी विचारपूर्वक ठरवलेली निश्चित दिशा व पारदर्शकता मुलाखतीतून स्पष्टपणे जाणवत होती. ते किती यशस्वी होतात हें काळ ठरवेलच पण या मुलाखतीमुळे ते यशस्वी होवोत असं मात्र तीव्रतेने वाटलं, हें खरं.

>>हो नाहितर काय? एटीकेटी मिळालेल्या विध्यार्थ्याने गोल्ड मेडल मिळालाच्या थाटात पार्टी देण्यासारखं आहे... स्मित>>

अहो, बाकी सगळ्यांच्या ज्या परीक्षेत दांड्या गुल झाल्यात तिथे एटीकेटी मिळवणेपण गोल्डमेडल मिळवण्यासारखेच आहे.

फडणविसांच्या पत्नीला मराठीत विचारलं की तुला काय वाटतंय नवरा सीएम झाल्याबद्दल तर म्हणाली
"अँक्शसनेस आहे, इगरनेस आहे आणि हॅप्प्पीनेस पण आहे"

यावरुनच कळतं की एकूण फडणविसांना मराठी भाषेबद्दल लव्ह नक्कीच नाहीये आणि त्यामुळे मराठी भाषिकांना हॅपीनेस दयायला ते अजिबात अँक्शस किंवा इगर नाहीयेत. समहाऊ ते परप्रांतिय धार्जिणे वाटतात.

अमृताबेन पुढे असंही म्हणाल्या की त्यांना 'सिंगिंग' ची खूप आवड आहे आणि त्यांचं फेवरिट गाणं आहे पिया तू अब तो आजा जे त्यांनी गाऊनही दाखवलं. "खरं तर या गाण्याच्या वेळी देवेन येऊन मोनिका ओ माय डार्लिंग म्हणतो बट टूडे आय डोन्ट हॅव हिम' असंही त्या म्ह्णाल्य.

वर म्हटल्याप्रमाणे मीं एक तासापूर्वीं श्री. फडणवीस यांची मराठीतून घेतलेली व ओघवत्या, अस्खलीत मराठीत दिलेली प्रदीर्घ मुलाखत पाहिली व ऐकली. आतां, << यावरुनच कळतं की एकूण फडणविसांना मराठी भाषेबद्दल लव्ह नक्कीच नाहीये ....... समहाऊ ते परप्रांतिय धार्जिणे वाटतात >> हें वाचून मात्र मीं खरंच मोठ्या संभ्रमात पडलोय !!! Sad

का ईतरांच्या पुण्यतिथी तितक्या महत्वाच्या नसाव्यात ?
>>>
ईंदिराजी आपल्या पंतप्रधान होत्या. देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांची हत्या झाली होती. हा सोहळा सरकारी असल्याने तो शक्य असल्यास टाळावा अशी काही जणांची इच्छा होती........ इतकेच!

वर म्हटल्याप्रमाणे मीं एक तासापूर्वीं श्री. फडणवीस यांची मराठीतून घेतलेली व ओघवत्या, अस्खलीत मराठीत दिलेली प्रदीर्घ मुलाखत पाहिली व ऐकली.
>>>>>>>>>>>>>>
अधूनमधून ती मुलाखत पाहिली मी सुद्दा. मराठीचा मुद्दा असा डोक्यात नव्हता, पण कानाला खटकल्याचे आठवत नाही म्हणजे अस्सखलित असावे.

बाकी आगामी योजनांबाबत बोलले चांगले. गेल्या पंधरा वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा असल्याने आपले प्रगतीपुस्तक मांडायला एकदिड वर्षांची मुदत मागून घेतलीय असे त्यांच्या बोलण्यात जाणवले. यामागे मोदी सरकारसारखे शंभर दिवसाचे मेसेज फिरायला लागतील अशी भिती असावी .. इन्शाल्लाह त्यांच्या कारकिर्दित अच्छे दिन दिसावेत महाराष्ट्राला.

Uhoh

--------------------------------------------------

हमारे तारे बुरे है वरणा हम तो आसमा के सितारे है- Q or K

वेदिका, नव्या मुख्यमंत्त्र्यांच्या मिसेसचे मराठी नीट नाहीये तर काय झालं, कुठेही कशाचाही संबंध कसा जोडता येईल? Happy

<< नव्या मुख्यमंत्त्र्यांच्या मिसेसचे मराठी नीट नाहीये तर काय झालं, कुठेही कशाचाही संबंध कसा जोडता येईल? >>

सहमत. मी देखील मराठीप्रेमी आहे. मराठी भाषेतच विचार करतो, बोलतो, जमेल तितके लेखन देखील करतो पण माझी पत्नी अमराठी आहे तिला अजिबात मराठी लिहिता बोलता येत नाही. आता थोडेफार सरावाने समजते पण तेदेखील फारसे नाहीच. जर कुठल्या मराठी भाषिकांच्या गटाचे प्रतिनिधित्व करण्याची मला कधी काळी संधी मिळाली तर पत्नीचे अमराठी असणे हा माझा कच्चा दुवा ठरावा का?

त्याचप्रमाणे देवेन्द्र फडणवीस हे नागपुरचे आहेत. त्या भागातले कित्येक मराठी भाषिक आडनाव असणारे लोक देखील हिंदीतच बोलतात. त्यांना नीटसे मराठी येत नाहीत. हा भाग आधी मध्यप्रदेशात होता. त्यांचा एसटीडी कोड देखील ०७१२ असा मध्यप्रदेश शी मिळता जुळता आहे (महाराष्ट्रातले इतर एसटीडी कोड ०२ ने सुरु होतात). शिवाय हा भाग म्हणजे वेगळे राज्य - विदर्भ करावे असा त्यांचा आग्रह आहेच ना? जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो आतापर्यंत वेगळा झाला असताच तर संपुर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याऐवजी ते विदर्भाचेच मुख्यमंत्री झाले असते.

शपथविधी केवळ तांत्रिक दृष्टीने मराठी भाषेत झाला पण शपथ मराठी वाटली नाही. सविंधान, उन्नत असे हिंदी-धार्जिणे शब्द आणि वाक्यरचना हिंदीचा भ्रष्ट अनुवाद वाटत होती.

मागच्या मंत्री मंडळात बिहारी आणि आता गुजराथी. .. कुठ नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा..

कॉग्रेस राज्यात एक मुका बाहुला पाहिला लोंकानी.. मोदीच्या राज्यात महराष्ट्रात बोलका बाहुला.. आवाज अमीत शहा चा

वेदिका, नव्या मुख्यमंत्त्र्यांच्या मिसेसचे मराठी नीट नाहीये तर काय झालं, कुठेही कशाचाही संबंध कसा जोडता येईल?

मला त्यांचं मराठी विनोदी वाटलं फार. Happy कल्चर्ड कोण - बॅकवर्ड कोण हे पुलंचं वाक्य आठवलं Happy
त्या काही माहेरच्या अमराठी नाहीत. तरीही मराठी इतकं वाईट आहे त्याचं कारण काय? मध्यप्रदेशच्या जवळ राहतात म्हणून हिंदीच बोलतात हे कारण पटत नाही कारण इथे माबोवरच महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर वर्षानुवर्षं राहून उत्तम मराठी साहित्य लिहिणारी मंडळी रोज दिसतात.
त्यामुळे कुठेतरी मराठीला कमी लेखण्याची मानसिकताच आहे का अशी शंका मात्र आली. ही मानसिकता परप्रांतियांत नसते, आपल्यातल्याच काहींमध्ये असते.

इनजनरल विधान करतोय, माझ्यामते कोणाचे मराठी वाईट असेल तर त्याचा दोष द्यायचाच झाल्यास त्याच्या पालकांना द्यायला हवा ज्यांनी मुलाने योग्य मराठी बोलावे असा हट्ट धरला नाही.

देवेन्द्र फडणवीस यांच स्वतःच मराठी उत्तमच आहे. व ते अगदी वेगळ्या विदर्भाचे समर्थक जरी असले तरी हा माणूस हृदयानी मराठीच आहे. http://www.youtube.com/watch?v=qrfAIaTorG8 या आपल्या पहिल्यावहिल्या मुलाखतीमधे त्यांनी स्पष्ट केल की भाजप लहान राज्य असावीत या मताचा आहे. पण वेगळ्या विदर्भाच समर्थन म्हणजे महाराष्ट्राच विरोधक असण नाही. विदर्भातल्या माणसाची पावलही पंढरपूरचीच वाट चालतात. आजच मला आवडलेल वाक्य.

श्रीकांत,

>> विदर्भातल्या माणसाची पावलही पंढरपूरचीच वाट चालतात.

टाळ्याघेऊ वाक्य म्हणून ठीक आहे. उद्या कच्छ आणि सौराष्ट्र वेगळे काढायचे झाले उर्वरित गुजराथपासून, तर अशानमोजींची प्रतिक्रिया मोठी रोचक ठरावी.

आ.न.,
-गा.पै.

कुठेही सवंगपणाचा स्पर्श झाला नाही >> कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सवंगपणे झाल्याचे आठवत नाहीये. अलोट गर्दीमुळे काही जणांना परत फिरावे लागले तर आशा भोसले वगैरेना गेटवर अडकुन पडाव लागले शी आज बातमी आली आहे.

<< कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सवंगपणे झाल्याचे आठवत नाहीये. >> सडेतोडजी, असं संदर्भ तोडून उलटाच अर्थ कां काढावा ? एवढ्या मोठ्या प्रमाणात व खर्चिक सोहळा करण्याबाबतच्या चर्चेत 'सवंगपणा मात्र आला नाही', असं मुद्दाम म्हणणं म्हणजेच साधेपणाने झालेल्या इतर शपविधींमधे सवंगपणा नसतो हें गृहीतच धरल्यासारखं असतं ना !!

मुख्यमंत्र्याचे नातेवाईक कोणत्या भाषेत बोलतात याला अवास्तव महत्व का देताय माबोकर, आजपर्यंत सोनियाबाईंचे तुफान हिंदी ऐकलेच आहे ना .....
प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा आहे ते हळू हळू दिसेलच. शपथविधीनंतरच्या एकूण घडामोडीनंतर भाजप नेते जोमाने कामाला लागले आहेत असेच दिसते आहे. आता नव्या सरकारला शुभेच्छा द्यायचे सोडून कशाला फूटकळ गोष्टीवर रवंथ करत बसला आहात.

मुख्यमंत्र्याचे नातेवाईक कोणत्या भाषेत बोलतात याला अवास्तव महत्व का देताय माबोकर, आजपर्यंत सोनियाबाईंचे तुफान हिंदी ऐकलेच आहे ना .....

भाषावार राज्यरचना आहे. महाराष्ट्र राज्य निर्माणच मुळी मराठी भाषिकांसाठी झालं. आपणही सगळे माबोवर येतो ते एकाच भाषेत- मराठीत बोलतो ना. राज्याचा मुख्यमंत्री व त्याचे कुटुंबिय तीच भाषा मोडीत काढत असतील तर प्रश्नचिन्ह उभं राहतंच. आज भाषेला अडगळीत टाकताय, उद्या भाषिकांना टाकाल!
इथे अमेरिकेत जन्मलेली व वाढलेली पोरं मराठीत बोलू शकतात. त्याचं श्रेय त्यांच्या पालकांना जातं. पण मुमंना वाटतसुध्दा नाही की महाराष्ट्रात वाढणार्‍या आपल्या लेकीला मराठी बोलायला शिकवावं?

आजपर्यंत सोनियाबाईंचे तुफान हिंदी ऐकलेच आहे ना ..... > भारतात येउन हिंदी शिकल्यात ना. मग महाराष्ट्रात राहुन मराठी बोलु नये का ? Uhoh
श्री फडणवीस यांनी या बाबत काळजी घ्यायला हवी होती. जसा तावडेसाहेबांचा अपमान झालेला आहे तसा अजुन पुढे कुणाचा होईल. महाराष्ट्राची अस्मिता आपणच जपायला हवी. मग तो व्यक्ती कोणत्याही पक्षाचा का असेना. दक्षिणेत बघा जाउन त्यांनी स्वतःची अस्मिता कशी जपली आहे ते. व्यक्ती कोणत्याही पक्षाची का असेना अश्या वेळी सगळे भेदभाव दुर लोटुन एकत्र येतात

'सवंगपणा मात्र आला नाही', Happy

भाजप नेते जोमाने कामाला लागले आहेत असेच दिसते आहे. >> आता हे कुठे दिसले बुवा??? आम्हाला समुद्रात तरंगत असलेली कमळच दाखवली टिव्हीवर. झालंच तर अनिलभाई अंबानी,विवेकदादा ओबेरॉय झळकताना पाहिले. अजुन खातेवाटप झालेल नाही आणि कुठल्या कामाला लागले?? Happy

टिव्ही बघा, कुठल्या कामाला लागले ते सकाळीच सांगितले त्यावर. डिटेल्स आठवत नाहीत पण कामाचा माणूस आहे हे नक्की.

प्रत्येक माणुस कामाचाच असतो. आता पवारसाहेब बघा, कित्ती शिव्या घातल्या तरी पाठिंब्यासाठी कामाला आलेच की नै??

सडेतोड, पवार साहेबाना पुतण्यामुळे गेलेली उरली सुरली झाकायची आहे. आपले नवीन मुख्यमन्त्री यान्नीच सिन्चन घोटाळ्यावर मोठी यादी ( पुरावे वगैरे) आमदार असताना काहीतरी ४-५ महिन्यापूर्वी दाखवली होती. हे सगळे दाबण्या साठीच ही पाठिम्ब्याची नाटके चाललीत. पुतणेसाहेब निवडुन आले त्यात काही गैर नाही, कारण त्यान्च्या परीसरात जर त्यानी लोकान्साठी ( बारामती) काही चान्गले केले असेल तर लोक त्याना पाठिम्बा देनारच. पण ज्या पुण्याला ते आपली जहागिरी समजले त्याच पुण्याने त्याना सफाचाट केले. आता तरी सुधरावे यानी.

कालच्या शपथविधी मधली एक गंमत, शपथ घेतांना विद्या ठाकूर म्ह्णाल्या ".....राज्यमंत्री म्ह्णून माझी कामे यथायोग्य पार पाड्ण्यासाठी आवश्यक ते खरेदी (खेरिज : आहे ते Happy ) करुन, एरवी मी कोणत्याही व्यक्तीला....."

युपीच्या आहेत ठाकुरबै. चांगली कामे केलेल्या आमदाराला (सुभाष देसाई) व्यक्तीस्तोमामुळे (विद्याबैंकडुन ज्यांचा त्या विधानसभाक्षेत्राशी काहिही संबंध नाही) पराभव पत्करावा लागणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नक्कीच नाही.

रश्मी..जी, पाठिंबा दिलाय तो लब्बाड पण ज्यांना दिलाय त्यांनी साभार परत केल्यांचं कुठे वाचलंय कां?? आणि दिल्लीत आपला काँगेसने पाठिंबा दिल्यावर मात्र ईनोचे खोके घशाखाली उतरवले होते भाजपा॑यींनी Happy

अजून चार दिवस टी व्ही नाही पाहिला तरी फार्सा फरक पडू नये, शेवटपर्यंत घोंगड भिजत ठेवणार हे लोक ..
बाकी मी सुद्धा आज दिवसभर ना टिव्ही पाहिला ना मायबोली..

<< काय ठरल युतीचे मग ? >> ' सकारात्मक बोलणी सुरूं आहेत', 'सेनेने ३०% मंत्रीपदं मागितली ', इ.इ. चाललंयच अजून ! 'पारदर्शकते'चे ढोल बडवणारे हे नेते कां नाही स्पष्टपणे सांगत लोकाना बोलणीं नेमकी कोणत्या प्रस्तावावर चाललीं आहेत / अडलीं आहेत ? खरंच इतकी गुप्तता आवश्यक आहे का असल्या चर्चेबाबत? मागून, सत्य न सांगतांच 'युति कोणामुळे तुटली' याबाबत एकमेंकांवर आगपाखड करण्यापेक्षां, लोकाना आतांच ठरवूं दे ना चूक कोणाची होतेय तें !! 'अरे बाबा, मोठं राजकारण असतं त्यामागे; तुम्हाला नाहीं कळायचं', हें ऐकत लोकानी मूर्ख बनतच रहायचं का ?

सेनेला काय तिथे कवड्या मिळणार आहेत इथे कमळाचे इच्छूक संपता संपेना त्यात ज्याला जे खाते पाहिजे ते मिळेना. गप बसा म्हणावे विरोधी पक्षात , भाजपने सेनेच्या ब-याच सीट ओढल्यात निवडणूकीत.

रश्मी किंवा तत्सम आयडी , तुम्ही भाब्डे आहत कि भाबडेपनाचा आव आनताय? पवार आणी मोडींची मैत्री ही रष्त्रवादी स्थापनेपासुन जुनी आहे. किंबहुना सुरवातीला पवारांना रसद पुरवण्यात मोदींचा फार मोठा पुधाकार होता आणि ते सर्वश्रुत आहे.ऐन दिवाळीत पवार कोणाला भेटले होते ह्याची चौकशी करा म्हनजे कळेल कोन किसकी कातडी बचा रहा हा हे.
.९४ च्या निवदणुकित पवारांनी अपक्श बंदखोर उभे करुन युतीला सत्तीवर आणण्यात फार मोठी भुमिक निभवली होती, तोच प्रकर ह्यवेळेस त्यांनी भाजपाल पश्चिम महारष्ट्रात उमेदवार पुरवून आणी ते निवडुन येतील याची व्यवस्था करुन केलाय्.भुजबळांचे ओबीसी वजन पवारांसाठी नेहेमीच डोकेदुखी होते.म्हनूनच त्याम्च्या चौकशीची फाइल हलली .
तुमचे अमुल्य मतदान झाले आहे.आनंदात रहा हीच इश्वर्चरनी प्रार्थना.

Pages