भाजप सरकारचा शपथविधी सोहळा - राजेशाही आणि वादग्रस्त?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 12:24

१) वानखेडे मैदानावर सुरक्षाव्यवस्थेवर ताण टाकत हा सोहळा करणे खरेच गरजेचे आहे का?

२) कोट्यवधींचा खर्च होणार आहे. भले कोणी कितीही पार्टी फंड मधून तो येणार असा दावा केला तरी एण्ड ऒफ द डे सामान्य जनतेच्या खिशातूनच वसूल होणार ना?

३) हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?

४) समुद्रामध्ये कित्येक कमळांचे होर्डींग जाहिरातबाजी करत तरंगत आहेत. याचा अर्थ हा सोहळा महाराष्ट्र सरकारचा म्हणून नसून सर्वस्वी भाजपाने आपल्या राजकीय पक्षाचे मार्केटींग करायला केला आहे असाच होतो ना? मग एक महाराष्ट्राचा नागरीक म्हणून मला याचा अभिमान वाटावा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कळुन आले तुम्ही किती लांगुलचालन करतात ते.>>>>>>
बाकी कळुन आले तुम्ही किती काँग्रेस करतात ते असे म्हणले तरी चालेल
लांगुलचालन हा काँग्रेस चा एक सामानार्थी शब्द आहे ….:हहगलो:
Rofl

१००% सत्य

जरा जपुन बोला>>>>कोल्हटकर ऊर्फ जोशी उर्फ vaibhavayare उर्फ मीकेदार आपले अनेक स्क्रीनशॉट आहेत ज्यात पवार व काँग्रेसवर आपण थेट आरोप केलेत, त्यामुळे जपुन बर्का!

<<<जनतेचे पैसे जनतेवरच उधळले असं म्हणायला हरकत नाही , नाही का? कारण कितीतरी जणांना आज वानखेडेवर रोजगार मिळाला आहे. बर्‍याच बारीक सारीक धंदेवाल्यांचा चांगला धंदा होईल आज.>>>>

नक्कीच. फक्त बारीक सारीक म्हणजे कोण ते विचारायचे नाही.

काटकसरीच्या उपयांत मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची व्याप्ती कमी करायचे ठरवलेय. अप्रशिक्षित कामगरांना दिल्या जाणार्‍या मोबदल्याचे प्रमाण योजनेच्या खर्चाच्या किमान ६० टक्के असायला हवे होते, ते ५१ टक्के केले. हे वाचलेले ९ टक्के रॉ मटेरियल्सवर खर्च केले जाणार आहेत.

शिवाय मोदी सरकारने काटकसरीचे उपाय योजल्याची अगदी आजचीच बातमी आहे.

काटकसर पंधरवडा सुरु होतोय उद्यापासुन. त्यामुळे आज "होऊंदे खर्च" Wink

<<जनतेचे पैसे जनतेवरच उधळले असं म्हणायला हरकत नाही , नाही का? कारण कितीतरी जणांना आज वानखेडेवर रोजगार मिळाला आहे. बर्‍याच बारीक सारीक धंदेवाल्यांचा चांगला धंदा होईल आज.>>>> ह्म्म. नितीन देसाईसारखे बारीक सारीक धंदेवाले.

काटकसरीच्या उपयांत मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची व्याप्ती कमी करायचे ठरवलेय. अप्रशिक्षित कामगरांना दिल्या जाणार्‍या मोबदल्याचे प्रमाण योजनेच्या खर्चाच्या किमान ६० टक्के असायला हवे होते, ते ५१ टक्के केले. हे वाचलेले ९ टक्के रॉ मटेरियल्सवर खर्च केले जाणार आहेत.

व्वा नरेन्द्रभाई व्वा!!

हा शपथविधी म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा असेल तर त्या न्यायाने १५ ऑग्स्ट २६ जानेवारीला सैन्याचे संचालने हा सुधा पैशाचा चुराडाच ठरेल .
>>>>>>>>

काल एका भाजपा प्रवक्त्याने महाराजांच्या राज्याभिषेकाची याची तुलना केली होती आणि आज हे ... खरेच कठीण आहे.
अर्थात भाजपानेच आपल्या समर्थकांना गोत्यात आणून मांडायला मुद्देच ठेवले नाहीयेत यांचा त्यांचा दोष नाही.. चालायचेच Happy

अजून राज्यात भाजपचा चेहरा दिसला नाही त्यांना काम तर करु द्या , अजून शपथविधी होतोय ना होतोय तोच चालू झाले सरकरला नावे ठेवणे,
शपथ विधी नावाला आहे शक्तीप्रदर्शन हा मूळ हेतू, इन मिन ५-७ आमदार शपथ घेणार आहेत त्यासाठी हा खर्च नक्कीच जास्त तो जनतेचाच पैसा आहे तेही तितकेच खरे अहो पण निवडून पण त्यांनीच दिलेय तेवढे तर सहन करावेच लागणार.
ओव्हर ऑल बघितले तर गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल च्या किमती उतरल्या आहेत. आजपर्येंत खाऊगधड्या सरकारने हे कधीच केले नाही ,अशा ब-याच गोष्टी आहेत. भाजप अगदीच स्वच्छ सरकार देऊ शकले नाही तरी वासरात लंगडी गाय.. प्रमाणे जून्या गाढवापेक्षा बरे देईल.

भाजप अगदीच स्वच्छ सरकार देऊ शकले नाही तरी वासरात लंगडी गाय.. प्रमाणे जून्या गाढवापेक्षा बरे देईल.>>>>> ती नुसतीच गाढवे नव्हती हो, त्याना गाढवे म्हणणे म्हणजे गाढवान्चा अपमान होईल. गाढव निदान उकिरडा फुन्कत हिन्डतात, ह्यानी तर जनतेचे पाणी पण पळवले. वरती घाणेरडी भाषा वापरुन स्वतःचे वैचारीक दिवाळखोरे जाहीर केले.

छान विनोद रश्मी .....ख्याख्याख्या ह्याह्याह्या ख्याख्याख्या ह्याह्याह्या ख्याख्याख्या ह्याह्याह्या

ओव्हर ऑल बघितले तर गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल च्या किमती उतरल्या आहेत. आजपर्येंत खाऊगधड्या सरकारने हे कधीच केले नाही > हो का ?
तेव्हा डिझेल चे आंतरराष्ट्रीय भाव काय होते ११५$ आणि आता काय आहे ८४$ जरा विचार करुन लिहावे ( जमणार नाहीच म्हणा हे तरी Wink )

अग्गोबाई, एवढा खोकला बरा नव्हे. अडुळसा कफ सिरप घ्या, कडवट तुरट असले तरी पचनी पडेल. आता थन्डीला सुरुवात झालीय बर. ठसका लागला होता का?

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव मोदींमुळेच उतरलेत स्वाहा. Happy

निवडून पण त्यांनीच दिलेय तेवढे तर सहन करावे लागणार.>> का बुवा सहन करायचे?? आणि निवडून दिलंय म्हणजे स्पष्ट बहुमत वगैरे मिळालय का?? १२३ च्या विरोधात किती सीटस आहेत ते बघा की जरा.

Prasad Shirgaonkar
2 mins · Pune ·

अल्पमतातल्या सरकारच्या शपथविधीला "शिवराज्याभिषेका"ची उपमा देणं म्हणजे दिवाळीत पोरासोरांनी केलेल्या किल्ल्याला राजगड / रायगड अशी लेबलं लावण्यासारखं आहे...

अरे किती पोरखेळ कराल महाराजांचं नाव घेऊन...

फेसबुकावरुन साभार!!

तेव्हा डिझेल चे आंतरराष्ट्रीय भाव काय होते ११५$ आणि आता काय आहे ८४$ जरा विचार करुन लिहावे
आज केंद्रात कॉग्रेसी सरकार असते तर भाव अजिबात कमी केले नसते उलट वरचे कमिशन खात ढे-या फूगविल्या असत्या...
बादवे.. लोकांनी विचार करुन मतदान केले आहे पुन्हा ते लूटणारे डाकू नकोत म्हणून ,मग माझ्या विचारांचे काय घेवून बसलात.

सगळ्याच पक्षानी / राजकारण्यानी शिवाजी महाराजान्चे नाव घेऊच नये कारण कुणालाही महाराजान्च्या पायाच्या नखाचीही सर नाही. आणी तेवढी पात्रताही कुणाच्या अन्गात नाही हे माझे ठाम मत आहे. आधी राज्यातले शाही वैभव उर्फ ते गड किल्ले जपा, त्याची निगा राखा म्हणावे.:राग:

सगळ्याच पक्षानी / राजकारण्यानी शिवाजी महाराजान्चे नाव घेऊच नये>>>>सहमत

त्यांच नाव घेऊन लिहिलय, पांचटजन्य!! मोदीभुक्तांसारखं शाखेतून आलेले विचार आपले म्हणुन नाही छापलेत

तुमच्या सवयी डुआयडी करुन घाण करत फिरायचे आहे हे माहीती आहे आम्हाला (बहुदा सगळ्याच मायबोलीला) आणि ते डुआयडी वरुन मायबोलीकरांना ईमेल पाठवत बसु नका तुमचीच कळुन येते त्यातुन. शंखपाद

उद्धव ठाकरे शपथविधीला हजर रहाणार-इती सकाळ. आनन्द आहे. सेना सरकारमध्ये सामिल झाली तर सोन्याहुन पिवळे. मधले झारीतले शुक्राचार्याना बाजूला सारुन उद्धव ठाकरेनी सेनेचे आणी पर्यायाने महाराष्ट्राचे हीत बघावे.

सेना सरकारमध्ये सामिल झाली तर सोन्याहुन पिवळे. >> अगदी अगदी
तशी चिन्हे पण आता दिसू लागली आहेत
"'शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा', अमित शाहा यांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन:"- मटा

काही नको शिवसेना वगैरे सरकारात.
बसू दे हात चोळत.
बाँम्बे महानगरपालिका पण गेली शिवसेनेकडुन की मग तर आवाज बंद होईल.

टोचा, केन्द्र असो वा राज्य दोन्हीकडे नेहेमीच स्थिर सरकार असावे. अहो अल्पमत आले म्हणून सरकार पडले तर त्याचा बोजा शेवटी आपल्यावर म्हणजे जनतेवरच पडतो की. या राजकारण्यान्चे काय जातेय? खिसा आपला नेहेमीच दोन्हीकडुन कापला जातो.

'उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित रहाणार' - इति आत्तांची टीव्हीवरील खबर !
सामन्याआधीं खेळपट्टीवर जावून तीचा प्रत्यक्ष अंदाज घेण्याची जुनीच प्रथा आहे वानखेडेवरची !!! Wink

एवढ्या खर्चिकपणे शपथविधी सोहळा करणं योग्य की अयोग्य याबद्दल मतभेद असले तरीही या सोहळ्याला कुठेही सवंगपणाचा स्पर्श झाला नाही व त्याचं गांभीर्य जपण्यात आलं, याबद्दल मात्र दुमत असूं नये.
आत्तांच मंत्रीमंडळाची बैठक घेवून त्यानंतर नवे मुख्यमंत्री मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद घेणार आहेत. ती खरी महत्वाची ठरावी.
नविन मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ याना मनःपूर्वक शुभेच्छा.

२४ तास उलटायच्या आत शतक. उगाच नाही ऋन्मेऽऽष यांना त्यांचे मित्र शाहरुख म्हणतात. बाकी शाहरुख यांचा याच वानखेडे स्टेडियमवरचा (हा धागाही त्या स्टेडियम वरील कार्यक्रमासंबंधाने असल्याने) परफॉर्मन्स मला या निमित्ताने आठवला.

Pages