भाजप सरकारचा शपथविधी सोहळा - राजेशाही आणि वादग्रस्त?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 12:24

१) वानखेडे मैदानावर सुरक्षाव्यवस्थेवर ताण टाकत हा सोहळा करणे खरेच गरजेचे आहे का?

२) कोट्यवधींचा खर्च होणार आहे. भले कोणी कितीही पार्टी फंड मधून तो येणार असा दावा केला तरी एण्ड ऒफ द डे सामान्य जनतेच्या खिशातूनच वसूल होणार ना?

३) हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?

४) समुद्रामध्ये कित्येक कमळांचे होर्डींग जाहिरातबाजी करत तरंगत आहेत. याचा अर्थ हा सोहळा महाराष्ट्र सरकारचा म्हणून नसून सर्वस्वी भाजपाने आपल्या राजकीय पक्षाचे मार्केटींग करायला केला आहे असाच होतो ना? मग एक महाराष्ट्राचा नागरीक म्हणून मला याचा अभिमान वाटावा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपा ने सुरुवात मराठीतुन केली. आणि शेवट गुजरात मध्ये करणार हे आता हळु हळु स्पष्ट व्हायला लागले आहे.

मगाशीच पाहिलेल्या चर्चेत एकाने तारे तोडले. महाराजांच्या राज्याभिषेकाचे उदाहरण देत म्हणाले कि हि आपली परंपरा आहे. वागळेंना यावर किती चिडावे आणि काय बोलावे हे समजेनासे झालेले.

वागळे कुठल्या चॅनेलवर आहेत आता?

एकंदरित हे सरकार 'आपलं' वाटत नाही हे खरं. हे आहे अमित शहा- लोढा-अडानी-अंबानी-मोदी यांचं सरकार.

वाटल होत फक्त हिंदु हाच भाजपचा चेहरा.. पण आता तस नाही हिंदु + गुजराती हा भाजपा चा खरा चेहरा.. जो पहिला लपवुन ठेवला गेला आणि आता दुसरा चेहरा समोर येवु लागला आहे.

दुसर्या पक्षाकडून झाले असते तर गदारोळ माजवला असता विधानसभा बंद पाडली असती जनतेचा पैसा खर्च होत आहे म्हणत आंदोलन छाती बडवत रस्त्यावर बसले असते
पण या महागड्या कार्यक्रमात देशभक्ति आहे हिंदूत्व आहे भाजप्यांनी नविन फैशन आनली आहे राजकारणात असल्या शपथविधीची
पुढे असे कोणी केल्यास त्यावर भाजपाने थयथयाट केल्यास सणसणीत लावून द्यावे मग भाजपाला उत्तर द्यावे

वेदिका, चॅनेल लक्षात नाही. तसेही अपवादात्मक ओकेजन वगळता न्यूज चॅनेल आमच्याकडे बरेपैकी बॅन आहेत. मी देखील आज बरेच दिवसांनी वागळेंना पाहिले.

स्वाहा, हिंदुत्व वगैरे मुद्दे सध्या भाजपाचे नसावेत. ज्या काही सेलिब्रेटी कलाकारांविरुद्ध तथाकथित हिंदुत्ववादी फेसबूकावर पोस्टी फिरवत असतात ते उद्याच्या या सोहळ्यात खास पाहुणे म्हणून मिरवत असतील Happy

हाच तो संघाचा साधेपणा, फडणवीस स्वयंसेवक आहेत त्यामुळे फक्त रुपये दोनशे कोटीत भागवले. अशा विषयावर तर्कतीर्थ मोहन भागवत काहीच बोलत नाही हे विषेश.

वाटल होत फक्त हिंदु हाच भाजपचा चेहरा.. पण आता तस नाही हिंदु + गुजराती हा भाजपा चा खरा चेहरा.. जो पहिला लपवुन ठेवला गेला आणि आता दुसरा चेहरा समोर येवु लागला आहे.>>>..... काळजी करू नका.......आतापर्यन्तचा इतिहास आहे कि मराठी माणसावर कुणीही जास्त सत्ता गाजवू शकलेल नाही....तसच असेल तर हे सरकार जास्त टिकणार पण नाही

आधितर न्यूजमधे सांगत होते ,साधेपणाने करणार होते भाजप सरकारचा शपथविधी ,मग एवढा खर्च करुन का स्टेडियममधे?याने लोकांचा रोषच ओढवुन घेतायत भाजपवाले.
वागळे बरेच महिने गायब आहेत त्या चॅनलवरुन .वागळे कुठल्या चॅनेलवर आहेत आता? मी तर 'यंगिस्तान' नावाचा शो वाला अँकर हल्ली पाहतेय वागळेंच्या दाढीवाल्या गेटअप मधे.

मतदानाच्या हक्काचा गाभा हाच आहे की स्थिर सरकार स्थापनेमधे लोकांचाच सहभाग असणे. कोणाचे सरकार असणे हा त्या हक्काचा दुसरा महत्वाचा घटक. हे दोन्ही घटक संदिग्ध असताना व त्याबाबतच्या आपल्या भूमिकेबाबत मतदाराना पूर्णपणे अंधारात ठेवून चाललेले रुसवे, सोहळे हे प्रकार मतदाराना गृहीत धरण्याचाच निंद्य प्रकार म्हणता येईल. ' लावलात ना बोटाला शाई, आतां तुमचं काय काम इथं ? चला, निघा, मधे लुडबूड नको तुमची !', असंच सांगितलं जातंय लोकाना !!
भाजपाला याचा दोष देताना त्यांच्यावर '३१ तारखेला मुद्दाम हा सोहळा ठेवलाय' हा आरोप करणं मात्र अन्यायकारक व कांहींसं खोडसाळपणाचंही वाटतं.

आधितर न्यूजमधे सांगत होते ,साधेपणाने करणार होते भाजप सरकारचा शपथविधी ,मग एवढा खर्च करुन का स्टेडियममधे?>>

भाजपचा महाराष्ट्रातील पहिलाच मुख्यम.न्त्रि म्हणून असेल..

बाकी रिशी पकूर,तुम्हाला दररोज इतके लेख होतात की तुम्ही एखाद्या दैनिकात स्तंभलेखन केलं पाहिजे.
आणि त्या दैनिकाला संध्याआवृत्तीही असली पाहिजे.

ओह धन्स सुम...आयबीएन लोकमत चॅनेल मुकेश अंबानींनी घेतला आणि मोदी/अंबानीविरोधी म्ह्णून वागळ्यांना काढून टाकलेलं माहीत होतं.

मुंडे असते तर इतका भपका केला नसता, दोनशे कोटीचा चुराडा फक्त संघाच्या मुशीतलेच करु शकतात.साधी रहाणी उच्च विचारसरणी.

>>आयबीएन लोकमत चॅनेल मुकेश अंबानींनी घेतला आणि मोदी/अंबानीविरोधी म्ह्णून वागळ्यांना काढून टाकलेलं माहीत होतं.<< हायला हे भारीच की......हे नव्हते महिती, म्हणुन सरदेसायांच्या कुलदिपकाची ही हकालपट्टी झाली वाटते ??

नाही आवडले भाजपाचे असले वागणे.:अरेरे: कळत नाही की सन्धी मिळूनही हे लोक जनसामान्यान्चा विचार देखील का करीत नाहीत? आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, तिजोरी ( जी आधीच्या सरकारने घोटाळे ( सिन्चन वगैरे) करुन बरीच खाली/रिकामी केली आहे) मध्ये काय शिल्लक आहे, कुणाला नोकर्‍या नाहीत, कुणाचे पगार ( शिक्षक वगैरे ) देणे बाकी आहे, कोण अर्धपोटी वा उपाशी आहे, याचा कसलाही सारासार विचार केला नाही.:राग:

फार वाईट वाटतेय की माझ्या वडलान्च्या वेळेचा सन्घ किती वेगळा होता आणी आताचा किती वेगळा आहे. आमच्यासारख्या सर्वासामान्य माणसाने अपेक्षा ठेऊच नये हे मात्र खरे.

'३१ तारखेला मुद्दाम हा सोहळा ठेवण्यात भाजपची नैतिकता दिसून येते ', असा आरोप करत काल 'मी मराठी'वर वागळे भाजपच्या प्रवक्त्यावर ज्या तर्‍हेने तुटून पडले, तो कांहीं नि:पक्षपातीपणाचा अपेक्षित नमुना वाटला नाही, निदान मला तरी.

निषेध! निषेध! निषेध! निषेध!
शिवसेनेने या गुजरातधार्जिण्या फडणवीस सरकारला अजीबात पाठिंबा देऊ नये ,पवारांनी पण आपला पाठिंबा रद्द करावा. मंगल लोढा ,प्रकाश मेहता, चैनसुख संचेती, विष्णु सावरा ,पटेल हे गुजराती महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होणार आहेत.अत्यंत कोडगे मोदी व शहा हे सेना म्हणते तसे अफजलखानाच्या भूमिकेत आहेत.फक्त आणि फक्त गुजरातीधार्जिणं धोरण राबवणं सुरु झालय.
राज्यातली आयटी इंडस्ट्री गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे, त्यासाठी अहमदाबाद येथे मोठे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे .ज्या आयटीतले लोक मोदीचा प्रचार करतात त्यांच्या येईल लक्षात नंतर.

काल मी मराठीवर वागळेनी भाजपच्या प्रवक्त्याला निरुत्तर केल .

<<< हे सरकार 'आपलं' वाटत नाही हे खरं. हे आहे अमित शहा- लोढा-अडानी-अंबानी-मोदी यांचं सरकार.>>>>> अतिशय सहमत .

आजपर्यंत 'वानखेडे'वर अगणित खेळी पाहिल्यात; पण न जमलेल्या गणिताची मोठ्ठी खेळी मात्र 'वानखेडे'वर आजच पहातां येईल !!!! Wink

न जमलेल्या गणिताची मोठ्ठी खेळी मात्र 'वानखेडे'वर आजच पहातां येईल !!!! > जनतेच्या पैसे उधळुन हे लिहायचे राहिले

जनतेच्या पैसे उधळुन हे >>> जनतेचे पैसे जनतेवरच उधळले असं म्हणायला हरकत नाही , नाही का? कारण कितीतरी जणांना आज वानखेडेवर रोजगार मिळाला आहे. बर्‍याच बारीक सारीक धंदेवाल्यांचा चांगला धंदा होईल आज.

गेली १५ वर्ष बर्नॉल आणि इनोचा खप काही विशिष्ट लोकांनी फारच वाढवलेला खास करुन पुण्यातल्या विशिष्ट पलटी मारणारे आणि आयडींची नावे बदलणारे Lol

मला वाटते वैयक्तिक चष्मे काढून ठेवून आपण या घटने कडे पहिले तर आतापर्यंत न लक्षात आलेले अनेक पैलू दिसून येतील .

१)भाजपा चे हे महाराष्ट्र हे पहिले सरकार आहे ,पहिल्यांदा महाराष्ट्रात भाजपा चा मुख्यमंत्री होतो आहे. ह पक्ष कित्येक वर्षे महाराष्ट्रात चौथ्या क्रमांक वर होता ,पहिल्या वहिल्या यशाचा आनंद कोणाला नाही होणार .पहिलं प्रेम,पहिली नौकरी ,पहिला व्यवसाय याची गोडी वेगळी नसते का ??मग याला भाजपा अपवाद कसा असणार ??

२) एवढे मोठे सेलिब्रेशिन जेव्हा केल्ये जाते तेव्हा जनतेच्या अपेक्षा वाढतात,हे अपेक्षा आपण पूर्ण करू शकू असा आत्मविश्वास कुठे तरी भाजपेयी नेत्यां कडे दिसून येत आहे.

३) या सोहळ्य वर नरेंद्र मोदीची एक अदृश्य पण फार मोठी छाप दिसून येत आहे.मला वाटते नरेंद्र मोदी हा माणूस फार भव्य दिव्य विचार आणि कृती करतो. उदा :राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योजकांच्या औपचारिक भेट,हि गोष्ट देशातले अनेक मुख्यमंत्री करतातच पण नमो नी व्हायब्रंट गुजरात समिट ला भव्य दिव्य स्वरूप दिले देशात, देशाबाहेर स्वताचे आणि गुजरात चे जे काही मार्केटिंग केले आणि अनेक उद्योजकांसाठी गुजरात हे ड्रीम डेस्तिनेशिन बनवले त्याला तोड नव्हती .
साध्या स्वछता अभियानाचे त्यांनी केवढे भव्य दिव्य ब्रान्डिग केले, नाही म्हणले तरी देशात या विषयावर चर्चा तरी सुरु झाली.(पल्स पोलिओ च्या या पूर्वीच्या अशाच ब्रान्डिग मुळे ती मोहीम यशवी झाली हे कुणी अमान्य करेल काय ? )

एका राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा देशाचा पंतप्रधान बनतो आणि तो सुधा असे अभूतपूर्व बहुमत मिळवून बनतो त्यामागे हि विचारांची आणि कृतीची झेप असते.राज्याच्या भाजपेयीन मध्ये हा दृष्टीकोन आला तरी ते या शपथविधी चे यशच ठरेल .

४)सोहळा हा एक संदेश आहे राज्यात एक खंबीर सरकार उदयाला आले आहे याचा . सामान्य जनतेच्या (आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या) आशा आकांश्या फुलवणे आणि जनतेत विश्वास निर्माण करणे (त्यातूनच विकासाला चालना मिळते कारण विकास होऊ शकतो असा विश्वास पहिले असावा लागतो मगच विकास होतो) हा याचा एक उद्देश असतो १५ ऑग्स्ट २६ जानेवारीला सैन्याचे संचालने का केली जातात ???हाच विश्वास आणि अभिमान निर्माण करण्यासाठी . हा शपथविधी म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा असेल तर त्या न्यायाने १५ ऑग्स्ट २६ जानेवारीला सैन्याचे संचालने हा सुधा पैशाचा चुराडाच ठरेल .

>>> जनतेचे पैसे जनतेवरच उधळले असं म्हणायला हरकत नाही , नाही का? कारण कितीतरी जणांना आज वानखेडेवर रोजगार मिळाला आहे. बर्‍याच बारीक सारीक धंदेवाल्यांचा चांगला धंदा होईल आज.

- भाजपाच्या /संघाच्या म्हशीने पो घातला तरी हे म्हणतील 'कित्ती छान काळा कुळकुळीत गोड गोड पो!'

चांदीचा पांढरा शर्ट आणि सुवर्ण खाकी चड्डी असा अगदी साधा नवीन पोषाख संघाच्या भागवतगुरुजींनी गुजरातसेवकांसाठी घोषीत केला आहे.

. हा शपथविधी म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा असेल तर त्या न्यायाने १५ ऑग्स्ट २६ जानेवारीला सैन्याचे संचालने हा सुधा पैशाचा चुराडाच ठरेल . > वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण असलेले वाक्य . बाकी कळुन आले तुम्ही किती लांगुलचालन करतात ते.

अंबाणी आणि अडाणीच्या घरी फडकी मारणार्या फडकणीसांना कसली आलीय वैचारिक पातळी…>>>

मग कुणा कडे आहे वैचारिक पातळी तुमीच सांगा ???घड्याळ काकांकडे का राहुल गांधी कडे ????विनोद करता काय राव ???

बाकी कळुन आले तुम्ही किती लांगुलचालन करतात ते.>>>>>>

बाकी कळुन आले तुम्ही किती काँग्रेस करतात ते असे म्हणले तरी चालेल
लांगुलचालन हा काँग्रेस चा एक सामानार्थी शब्द आहे ….

जनतेच्या पैश्याची उधळपट्टी म्हणत कंठशोष करणारे इतके वर्ष चाललेल्या भ्रष्टाचारावर सोयीस्कर मौन बाळगून होते Proud

एका राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा देशाचा पंतप्रधान बनतो आणि तो सुधा असे अभूतपूर्व बहुमत मिळवून बनतो त्यामागे हि विचारांची आणि कृतीची झेप असते.>>>>>>>>>>>>>

अगदी बरोबर बोललात

त्येच की! साधी राहणी आणि उच्चविचारसरणीचे आजीवन प्रमाणपत्र असलेले खाकीविजारधारीसंघिष्ट तोंडे बंद ठेऊन आहेत.दोनशे कोटी साधारण किंमत असावी संघासाठी.

हा शपथविधी सोहळा माजी पंतप्रधान ईंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी होणे हा योगायोगच समजावा का? आणि असल्यास तो ध्यानात आल्यावर ती तारीख बदलणे शक्य नव्हते का? कि यात काही गैर नाही?>>>>>>> इंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथीला शपथविधी करू नये अस संविधानात लिहिलंय का? Proud या प्रश्नाचा उद्देश नाही कळला बुवा Uhoh

धिरज काटकर आणि इतर तत्सम महोदय

Rahul Gandhi summoned by court over `RSS people killed Mahatma Gandhi` comment

ही एक जुनी लिंक आहे. बघून घ्या एकदा.

म्हणूनच बोलताना जssssssssरा जपून बोला. स्वतःसकट या साईटीलाही धोक्यात आणाल. Happy

प्रॉब्लेम नक्की काय आहे? आम्ही एवढे लुबाडूनसुद्धा गुलामांकडे दिवाळी साजरी करायला पैसे कुठून आले ....? हा ..? Angry

स्वाहा तुम्ही फु बाई फु,कॉमेडी सर्कस चे संवाद लिहिता का हो? इतके निरर्थक विनोद करताय म्हणून विचारला Rofl

वानखेडे वर फुटणारे फटाके आधी इकडे चालू झालेले दिसतात. Wink

दोन्ही बाजुके लोगोंने संयम बरतने की कडी आवश्यकता हैं,
अन्यथा धागे को कडी कुलूप लगाने की गुजारिश करनी पडेगी.

Pages