महाराष्ट्राच्या निवडणूका आटपून दोन दिवस उलटत नाही तिकडे मोदी सरकारने सात आठ वर्षा पासून भिजत पडलेले बेळगावचे घोंगळे निकाली काढले. आता बेळगावचे नाव बेळगावी झाले.
मराठी माणसाच्या बेळगाव नावाच्या जखमेवर अनेकानी फुंकर घालून स्वतःचे राजकीय बस्तान बसविले तर सत्ताधा-यानी अनुल्लेख व उदासीनता दाखवत ही जखम भळभळती सोडली. प्रत्येकानी बेळगाव मुद्याचे आजवर स्वतःसाठी वापर केले असेच दिसते. आज मोदीशेठनी तर मराठी माणसाच्या भावनेला फाट्यावर मारत चक्क कानड्यांच्या मागणीला रातोरात मान्यता देऊन टाकली. हे काम करायचेच होते तर मोदीनी १५ तारखेच्या आधी हिंमत दाखवायला हवी होती. ती दाखविली नाही याचा अर्थ मराठी माणूस बेळगावच्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया देऊ शकतो याची मोदीला जाण होती. याचा अर्थ मोदिनी विचार पुर्वक मराठी माणसाशी डाव खेळला. प्रश्न असा पडतो की दिल्लीतले नेते मराठी माणसाला एवढी दुय्यम वागणूक का देतात? काँग्रेस असो की भाजप, दिल्लीतल्या नेतृत्वाने नेहमीच मराठी मनाची व भावनेची खिल्ली उडविली. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी तर कर्नाटकाची ६ कोटी. अकरा कोटी लोकं नेमकी कुठे कमी पडतात म्हणून सहा कोटी कानडी दिल्ली दरबारी आपल्याला मात देऊन जामात? मोदी वा काँग्रेसीनी नेहमी तुलनेने कमी असलेल्या कानड्यांची बाजू घेतली यामागे कानड्यांचे बळ आहे की मराठी माणसाची मागणीच अवास्त असून कानड्यांचि बाजू सत्य आहे ते कळेनासे झाले.
आता विदर्भाची पण वाटणी करुन मोकळे व्हा!
असो.
भाजप व मोदीचा निषेध!
(आपण यापेक्षा जास्त काय करु शकतो!)
<< असो, पण ईथे मुळात हे
<< असो, पण ईथे मुळात हे नामांतर करावेसेच का वाटले ... या प्रश्नाला कोणीच उत्तर दिले नाही.>> कदाचित यांत तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल - << माझ्या माहितीनुसार कर्नाटक शासनाचा प्रस्ताव केवळ बेळगांवच नाही तर बेंगलोर, मेंगलोर, मैसूर अशा इतर शहरांचीं नांवंही मूळ कानडी उच्चाराप्रमाणे बदलण्याचा आहे. >>
कानडीत अकारान्त शब्द नाहीत?
कानडीत अकारान्त शब्द नाहीत? ज्ञानेशवरांच्या मराठीतही नाहीत का?
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकु हा कान्हा...........
चांदु वो..
संभाजीनगर नामकरण होऊन दीडदोन
संभाजीनगर नामकरण होऊन दीडदोन दशके झालीत पण आम्ही अजून औरंगाबादलाच जात आहोत. एस टी बसेसही अजून १००% संभाजीनगरला जात नाहीत म्हणून सामान्य नागरिकही संभाजीनगरच्या आधी औरंगाबाद स्टॉपवरच ऊतरून राहिले. >>> ऑफिशियली नामकरण झालं नव्हतं कधीच. नुसताच सेनेचा प्रस्ताव होता सेना-भाजपा सरकारच्या वेळी. पण त्याला बहूतेक विधीमंडळाची मान्यता नव्हती. शासनाच्या कागदोपत्री व्यवहारात नेहेमीच औरंगाबाद असंच नाव होतं (सेना-भाजपा सरकार असतानासुद्धा) आणि आहे. फक्त सामन्यामध्ये आणि कदाचीत देवगिरी तरूण भारत मध्ये संभाजीनगर असा उल्लेख असतो. भाजपा नेते सुद्धा औरंगाबादच म्हणतात नेहेमी. आणि सेनेच्या खासदारांच्या लेटरहेडवर पण औरंगाबादच नाव आहे.
मस्त झाले. Bombay चे मुंबई
मस्त झाले.
Bombay चे मुंबई केले तेंव्हा मला पण असे वाईट वाटले होते.
माझ्या माहितीनुसार कर्नाटक
माझ्या माहितीनुसार कर्नाटक शासनाचा प्रस्ताव केवळ बेळगांवच नाही तर बेंगलोर, मेंगलोर, मैसूर अशा इतर शहरांचीं नांवंही मूळ कानडी उच्चाराप्रमाणे बदलण्याचा आहे.
>>>>>>
हे उत्तर नाहीये, किंबहुना हि नावे त्यांनी आधीच बदलायला हवी होती. बेळगावची मात्र पार्श्वभूमी वेगळी आहे. तसेच बेळगाव प्रकरण अजून न्यायालयात देखील आहे ना.
कायदा म्हणाल ना, तर कोणत्याही नामांतराचा प्रस्ताव ठेवायला, किंवा त्याचा हट्ट धरायला कोणताही कायदा आडकाठी करत नाही. पण त्यामागील हेतू जनतेने आपला आपणच समजून घ्यायचा असतो.
<< पण त्यामागील हेतू जनतेने
<< पण त्यामागील हेतू जनतेने आपला आपणच समजून घ्यायचा असतो. >> आपापल्या सोयीनुसार कीं काय ? अनेक राज्यानी आपल्या शहरांची नांव अशींच बदलली आहेत व कर्नाटकाने फक्त बेळगावच नाही तर इतर १०-१२ शहरांचीही नांवं बदलायचं ठरवलंय; तरीही त्यांचा हेतू केवळ बेळगाववर हक्क दाखवून मुद्दाम महाराष्ट्राला दुखवायचाच आहे , असं कां व कसं समजायचं माझ्यासारख्यानी ! बेळगाव माहाराष्ट्रात असावं असं मला कितीही तीव्रतेने वाटत असलं तरीही अनंत काळापासून तें कर्नाटकातच आहे, ही वस्तुस्थिती मीं कशी नाकारूं !
तरीही त्यांचा हेतू केवळ
तरीही त्यांचा हेतू केवळ बेळगाववर हक्क दाखवून मुद्दाम महाराष्ट्राला दुखवायचाच आहे>>>>>>> होय अगदी बरोबर............ हा कन्नडिगाचा डाव आहे........यात खर तर न्यायालयाने हस्तक्षेप करावयास हवा... कारण हे प्रकरण न्यायलयात आहे
जाऊ द्या हो भाऊ. हे मोदींच्या
जाऊ द्या हो भाऊ.
हे मोदींच्या राज्यात झाले म्हणून चांगलेच झाले म्हणायची सध्या फॅशन आहे.
हे काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर अस्मितेची गळचेपी वगैरे झाली असती.
बेळगाव अनंतकाळापासून कर्नाटकाचा आहे हे माहितीच नव्हते.
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच म्हणतो.

चेंज म्हणून विरोध असेल तर ठीक, बाकी थंड हवेच्या झोतातले अस्मिता आणि भावनांच दळण उडून जाते, ते हल्ली कोणी विकत घेत नाही. मुव्ह ऑन.
तुम्ही ब्लॉगची साईट शोधा बरं. गमतीदार/अस्मितापूर्ण (?) इ.इ. 'गावांची जुनी नाव आणि नवीन नाव' हा एक ब्लॉग चा विषय घ्या, आणि लिहा एक फक्कड लेख. हा बाफसाठी विषय नाही, याची कृपया नोंदपण घ्या.
<< हे काँग्रेसच्या राज्यात
<< हे काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर अस्मितेची गळचेपी वगैरे झाली असती. >>
बेळगावचं 'बेळगावी' झालं म्हणून मला माझ्या अस्मितेची गळचेपी झाल्यासारखं अजिबात वाटत नाही. पण उरणजवळच्या बंदर प्रकल्पाला 'कान्होजी आंग्रें'चं औचित्यपूर्ण नांव द्यावं ही मराठी माणसाची मनापासूनची विनंति कचर्याच्या टोपलीत टाकून त्या बंदराला जवाहरलाल नेहरूंच [ जेनपीटी] नांव देण्यात आलं, तेंव्हां मात्र मला तसं वाटलं होतं. वांद्रे- वरळी सी-लिंकला महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईसाठी कार्य केलेल्या कुणाचं तरी नांव द्यावं अशी चर्चा असताना, अचानक त्याला 'राजीव गांधीं'चं नांव देवून सोनियाजींच्या हस्ते त्याचं उदघाटनही करण्यात आलं. तेंव्हांही माझी अस्मिता दुखावली गेली होती. कारण हीं सारीं नामकरणं माझ्या महाराष्ट्रात होत होतीं, इतर कोणत्या राज्यात नाही. राज्य कोणाचें होतें हें सांगणे नलगे !
अगर मेरा नाम चिरकूटकुमार होता
अगर मेरा नाम चिरकूटकुमार होता तो ?
तो भी शादी आपहीसे होती, नाम बदल देते.
या धाग्यावरून एक कविता
या धाग्यावरून एक कविता आठवली.
http://www.maayboli.com/node/38538
ती कविआ लिहिणारे महोद्य स्वता
ती कविआ लिहिणारे महोद्य स्वता अमेरिकेत असतात
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच म्हणतो.>>>
मी अस्सल पुणेकर असुन ही बॉम्बेच म्हणतो.
काल बॉम्बेचे नाव बदलले, उद्या तुमचे आमचे बदलतील. ह्या चोरांचा काय भरवसा.
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच
अस्सल मुंबईकर मुंबईला बॉम्बेच म्हणतो. ???
ऑफिशिअल मुंबई हे नाव होण्याअगोदर पासून मुंबई हा शब्द अस्तित्वात होता आणि तितकाच वापरला जायचा.
फक्त तसे नामांतर केल्याने आजकाल बंबैया हिंदी मध्ये पण कित्येकदा मुंबईच म्हटले जाते.
बाकी मुंबईकरांमध्ये असली नकली नसते. सर्वांना सामावणारे शहर आहे हे.
- एक मुंबईकर
फ्रॉम आमची मुंबई
(No subject)
काय आहे कि जे मराठी लोक
काय आहे कि जे मराठी लोक राजकारण / समाजकारण / अर्थ कारण इत्यादी क्षेत्रात वरच्या स्तरावर आहेत. ज्यांचा आवाज सरकार ऐकते, त्यांच्या अस्मिता फार म्हणजे फारच बोथट आहेत. (कारण त्यांच्या पुढे २ तुकडे टाकले कि ते कसे हि नाचायला तयार असतात ) . पण हेच तमिळ / तेलगु / कन्नड / मल्लू मध्ये जितके वर जावे तितके प्रखर अस्मिता.
आणि हि गोष्ट मराठी लोकांमध्ये सार्वत्रिक आहे. म्हणजे कसे हे वरच्या स्तरावरील लोक तिकडे मांडवली करतात. तुम्ही बघितले तर खालच्या स्तरावर पण हेच चालते. सोसायटी / नोकरी मध्ये बघा. क्षुल्लक फायद्या करता मराठी माणसाची दुसरा मराठी माणूसच मारतो आणि परप्रांतीयांना डोक्यावर घेऊन नाचतो.
केंद्र सरकार ला हे सगळे दिसत असते. त्यामुळे ते त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेऊन टाकतात.
हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा
हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा न्याधीश महाजन , ज्यांनी हा निर्णय घेतला ( बेळगाव कर्नाटक ला द्यायचा ) ते पुण्याला आले होते. त्यांनी चहा मागितला तर बंगल्या वरचा खानसामा म्हणाला मिळणार नाही. चहा सकाळी दिला आहे आता एकदम दुपारी मिळेल. ( सरकारी काम चुकार ) . आणि हेच कर्नाटक मधील लोकांनी त्यांची इतकी बडदास्त ठेवली .. वर कर्नाटक सरकार ने त्यांना हिमाचल प्रदेश मध्ये एक बंगला पण दिला. झाले. कर्नाटक सरकार जिंकले. हा मराठी आणि परप्रांतीय लोकांमधील फरक.
इथे मुंबई मध्ये इतके अण्णा लोकांचे bar आहेत. जर का त्यांचा धंदा बंद ( हो हे शक्य होते, नियम , कायदे यांच्या जंजाळ मध्ये फसवून ) केला असता BMC ने, तर हा प्रश्न कधीच सुटला असता. पण तसे करायची इच्छा शक्ती नाही कोणाकडे.
http://www.maayboli.com/node/48817
बेळगाव कर्नाटकात गेल्या मुळे
बेळगाव कर्नाटकात गेल्या मुळे बेळगावचा कीती फायदा झाला आहे, ते तुम्हाला दिसत नाही.
कोल्हापुर इतके श्रीमंत गाव, पण कीती बकाल झाले आहे. गेल्या ५ वर्षात रस्त्यांना डांबराचा स्पर्श पण नाही.
भारत सरकार / कर्नाटक सरकार.
आमचे कोल्हापुर पण कर्नाटकात विलीन करुन घेउन आमच्यावर कृपा करावी.
<< आमचे कोल्हापुर पण
<< आमचे कोल्हापुर पण कर्नाटकात विलीन करुन घेउन आमच्यावर कृपा करावी.>> पण मग कोल्हापूरचं नांव कानडी उच्चारांप्रमाणे केलं तर मात्र मराठी अस्मितेचा झेंडा फडकावत डरकाळ्या फोडूं नका !
सिरियसली..? कर्नाटकात रस्ते
सिरियसली..? कर्नाटकात रस्ते चांगले आहेत? ऐकावं ते नवलचं .....
गाणगापूर, अहमदपूर, अक्कलकोट, सोलापूर असा प्रवास करून महाराष्ट्रात पोचावे कृपया. रस्त्यावरचे लोकंपण सांगत होते काही काळजी करू नका एकदा बॉर्डर क्रॉस केलीत की मग पार रस्ता चांगलाच आहे. अलमाटीजवळ डायरेक्ट नदीत कार घालायची सोय आहे. रस्त्यावर लाईट नाहीत, रोडसाइन्स, स्टॉप साइन्स नाहीत .... गूगलमॅप्स काम करतं नव्हते हे सांगणे न लगे.
राजसी कोल्हापूर बेळगाव
राजसी कोल्हापूर बेळगाव रस्त्याबाबत तुमचे काय मत आहे?
मत राजसींना विचारलं तरीही
मत राजसींना विचारलं तरीही सांगते. कोल्हापूर बेळगांव हायवे नॅशनल हायवे ऑथोरीटीजच्या हाताखाली आहे. अख्खा मुंबई ते चेन्नई हायवे. '
उत्तर कर्नाटकामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीयच आहे. (त्याच भागातल्या महाराष्ट्रात फार चांगली आहे असे नाही. पण त्यातल्या त्यात बरे म्हणायचे!) त्यामानाने टूरिस्ट पॉइन्ट आणि दक्षिण कर्नाटकामधले रस्ते बरेच चांगले आहेत. कर्नाटकामधली विजापूर वगैरे शहरे अतिशय बकाल आहेत. आणि मंगळूरसारखं अत्यंत स्वच्छ शहरदेखील आहे.
बॉम्बेचं मुंबई केल्याने मराठी
बॉम्बेचं मुंबई केल्याने मराठी लोकांची स्थिती अजिबात सुधारली नाही. त्यामुळे नाव बदलून काहीही फरक पडत नाही असंच दिसतं.
गाणगापूर, अहमदपूर,
गाणगापूर, अहमदपूर, अक्कलकोट>>>> रस्ता हॉरिबल आहे. साधं गाणगापूर रोडला उतरुन गावात जायला एस्टी पकडली तरी शरीरातली हाडे सुटी होणे म्हणजे काय ते कळते. अधून मधून बसल्या जागी उंच उडायला होते बाळाला उडवून झेलतात तसे. एस्टीत कुणीही चढू शकते. शेजारी बकरी उभी राहून लेंड्या टाकू शकते :-(. एक तासाचा प्रवास कधी संपतोय असं होतं. गाणगापूर स्टँडात एस्टीतून खड्ड्यात उतरावं लागतं. तो खड्डा कधी कधी डबकंही बनलेला असू शकतो. देवळापासून अमरजा संगम, भस्माचा डोंगर वगैरेचा रस्ता बरा होता.
हे मी १० वर्षांपुर्वीचं सांगतेय :-P. आताचं माहित नाही
निदान उत्तर कर्नाटकात तरी
निदान उत्तर कर्नाटकात तरी फक्त हायवे चांगले आहेत असं निरिक्षण आहे. बाकी रस्ते केवळ पाठमोडे.. त्यापेक्षा महाराष्ट्रातले गावपातळीवरचे रस्तेसुद्धा खूप बरे आहेत. गेल्या तीनेक वर्षांत परिस्थिती बदलली असेल तर माहित नाही.
नंदिनी आणि केश्वीची पोस्ट्स नंतर वाचली... पण आता जौद्या
धन्यवाद नंदिनी. मी तो नॅशनल
धन्यवाद नंदिनी. मी तो नॅशनल हायवेचा मुद्दाच लिहायला आले होते.
बरं अजून एक सहज माहिती म्हणून
बरं अजून एक सहज माहिती म्हणून ... त्या छान राष्ट्रीय महामार्गाचे काम वाजपेयींनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले आहे. बाकी जास्त काही लिहित नाही उगीच माझे इतर बीबींवरच्या स्नेहींना सुगावा लागायचा
आज अमित शहा बेळगाव दौऱ्यावर
आज अमित शहा बेळगाव दौऱ्यावर आहेत
पण मराठी समितीस भेटण्यास त्यांनी नकार दिला आहे
Pages