दाल मखनी (पंजाबी पद्धत)

Submitted by स्नू on 17 October, 2014 - 03:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

अख्खे उडीद - दीड कप
राजमा - अर्धा कप
१ कांदा ( फक्त वरुन ४ Intersecting चिरा द्याव्यात. कांदा अखंड राहू द्यावा. तुकडे नकोत)
३ टोमॅटोची प्यूरी
आले लसूण पेस्ट - १ चमचा
धने पूड - १ चमचा
लाल मिर्ची पाऊडर - अर्धा चमचा
गरम मसाला - १ चमचा
दालचीनी, वेलदोडा, मीरे - प्रत्येकी ३-४
तमालपत्र - १
हिरवी मिर्ची - १
दूध - १ कप
क्रीम - ३ टेबलस्पून
लोणी - २ चमचे

क्रमवार पाककृती: 

१. उडीद आणि राजमा धुवून चौपट पाण्यात ६-७ तास भिजत घालावेत भिजत घालावेत.
२. उडीद, राजमा (भिजत घातलेल्या पाण्यासकट) वेलदोडा, दालचीनी, मीरे, एक कांदा, मीठ,आणि गरम मसाला टाकून २५ मिनिटे कूकर मध्ये शिजवावे.
३. कूकर थंड झाल्यावर पळीने डाळ व्यवस्थित हलवून घ्यावी.
४. तमालपत्र, दालचीनी, मिरे, वेलदोडे शोधून काढून टाकावेत. खडया मसाल्याचा स्वाद ऑलरेडी दालीत उतरलेला असल्याने ही फक्त सालपट आहेत.
४. एका पसरट पॅनमध्ये लोणी टाकावे.
५. त्यात आले लसूण पेस्ट गोल्डन होईपर्यंत परतावी.
६. टोमॅटोची प्यूरी टाकावी.
७. थोडेसे मीठ, लाल तिखट आणि धने पूड टाकून तेल सुटेपर्यन्त परतावे.
८. तेल सुटल्यावर ते मिश्रण, एक हिरवी मिर्ची १ कप दूध आणि क्रीम दाळीमध्ये टाकावेत.
९. कूकर बंद करून ५ मिनिटे दाल पुन्हा शिजवावी.
१०. गरज पडल्यास पाणी टाकावे. पारंपारिक पद्धतीची दाल घट्टच असते.

67.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

१. स्लो कूकर मध्ये बनलेली दाळ खूप स्वादिष्ट लागते.
२. अमृतसर मध्ये ही दाल खूप प्रसिद्ध आहे. बर्‍याच ठिकाणी रात्रभर कढवतात.
२. .ही दाळ जास्त तिखट नसते.

माहितीचा स्रोत: 
माझी सरदारणी स्वयंपाकिण :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, दाल मखनी माझी आवडती डिश, पाककृती पण सोप्पी आहे. पण फोटो कुठे आहे?

<<< कूकर थंड झाल्यावर पाळीत दल व्यवस्थित हलवून घ्यावी.>>>> हे वाक्य कळले नाही.

वेलदोडा, दालचीनी, मीरे, तमालपत्र हे एका पुरचुंडीत बांधून टाकल्यावर निवडायची गरज पडणार नाही. बाकी पाककृती तर अप्रतिम.

वाह मस्तं रेसिपी....फोटोही छान आहे. स्लो कूकर ची छान आयडिया आहे. माझी एक पंजाबी मैत्रीण असच करायची.

I tried this recipe with a slow cooker yesterday. Soaked the beans overnight on Friday night. 8 hours on low setting with onion, whole spices and garam masala. Then on high for an hour while sautéing the ginger garlic paste etc. and then another hour on high after adding the masala paste. I didn't have cream so I used Creme Fraiche instead ( yes, I know it sounds a bit like 'let them eat cake' ) .

I think I will stick with cream next time. Creme Fraiche adds a slight tangy flavor. Also I think my slow cooker needs a little more time or temp or both. May be 4 hours on low and four hours on high.

The step of adding garam masala while cooking the beans is new for me- I think it makes a big difference.
Thanks for a yummy, keeper recipe.

मी शेवटी किचन किंग आणि थोड़ा राजमा मसालासुद्धा घालते नेहमी. आणि कांदा बारीक चिरून, परतून. बाकी पद्धत अशीच. आता परवा बनवेन तेव्हा मसाले न घालता करेन. सध्याच्या गरमीत ज़रा कमी मसालेदार दालच छान वाटेल.

आज प्रेशर कुकर वापरुन राजमा बनवला या रेसिपीने. तीन शिट्या अन मग मंद आचेवर ५-७ मिनिटे. मस्त झाला होता राजमा पण. राजमा शिजवतानाच बारक्या ' व्हॉट इज दॅट यम्मी थिंग? ' म्हणत घुटमळत होता किचनमधे Happy

नमस्कारम्

राजमा खुप वापरला जात नाही . पण दाल मखणिने आम्हि सर्व राजमाच्या प्रेमात आहोत . धन्यवाद कोटि कोटि धन्यवाद
Thanks for being there. Wid Luv n compliments of d Seasons.