करांद्याची फुलं

Submitted by जो_एस on 6 October, 2014 - 06:11

karande.jpgkarande1.jpgkarande2.jpgkarande3.jpgkarande4.jpgkarande6.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)कोनफळ आणि तोंडल्याचे वेल
१

२)आजचा सूर्योदय आणि कोनफळीच्या वेलाचे तोरण
२

३)कोनफळीच्या वेलाच्या पानांच्या देठाजवळ आलेली छोटीशी गाठ
३

मी ३-४ वर्षापुर्वी पावसाळी रान्-करांद्याची उकडण्याची प्रक्रिया लिहीली होती. हे रानकरांदे कडू असतात. जमिनीतलेच खातात. त्यातल्यात्यात तांबड्यामातीतील करांदे जरा कमी कडू लागतात. पण हे करांदे औषधी म्हणून पावसाळ्यात आमच्याकडे २-३ वेळा तरी करुन खाल्ले जातात.

बाजारात येणारे गोड करांदे म्हणजे गोड नसतात पण चविष्ट म्हणूया. तेही हिरा म्हणतात त्याप्रमाणे जमिनीतले जास्त चविष्ट असतात. वेलीवर येणारे करांदे आम्ही चुलीत भाजून खायचो. ते जास्त टणक असतात मुळापेक्षा.

पाउस पडला की करांद्याचा बिनपानांचा नुसता वेल म्हणजे कोंबरुपी वेल जेंव्हा बाहेर पडते तेंव्हाच करांदे खणले की ते जास्त चविष्ट लागता. पाने आल्यावर त्याची चव थोडी कमी होत जाते.

वरचे फोटो मस्तच.

कडू नसलेले करांदे आणि इतर पाच सहा कंद कणगर,कचरा(नाव आहे) इ०नवरात्रीत आणि करांद्याचे केसाळ मूळाचा कंद,कोनफळ दिवाळीनंतर बाजारात येतात.
या सर्वांचा देठासारखा दिसणारा भाग असतो तिकडून वेलास जोडलेले असतात. इकडच्या टोकाकडचा एक दोन इंचाचा भाग कापून सुक्या मातीत जपून ठेवा आणि उरलेला भाग उकडून खाण्यास वापरा. मार्चमध्ये ठेवलेल्या शेंड्यांवर रोज दोनतीन थेंब पाणी सोडले की त्यातून सुसाट वेगाने वेलाचे कोंब आणि मुळे बाहेर पडतील.ते योग्य जागी लावा.कच्चे हिरवे करांदेही खाण्यास छान लागतात. कडू करांदे कुंपणाच्या कमानीवर लावले की फोटोतल्यासारखे शोभिवंत लोंगर येतील.

कित्ती सुरेख फोटो टिपलेत फुलांचे.
हजारो वेळा तरी बघितले असतील करांद्याचे वेल आणि फूलं, ईतकी सुंदर असतात हे आजच कळलं

Pages