करांद्याची फुलं

Submitted by जो_एस on 6 October, 2014 - 06:11

karande.jpgkarande1.jpgkarande2.jpgkarande3.jpgkarande4.jpgkarande6.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच फुले. कधीच बघितली नव्हती. अगदी रेडीमेड गजरा !
करांदे तर एकेकच लागतात. बहुतेक तो कंद असावा, फळ वेगळे असेल असे वाटतेय.

Dioscorea bulbifera - ही वेल आहे का ती ???

फोटो मस्त आहेत. Happy

वॉव. कित्ती सुंदर आहेत फुलं. मी पण लावलंय पण मोठं होतच नाही.

जो_एस तुमच्या पोतडीतून काय काय exclusive बाहेर पडते, मस्त आहे तुमची बाग.

मीही पहिल्यांदिच पाहिली

हो Dioscorea bulbifera असाच प्रकार दिसतोय.

>>> करांदे तर एकेकच लागतात. बहुतेक तो कंद असावा, फळ वेगळे असेल असे वाटतेय.>>> फळं या फुलांना लागलीच नाहीत ती आधीच पानाच्या देठाजवळ लागली होती

करांद्यानाच मग मूळे फुटतात. म्हणजे प्रसार त्यांनीच होत असावा. मग ही फुले नुसती शोभेची म्हणायची का ?>>>
असेच असावे
दर वर्षी पावसाळा आला की हा वेल एका कुंडीत उगवतो आणि संपला की नाहीसा होतो
फुलं पहिल्यांदा आली

ही कडू कारंद्याची आहेत. मी हे बागेत लावले होते. पाचफुटी लांब घोस येतो वजन तीनचार किलो असते. कारिंदे हे खोडावरची गाठ {Ariel yam}अर्थात खोड आहे त्यामुळे फुलापासून होण्याचा प्रश्न नाही.

मी नायजेरीयात कोनफळ लावले होते. इथून अगदी बटाट्याएवढा कंद नेला होता. तिथे त्याचा वेल खुप माजला. शोभिवंत होता. लाल देठ आणि मस्त चमकदार पाने. त्याला फुले वगैरे काही आली नाहीत. सहा महिन्यांनी खणून बघितले तर साधारण ५ किलोचे कोनफळ ( तेही एकच कंद) तयार झाले होते.

करांदा हे अ‍ॅक्सिलरी बड चे मॉडिफिकेशन आहे. पान आणि खोड यांमधे एक छोटी ठिपक्यासारखी कळी असते. त्यातून बहुतेक वेळा एक डहाळी फुटते आणि ती वाढून पुढे तिची फांदी बनते. पण काही अपवादात्मक वेळी ह्या कळीचे करांदे किंवा भेबडांसारखे कंद, तणावे,काटे अशी वेगवेगळी रूपांतरे होतात. (भेबडे म्हणजे कोनफळाच्या वेलीच्या पानाच्या मुळाशी वेड्यावाकड्या आकारात वाढलेले कंद) हे कंद खाण्याजोगे असतात. शिवाय त्याच्यावरचे डोळे जमिनीत लावले तर त्यातून पुन्हा वेली येतात. वेलींच्या मुळाशीसुद्धा एक मोठा कंद असतो. जमिनीतला करांदा केसाळ पण मोठा आणि चविष्ट असतो. जमिनीतले कोनफळही मोठे असते. कोनफळाची खीर छान होते. कापही तळून छान लागतात.

Pages