तुझे क्षितीज गाठणे जमायला हवे

Submitted by वैवकु on 5 October, 2014 - 08:10

बराच वेळ थांबलो निघायला हवे
तुझे क्षितीज गाठणे जमायला हवे

रितेपणातही कसे भरून यायचे
नभाकडून हे कसब शिकायला हवे

तुझ्याशिवाय चित्त गुंतणारही कुठे
तुझ्यामधेच चित्त गुंतवायला हवे

असे करून पाहिले तसे करूनही
अजून काय वेगळे करायला हवे

'उभ्या' पिकावरी चिडून काय फायदा
मनात जे पिकेल ते विकायला हवे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रितेपणातही कसे भरून यायचे
नभाकडून हे कसब शिकायला हवे

तुझ्याशिवाय चित्त गुंतणारही कुठे
तुझ्यामधेच चित्त गुंतवायला हवे

असे करून पाहिले तसे करूनही
अजून काय वेगळे करायला हवे<<< वा वा, गझल आवडली