लॉ ऑफ अ‍ॅटरॅक्षन - पॉजिटीव थिंकींग

Submitted by सख्या on 2 October, 2014 - 07:43

मला स्वताला पॉजिटीव थिंकिंगचे बरेच चांगले अनुभव आले आहेत. तुमचे अनुभव निगेटीव गोष्टीं बोलण्याचे टाळण्याच्या युक्त्या इथे लिहा. मला विश्वास आहे की दिवसभरात कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देउन जर ठरवले तर आपण निगेटीव बोलणे/विचार करणे टाळु शकतो. आपण ज्याचा विचार करत असतो तेच आपल्याकडे अ‍ॅटरॅक्ट करत असतो. म्हणुन दसर्‍याच्या महुर्तावर संकल्प करुन पॉजिटीव बोलु/ विचार करु अन एकमेकांना तसे करण्यास मदत करु.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आलाय अनुभव. मी Rhonda Byrne यांच्या सिक्रेट अणि मॅजिक वाचून अनुभवलंय.

माझे वजन तेव्हा जरा जास्तच वाढले होते आणि खूप राग आलेला स्वतःचा कारण चॉकलेट खाण्यावर अजिबात ताबा नव्हता. Angry

त्यानंतर तब्बल १-१.५ वर्ष (११वि ते एफ वाय) मी हे पुस्तकं वाचून बर्याच गोष्टी खाणं सोडलेले आणि एकदा आपल्याला आपल्या वीकनेस ट्रिगर करता आला कि झालंच! अर्धी लढाई तिथेच जिंकतो आपण.

आता मला लॉ ऑफ अ‍ॅटरॅक्षन हि माझी सुपर पॉवर वाटते. ते फक्त पॉसिटिव थिन्किंग नाहीय तर आपली इच्छाशक्तीही आहे. आपण आपली इच्छाशक्तिही तेवढीच प्रबळ करता आली पाहिजे.

सख्या थोडे आणखी लिहा ना.

अ‍ॅटरॅक्षन म्हणजे स्पेलिंग attraction आणि मराठी अर्थ आकर्षण का?

'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' म्हणजे 'लाईक मीट्स द लाईक'. दोन समानधर्मी - समविचारी लोक नेहमी एकत्र सापडतील. त्यांची मैत्री सर्वसाधारणपणे अटूट राहील.

मराठीत एक म्हण आहे - "ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला" याचा अर्थ असा की; ज्या संगतीत तुम्ही राहता त्या संगतीचा परिणाम तुमच्यावर होतो.

याचे बरेच कंगोरे आहेत. बेसिकली, जे तुम्हाला करायचे आहे त्यातील तज्ञ लोकांची संगत तुम्हाला लाभली तर नक्कीच फायदा होतो.

समजा एका विद्यार्थ्याला अभ्यास करायचा कंटाळा येतो. तरी त्याने जर अभ्यासाची वातावरण निर्मिती केली ( टेबलावर पुस्तक - वही - कंपास - पेन काढून ठेवले, काय कराचे याचा विचार केला तरी; थोडाफार अभ्यास होऊ शकतो. तुमचे कामाचे टेबल आवरून ठेवले, तरी काम करायला हुरूप येतो. वगैरे.

दुसरी गोष्ट म्हणजे 'नाही', 'नको', 'अशक्य' वगैरे शब्द आपल्या दैनंदिन जीवनातून जाणीवपूर्वक काढून टाकणे! उदा. 'हे काम माझ्याने होणार नाही' असे म्हणण्या ऐवजी 'या कामाची माझ्याकडून पूर्तता होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य टक्के आहे' म्हणा. 'तुमचे पैसे आले नाहीत' असे म्हणण्याऐवजी 'तुमचे पैसे येणे बाकी आहे' असे म्हणा. दोन्हींचा अर्थ एकच आहे पण दुसर्‍या वाक्यामुळे मनात आशावाद निर्माण होतो आणि त्याचा इतर कामावर (तसेच कदाचित त्या 'अशक्य' वाटणार्‍या कामावर सुद्धा) सकारात्मक परिणाम होतो. मनात सकारात्मक विचारांची वाढ होते आणि चांगले परिणाम दिसून येतात. Happy

पण दुसर्‍या वाक्यामुळे मनात आशावाद निर्माण होतो आणि त्याचा इतर कामावर (तसेच कदाचित त्या 'अशक्य' वाटणार्‍या कामावर सुद्धा) सकारात्मक परिणाम होतो.
>>>>>>>

धन्यवाद शरद, चांगली पोस्ट.
त्याचा इतर कामावर >> हे जास्त महत्वाचे वाटले Happy

आपलं जिवन बर्‍यापैकी आपल्या विचारांवरचं अवलंबुन असतं.... तेव्हा विचार करण्याची पध्दत एकदम महत्वाची....!आशावादी असणं कधिही चागलं.