Submitted by भारती.. on 26 September, 2014 - 05:41
भावस्थिराणि जननांतरसौहृदानि
असंख्यात संवादवेळा विराल्या जसे श्वास निश्वास हिंदोळती
ऋतूंच्या रित्या ओंजळीतून गेल्या तृषा वाहुनी जीवनासंगती
असे काय आता नव्याने घडावे बरी स्तब्ध होती जिवाची मठी
निरानंद एकांत तो शांत साठे मिटे वाटला गल्बला शेवटी
अकस्मात तो आर्तशी हाक आली नभाची घरे सात ओलांडुनी
कुणी ओळखीचेच आहे म्हणावे कसे कल्पनेनेच ओसंडुनी
जसा तीक्ष्ण वारा फटीतून येता घराला नवा गारवा लाभतो
सुखाशा तशी पाझरे अंतरंगी तमाच्या तळाशी दिवा लागतो
खरे काय आहे ? कशी ही असोशी ? कशाला हवी बाह्य आलंबने?
नव्या संहितेतील विस्थापितांशी जुने मौन सोडून संवादणे
जिवाला जणू मंत्र घाले अशी गूढ ही ओढ आत्मीयतेची किती
कळे कालिदासास – जन्मांतरीच्या स्मृती या विभासांमध्ये खेळती..
-भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येकाचेच आभार ही कविता
प्रत्येकाचेच आभार ही कविता स्वत:ची करून घेण्यासाठी आपापल्या तऱ्हेने आणि भुईकमळ , तुमच्या प्रतिसादातच एक कविता आहे..
>> केवळ शब्द व रुपाकडे लक्ष
>> केवळ
शब्द व रुपाकडे लक्ष दिले तरीही अनोखे समाधान
मिळतेच पण त्याबरोबर आशयाशी तार जुळली तर
मात्र मिळणारा आनंद अवर्णनीय असाच असतो.<< सहमत अमेयदांशी .
रचना प्रचंड आवडली ,हे वे सां न लगे ...
सुरेख !
सुरेख !
Pages