उपासाचे सॅलेड - नवरतत्री विशेष

Submitted by गोपिका on 25 September, 2014 - 10:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. काकडी -१
२. सफरचंद- १
३. ऊकडलेला बटाटा -१
४. भाजलेले दाणे - १/२ कप
५. ओले किंवा सुके खोबरे - १/२ कप
६. लिंबाचा रस - २ चमचे
७. मीठ - चवीनुसार
८. साखर - १ चमचा
९. खजूर - ८ ते १०
१०. बारिक चिरलेली कोथिंबीर - १/२ कप

क्रमवार पाककृती: 

१.काकडी,सफरचंद्,बटाटा,खजूर यांचे आपल्यला हवे तेवढे मोठ्या आकाराचे काप करावेत.सॅलेड साठी करतो तसे.
२.एका मोठ्या बोल मध्ये हे सर्व घेऊन त्यात दाणे,खोबरे,मीठ्,साखर्,लिंबाचा रस्,कोथींबीर घालून व्यवस्थित मिसळावे.
३.हवे असल्यास्,तूप जिर्‍याचि फोडणी देऊ शकता.
४.परत थोडे खोबरे व कोथिंबीर घालून सजवावे.
५.आणि अवश्य खावे
६. फोटो प्रतिसादात देत आहे

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

१. ह्यात अननसाचे तुकडे ही छान लागतात
२. प्रत्येक घरात उपासासाठी(खायला) चालण्यार्‍या गोष्टींची यादी वेगळी असते.त्या प्रमाणे एखाधा जिन्नस कमी जास्त करू शकता.मी ड्राय क्रेन्बेरीस घातल्या आहेत.मनुके हि छानच लागतात.
३.चालत असल्यास साखरे चा ठिकाणी मध वापरले तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
ऐन उपासाचा वेळी मेंदू वापरावा लागला
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीती,दिनेशदा धन्यवाद,
दिनेशदा...व्हाय दिस कोलवेरी डी??? उपासाचा अवधीत असले भारी भारी पदार्थ आणताय माबोवर Proud

पाकृमधे फोटो टाकण्याची क्रमवार पाकृ.
*
पहिला प्रतिसाद संपादित करायला घ्या.
त्यात < img src =" .." > असे जे काही दिसतेय, ते संपूर्ण सिलेक्ट करून कॉपी (Ctrl+C) करा.
ब्राऊजरची 'बॅक' की दाबून प्रतिसाद संपादनातून बाहेर या.
आता लेख संपादित करायला घ्या.
त्यातील
"फोटो प्रतिसादात दिले आहेत" हे वाक्य माऊस वापरून सिलेक्ट करा.
Ctrl+V दाबा, म्हणजे त्या वाक्याऐवजी तुमच्या फोटोसाठीचे एचटीएमएल कोड तिथे चिकटेल.
प्रतिसाद तपासण्याचे बटन दाबून चित्र दिसते आहे, याची खात्री करा.
सेव्ह करा.
*
सॅलड छान आहे.