कयास

Submitted by समीर चव्हाण on 20 September, 2014 - 02:14

छान हा प्रवास चालला
आंधळा कयास चालला

चालले कुठे कधी कुणी
एक-एक श्वास चालला

दशक लोटले मरून मी
वेंधळा तपास चालला

रात्र कसबशीच काढली
दिवसही उदास चालला

काय विचकटून चालले
ताडकन् घरास चालला

मारतोय हात पाय पण
जन्म हा तळास चालला

जन्मभर ‘समीर’ हा तसा
फक्त चालण्यास चालला

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

दशक लोटले मरून मी
वेंधळा तपास चालला

रात्र कसबशीच काढली
दिवसही उदास चालला

मारतोय हात पाय पण
जन्म हा तळास चालला

वाह ! अतिशय आवडले शेर .

जमीन आवडली

अनेक शेर आवडले . मतला मस्तच . श्वास चा दुसरा मिसरा मस्त पहिला सामान्य वाटला(वै.म) पण शेर आवडलाच .तपासचा शेर लोकाना इतका का आवडला समजले नाही मला जस्ट आवडला . कसबशीच हा शब्द आवडला शेरही आवडलाच घरास चा शेर मला नीट समजला नसावा मक्ता व्याकरणदृष्ट्या तृटीपूर्ण वाटला पण अर्थ जितका पोचला तितका आवडला

मारतोय हात पाय पण
जन्म हा तळास चालला <<<सर्वाधिक आवडला

धन्यवाद

दोन एक शेर वगळता आवडली गझल.

रात्र कसबशीच काढली
दिवसही उदास चालला ...जास्त आवडला.