नुकतेच वैर झाले

Submitted by mi_anu on 10 September, 2014 - 03:57

(गझलेत टाकू की नको? गझलेचे निकष पूर्ण होतायत का? जाऊदे टाकतेच.)

आयुष्य बोर झाले, मन सैरभैर झाले
माझे आता स्वतःशी, नुकतेच वैर झाले

खा जैन पावभाजी, कांदे महाग झाले
पोटे अजून खपाटी, जाडे कुबेर झाले

खुपती तना मनाला, वैफल्यरुप भाले
जखमा कश्या भराव्या, दुर्मीळ वैद्य झाले

न्यावी सदा दुचाकी, फसतात कारवाले
कोंडीत वाहतूकीच्या, सारेच दीन झाले

कामे किती कशी मी, बनवू घरी मसाले
सुगरण 'अनु' कधी मी, कौशल्यहीन झाले ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users