रीया - मलाही कोतबो - नर्मदा गोखले

Submitted by रीया on 9 September, 2014 - 03:52

हुश्श! दमले बाई! आता तुम्हा सगळ्यांशी बोलायला मी मोकळी. बरं चहा घेणार का तुम्ही? काय बाई विचारतेय मी हे! हो म्हणालात तरी इतक्या लोकांसाठी चहा थोडीच करता येणार मला एकटीला. पण काय आहे ना की आमच्या घरी आल्या गेलेल्याला आलं घालून चहा द्यायची पद्धत आहे. देसायांनी आमचंच बघुन सवय लावून घेतली हो! पण त्यांना शोभतं चहा देणं. त्यांचा काही आमच्या एवढा मोठा गृहौद्योग नाही. त्यांना काही म्हणणार नाहीत लोकं पण आम्ही किमान बासूंदी विचारायला हवी ना लोकांना ? पण आईंनी काटकसरीच्या सवयी लावून ठेवल्यात त्यामुळे आम्ही चहाच विचारतो. आता तुम्ही माझं म्हणणं ऐकायला आलाय म्हणल्यावर तुम्हाला काही तरी द्यायला हवं पण मी फार दमलेय त्यामुळे समजून घ्या.
तुम्हाला वाटत असेल हिला दमायला काय झालं? घरात एवढ्या ७ बायका. हिला कामं तरी असतात काय? पण असं नाहीये अजिबात. आई म्हातार्‍या. त्यांना चष्मा लावून पेपर वाचण्याशिवाय आणि आम्हाला सतत ओरडण्याशिवाय इतर काम करवत नाहीत. आणि जान्हवीला घरात रूम्स सापडत नाहीत. तिथुन सुरुवात आहे. म्हणलं जरा सुन आली घरात आता तरी आराम मिळेल तर कसलं काय! ती डोक्यावर पडली आणि कामं (परत) माझ्या(च) गळ्यात पडली.
बर शहाणपणा हिचा काय सांगू तुम्हाला? आधी त्या ४ जणी असायच्या सोबत तर मदत व्हायची. पण या बाईने त्यांना कामाला लावून दिलं आणि सासूला ठेवलंय घरातच. सासूच्यातले गुण नाही दिसले कधी हिला ते. सुनवास सुनवास म्हणतात तो हाच हो! लोकांना वाटतं गुणाची सुन माझी. पण तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय ते माझं मलाच माहीत.
आणि एवढ्या १० -१२ जणांचं काम एकटी सुन कशी करेल हे लक्षातही नाही आलं आमच्या आईंच्या. इतर वेळेला मारे 'याला समजुन घ्या, त्याला समजुन घ्या' चा गजर करत फिरत असतात. स्वतःच्या सुनेला समजुन घ्यायची वेळ आली की कुठे जाते यांची बुद्धी? पण बोलणार कोणाला? बेबीपुढे काही बोलायची सोय नाही. नुसती चोंबडी आहे ती. लग्गेच पळत जाऊन आईंना सांगेल. सरूला काही सांगावं तर अत्यानंद महाराजांच्या मठात घेऊन जाईल आणि शरयूला काही सांगायचं तर तिसरं वाक्य बोले पर्यंत ही पहिलं वाक्यच विसरून जायची. इंदू वहिनींना काय बोलणार? माझीच वाक्य मला ऐकवत बसतील नाही तर इंग्रजी मधे त्याची चिरफाड करतील.
आणि बाकीचे राहू द्यात. आमच्या यांना कळायला नको? इतके वर्ष बायकोला एकटीला सोडुन गेले आणि आता या वयात उगवलेत परत. शरयू- कांतांच तरी बरं...रोमान्स तरी करता येतो. आमचं काय??? नुसतं पदर घ्या, तोंडाला लावा आणि रडत बसा.
तुम्हाला म्हणून सांगते रात्री पदर पिळला ना की एक बादली पाणी जमा होतं. दिग्दर्शकाला म्हणाले काही नाही तर किमान साडीला स्पंज तरी बसवून दे तर म्हणतोय कपडेपटावर जास्त खर्च नाही करत मराठी मालिकांमधे आणि तसं पण म्हणे मालिकेची हिरोईन जान्हवी आहे.
ही कसली ओ हिरोईन? तिच्या आयुष्यात काय वेगळं घडत सांगा? तिची आणि श्रीची लव्हस्टोरी मग तिचं आमच्या घरात सेटल होणं मग तिने सगळं विसरणं आता परत तिची आणि श्रीची लव्हस्टोरी सुरू झालीये आता पुन्हा घरात सेटल होणे फेज सूरू आहे आणि मग पुन्हा??????
असो! मी नाही बाई काही बोलत. श्री साठी ती सायलीच बरी होती. किमान श्रीला घेऊन घरा बाहेर तरी गेली असती. ही काही आम्हाला सोडत नाही. जाते येते जाते येते. आणि श्रीला तर काही अक्कलच नाही. एकतर ही अशी बायको केलीये. किमान आईला आईपणाचा मान तरी द्यावा. माझा मुलगा माझ्या घरात सगळ्यांना आई म्हणतो???
कधी कधी तो म्हणतो ना की 'माझं माझ्या आयांवर फार्प्रेम आहे' तेंव्हा तर मला भितीच वाटते की तो जन्मला तेंव्हा तिथे असलेल्या आया बद्दल बोलतोय की काय हा पण सध्या तरी विग्नेश्वर कृपेने माझ्या प्रेमात फक्त ५ च वाटेकरी आहेत.
प्रेमाचं राहू द्या पण आई म्हणुन मला द्यायची काही किंमत ही देत नाही हा. बाहेर जायचं तर बेबी वन्सना विचारून जातो. त्या बेबी वन्स परवा जान्हवी बद्दल बोलताना म्हणे 'लग्न झालेल्या मुलीने किती दिवस माहेरी रहायचं?' मी वाकडा डोळा करुन पाहिलं ही त्यांच्याकडे पण डोळ्याला लावलेल्या पदरामुळे दिसलं नसावं ते कोणाला. हां तर मी काय सांगत होते हा आमचा श्री... बाहेर जाणार तर बेबी आई ला सांगून, अफेअर बद्दल सांगणार शरयू आईला, बाकी सगळं सांगणार आई आजीला, जान्हवीसाठी केलेली चोरी सांगणार सरू आईला, सतत आवतीभवती फिरणार जान्हवी आईच्या आय मिन जान्हवीच्या ! सख्ख्या आईची काही कदर नाही कार्ट्याला. एक मिनिट कधी माझ्या कडे यावं काही दुखतं खुपतं का बघावं.. पण कशाचं काय... त्या शशिकला बाईंचं नशिब तरी थोर हो! किमान सावत्र पोरगी घरात कामं करते, पैसे देते, प्रेम करते, सगळं ऐकते. त्यांनी हिच्यासाठी टकला आपटे बघितला तरी जान्हवी काही म्हणाली नाही. आणि आमचं कार्ट! आम्ही बघितलेली सोन्यासारखी मुलगी न बघताच दुसरी घेऊन आला. आला ते आला ती पण ही अशी.... एखाद्या भागात तिला ५ वेळा 'काहीही हं श्री' म्हणायला लावलं तर पुर्ण मालिकाच त्यात संपवून टाकेल ही!

आता मात्र मी ठरवलंय खुप सहन केला अन्याय. काल देसायांच्या घरात मेघनाच्या आईने जे काही केलं ते पाहून मीही ठरवलंय की अन्याय सहन नाही करणार.
आता यांना सांगते घरात नोकर-चाकर आणा. आणि तुमच्या अमेरिकेतल्या मुलीला भारतात बोलवा. तिला अर्चू कडे ट्रेनिंग घ्यायला पाठवते आणि मी प्रांजलच्या आईकडे जाते ट्रेनिंग घ्यायला. त्याचं काय आहे ना की घरात नोकर ठेवले तरी त्यांच्याकडुन कामं करुन घेता यायला हवीत ना.
पण पुन्हा एक प्रॉब्लेम आहे. आमच्या श्रीने त्यांना सखू आई आणि शांता आई करुन टाकलं आणि पुन्हा सगळी कामं मलाच करावी लागली तर???????????????????

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही प्रवेशिका स्पर्धेसाठी नाही Happy
मला स्वतःला इथे लिहायला खुप काही सुचत होतं, संयोजक म्हणुन लिहिता ही येत नव्हतं आणि रहावत ही नव्हतं Happy
तेंव्हा आता प्रवेशिका द्यायची वेळ संपल्यावर मी माझी प्रवेशिका देते आहे Happy
ही प्रवेशिका तशीही नियमांमधे बसत्नाही Happy सहज गंमत म्हणून लिहिलं आहे Happy

संयोजक म्हणुन लिहिता ही येत नव्हतं आणि रहावत ही नव्हतं >>>> वहीच मै सोच्या रियाने लिखा क्यु नही अभीतक

मस्त लिहिलंय Chocolate_.jpg

होसुमीयाघ मधली सगळीच पात्र प्रचंड त्रस्त दिसतात. सगळ्यानाच कोतबो. सुरवात जान्हवीच्या पडालेल्या चिपेपासून झाली आणि शेवट आई नंबर १. Biggrin

Proud

इन्ना तर तर .. मला तर कोणाला उचलू असं झालेल Proud

थँक्स ऑल Happy

केदारदादा Happy
(मी आता चॉकलेट खाणं सोडून दिलंय .... तू मला पापडाचं पिठ दे Wink )

मस्तच रिया.. मला आधी नर्मदा गोखले म्हणजे आई आजी वाटली (सिरिअल बघाय्ची सोडुन दिलेय). पण नंतर कळलं..
मस्त जमलय Happy

रीयाचा निषेध करायचा असेल तर तो करता येईल का ? असा विचार करीत होतोच मी हा व्यथा लेख वाचल्यानंतर... पण मग म्हटले ही पोरगी परत त्या नर्मदाची भेट घेणार आणि मी लिहिलेले त्याना दाखविणार...मग परत बादलीभरून होईल इतके पदरातून अश्रू त्या काढणार आणि परत ये रे माझ्या मागल्या....आमच्या बिचार्‍या जान्हवीच्या दु:खाला मर्यादा राहिलेल्या नाहीतच, त्या आणखीनच विस्तारणार.

रीया....इतके काय केले आहे गं आमच्या जान्हवीने ? बिचारीच्या कपाळी सटवाईने काही दिवस त्रासभोग लिहिले आहेत म्हणून ती भोगते आहे....याचा नर्मदाबाईना कशाला त्रास व्हायला हवाय ? आणि जान्हवीच्या ऐवजी श्री साठी यानी म्हणे..."सोन्यासारखी मुलगी पाहिली होती.>.....हायला, सोन्यासारखी ? तिने रंग दाखविलेले नर्मदाबाईना माहीत नाही म्हणून बरे.....डोक्यावर घसासा मीरे वाटले असते सहाही सासवांच्या....तेव्हा समजला असता हिसका त्या जहाल पोरीचा....मग समजली असती जान्हवीची लायकी.

आपल्या येडपट पोरग्याला जीवनसाथी म्हणून लाभली आहे अशी ही देवाघरची पोरगी त्याबद्दल नर्मदाबाईंनी २१ मोदकाचा नैवेद्य दाखविला पाहिजे सकाळसंध्याकाळ....गोखले गृहउद्योगातून फुकटात मिळेलच सारे काही.

थँक्स लोकहो Happy

मामा, Lol

त्या नर्मदा बाई म्हणतायेत ना की ती सोन्यासारखी मुलगी किमान बाहेर तरी घेऊन गेली असती श्री ला Wink
ही आपली जाते येते जाते येते Proud

तुम्ही पण काही समजून घेत नाही त्यांना...बिचार्‍या!!!!! अन्याय आहे हा Proud

गोखले गृहउद्योगातून फुकटात मिळेलच सारे काही. >>> नाही ना ते ही मिळत नाही त्यांना Lol
बिचार्‍यांना स्वतः करावे लागतील मोदक आणि तुमची जान्हवी ते मोदकळखाऊ की नको विचार करत भसाभसा गिळेल Proud

बाकी श्री येडपट आहे हे जामच खरं Proud
(म्हणून तर अशी बायको केली)
ikade tikade palanari smayli.gif

"....(म्हणून तर अशी बायको केली)....."

~ केली ना ? मग, नांदव की आता तिला प्रेमाने, गुण्यागोविंदाने ! बिचारी सकाळसंध्याकाळ गरीब गाईसारखी वावरत असते सहा सासवांच्या भीतीत....हे ह्या येडबंबूला समजायला नको का ? ऑक्सफर्डचा एम.बी.ए. आहे म्हणे. म्हणजे काय शिकलाय तिथे तो ? लिंबाच्या लोणच्याचे पॅकिंग ?

अरे रीयाबाबा....मन मोकळं करू देत ना ! मी का अडवू त्याला वा तिला ? पण एकांगी नको गं....

"...ही कसली ओ हिरोईन? तिच्या आयुष्यात काय वेगळं घडत सांगा?..." ~ ही नर्मदाबाईची वाक्ये पाहा ना जरा. काय दर्शवितो ह्या बाईचा स्वभाव यातून ? जान्हवी आहेच आमची हीरॉईन, मग तिच्या कलाने घ्यावे की नको ? सहा स्त्रियांना आवडणार नाही म्हणून स्वतःच निर्णय घेऊन साडी नेसते....तशीच वावरते अवघडून. ही बाब नर्मदाबाईला दिसत नाही, काढ म्हणावे डोळ्यावरून तो पदर.... सायली असती तर ? एकटी ह्या सहाजणींना पुरून उरली असती....मग समजले असते कुणाच्या आयुष्यात काय वेगळं घडते ते.

पियूबेबी....रीटर्न कशाला....मी आहेच आमच्या लाडक्या भाचीच्या प्रेमात.....काहीही झाले तरी. आता ही रीया बघ ना....त्या नर्मदाबाईची बाजू घेऊन नळावर आलीया भांडायला.....म्हणजे अगोदर सहा आहेतच त्यात ही सातवी. कसे दिवस काढायचे आमच्या जान्हवीने ? बारीक होत चालली आहे दिवसेदिवस.

बारीक????????????????????????????

मामा ये क्या हो गया आपको?
जरा सत्य की नजरसे देखो.......... ढोल झालीये बया ती.
नर्मदाच बिचारी बारीक होईला लागलीये Lol

रीया...

तू तात्काळ तुझ्या पुण्यातील "वासन आय केअर सेंटर, मुंढवा-खराडी रोड, मगरपट्टा सिटी, हडपसर" इथे जा आणि कार्ड काढ....डोळे दाखव आणि दाखवताना डॉक्टरना सांग, "दादाभाऊ, मला आजकाल सार्‍या पोरी ढोलच झाल्यासारख्या दिसतात....काय करू ?" त्यावर ते निश्चित्तच ठोस उपाय सांगतील.....तो फॉलो कर....मग आमच्या भाचीच्या तब्येतीकडे नव्या नजरेने बघ. उमजून येईल तुला ती किती बारीक होत चालली आहे ते.

.....आणि नर्मदा बारीक होत चालली आहे....होई ना का तिकडे....तिची काळजी घेणारे आलेत ना अमेरिकेहून... बघतील ते.

रीया , मी ही सिरियल कधी पाहिली नाही , पण नेहमी माबोवर अपडेट्स वाचत आले आहे .
नर्मदा बाईंची कळकळ मनाला भिडली Happy

है शाब्बास!!! भारी लिहिलंस, रिया Lol

>>>>हा आमचा श्री... बाहेर जाणार तर बेबी आई ला सांगून, अफेअर बद्दल सांगणार शरयू आईला, बाकी सगळं सांगणार आई आजीला, जान्हवीसाठी केलेली चोरी सांगणार सरू आईला, सतत आवतीभवती फिरणार जान्हवी आईच्या आय मिन जान्हवीच्या ! सख्या आईची काही कदर नाही कार्ट्याला. <<<< हे एकदम पटलं... एका आईची ही व्यथा खरोखर असू शकते.. तिला बिचारीला अगदीच त्यागमूर्ती बनवून टाकलंय मालिकेत... तू तिचं मन ओळखून तिच्या दु:खाला वाचा फोडलीस... विघ्नेश्वर तुझे कल्याण करो!! Happy

मुग्धटले....मी रीयाशी भांडतोय ? अगं, मी सत्याची बाजू घेऊन ती मांडली, कळकळीने. उलटपक्षी तू रीयाला डोळे मोठ्ठे करून विचारायाला हवेस, "रीया, कशाला नर्मदाबाईंची कड घेतेस तू ? जान्हवी आपली आहे ना ? तिला सांभाळू आपण..." असे झाले असते तर मग मलाही आनंदच झाला असता.

आता ही सामी देखील आली रीयाचीच बाजू घेऊन. बिच्चारी जानू आमची.

Pages