Submitted by kuldeep patil on 8 September, 2014 - 06:54
आपलं दु:ख आपल्याकडेच ठेवायाचं असतं
जिवन आपलं आहे ते आपणचं जगायाचं असतं
दु:खांचं काय ते तर येतचं असतात
आपण फक्त हसायचं असतं
हसता हसता थोडं रडायचं असतं
यालाच जिवन अस नाव असतं
जिवन हे एक खेळाप्रमाणे असतं
जिंकता जिंकता एका दिवशी हरायचं असतं
कितीही हरलो तरी रडायचं नसतं
पण हरता हरता सर्वांना हसवायचं असतं
रडवणारे तर खुप असतात
त्यांच्यासठी आपणही रडायचं असतं
जिवनाचा हा रंगमंच असचं रंगवायचा असतं
अभिनयाने आपल्या सर्वांना हसवायचं असतं
आणि आपण मात्र रडायचं असतं
आतून रडलो तरी वरून हास्य दाखवायचं असतं
©कुलदीप
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा