आता कशाला शिजायची बात - आरती. - पौष्टीक आणि पोटभरीची मूग डाळीची कोशिंबीर

Submitted by आरती. on 7 September, 2014 - 23:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

moong 6.jpg
१. मूगाची डाळ - १/२ वाटी
२. खवलेल ओल खोबर - १ टे.स्पून
३. काकडीचे तुकडे किंवा किसून- १ टे.स्पून
४. डाळींबाचे दाणे - १ टे.स्पून
५. सफरचंदाचे तुकडे किंवा किसून - १ टे.स्पून थोडासा लिंबाचा रस लावून घ्या.
६. गाजर किसलेले - १ टे.स्पून
७. हिरवी मिरची - १ बारीक तुकडे करुन किंवा उभे स्लाईस करून
८. लिंबाचा रस - १/२ टि स्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. साखर - चवीनुसार
११. कोथिंबीर बारीक चिरून = १ टे.स्पून
moong 1.jpg

फोडणीच साहित्य
१. मोहरी - १/२ टी स्पून
२. हिंग - चिमूटभर
३. कढीपत्ता - ५-६ पान
४. सुकी लाल मिरची - २ तुकडे करून
moong 2.jpg

क्रमवार पाककृती: 

१. मूगाची डाळ १ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी निथळून घ्यावे.

२. एका मोठ्या वाटीत मूगाची डाळ, काकडीचे तुकडे, गाजराचा किस, हिरवी मिरचीचे तुकडे, ओल खोबर, लिंबाचा रस, मीठ, साखर मिक्स करून घ्या. मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये एक खड्डा करून ठेवा.

moong 3.jpg

३. तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे घाला व गॅस बंद करून हिंग घालून ही फोडणी लगेच खड्डा केलेल्या मिश्रणात ओतून साईडच्या मिश्रणाने खड्डा बंद करून झाकण घालून ठेवा.

४. ५ मिनिटांनी सर्व मिश्रण चमच्याने ढवळून त्यात डाळींबाचे दाणे, सफरचंदाचे तुकडे आणि कोथिंबीरने सजवा.
moong 4.jpg

५. बाजूला थोड काकडी, गाजर आणि डाळींबाचे दाणे वापरून फुल बनवायच प्रयत्न केला. आभार मनीमोहर. त्यांच गाजराच फूल एनवेळी आठवल. Happy

moong 5.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून आहे. :)
अधिक टिपा: 

जेवण किंवा नाश्ता म्हणून पोटभरीची आणि पौष्टीक कोशिंबीर.
प्रसादासाठी आणि लग्न समारंभात ही कोशिंबीर आवर्जून केली जाते.

माहितीचा स्रोत: 
अम्मा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतंय Happy

फोटोज चं डेकोरेश्न ही सुंदर Happy

ताई जरा पाकृ आहारशास्त्र आणि पाककृती विभागातून काढा आणि मायबोली गणेशोत्सव २०१४ विभागात टाका बरं Uhoh

शब्दखुणांमधे आता कशाला शिजायची बात,मायबोली गणेशोत्सव २०१४ हे २ असेच्या असे कंपल्सरी यायला हवेत Happy

आरती, छानच वाटतोय पदार्थ. तिरंगा क्यूट. सजावट सुंदर... गाजराच फुलं तर अप्रतिम... धन्यवाद माझी आठवण काढलीस म्हणून

सौदिंडियन मैत्रिणींच्या घरी याचेच थोडे वेगळे रूप खाल्ले आहे. मला कच्च्या मुगाच्या डाळीपेक्षा हरभरा डाळ आवडते त्यामुळे कधी केलीच तर ह.डाळ घालून करेन.

खड्डा करून फोडणीला झाकून का ठेवतात?

मूगडाळ कच्चट नाही का लागत?
सिंडे, कढी, कोशिंबिरीला वरून फोडणी दिल्यावरही झाकण घालायचं असतं म्हणजे वास, चव मुरते.

मनीमोहर, चनस, मामी, तृप्ती आवटी, सायो, अदिति धन्यवाद.
तृप्ती आवटी, मामी आणि सायो ह्यांनी उत्तर दिल आहे.
मूगडाळ कच्चट नाही का लागत? <<< सायो, नाही.
पोटभर कच्चे मुग कसे खाणार <<< अदिति, ज्यांना आवडत ते खातात. Happy

छान आहे कोशिंबीर. मांडणी छान केलीये.
मी मसुराच्या डाळीची कोशिंबीर नेहमी करते. फक्त कच्चा कांदा, कोथिंबीर, हिमी-हिंग-मोहरीची फोडणी आणि वरून लिंबू पिळते. आता अशी करून बघेन.

हे असलं फुल बिल बनवतेस अन तरिही म्हणतेस की मी सुगरण नाही म्हणुन.. शोनाहो.. मुडा सोडुन बाकीच्याची बनवेन कोशिंबीर Wink