माझगाव विभाग गणेश दर्शन __/\_‌‍_

Submitted by तुमचा अभिषेक on 7 September, 2014 - 08:14

या शनिवारी माझगाव विभागातील सार्वजनिक गणपती बघणे झाले. मुलगी लहान असल्याने जास्त फिरता आले नाही, मात्र तिच्यासाठीच म्हणून जाणे झाले असल्याने नेटाने जवळच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले.

आमच्या माझगाव विभागाला सार्वजनिक गणपतींची परंपरा दक्षिण मुंबईतील ईतर गणेशोत्सवांप्रमाणेच जुनी आहे. सध्या नवसाच्या आणि मानांच्या गणपतींशी स्पर्धा करण्यात कुठेतरी कमी पडल्याने पहिल्यासारखा रांगा लागत नाहीत, पण मंडळांचा उत्साह मात्र आजही आटला नाही, ना भक्तांचा भक्तीभाव ओसरलाय. बस्स तोच या चित्रांमधून शेअर करतो आहे.

मी काही फोटोग्राफर नाही, हौसेने म्हणूनच काढलेले फोटो आहेत. पण बाप्पांचे लोभसवाणे रूप, सुबक मुर्त्या, आणि आकर्षक सजावट माझ्या चित्रणातील साधेपणा सांभाळून घेतील.

गणपती बाप्पा मोरया !

_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-

प्रचि १

01 SHREE NIVAS 1.JPG

प्रचि २ - देव आणि दैवत !

02 SHREE NIVAS 2.JPG

प्रचि ३

03 ANJEER WADI 2.JPG

प्रचि ४

04 ANJEER WADI 1.JPG

प्रचि ५

05 TULSHI WADI.JPG

प्रचि ६

06 HATTI BAAG.JPG

प्रचि ७

07 MAPALA WADI 1.JPG

प्रचि ८

08 MAPALA WADI 2.JPG__/\__

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान फोटो आहेत. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे लाईनीत उभे रहाण्याचे कष्ट वाचवलेत. :स्मितः

गणपती बाप्पा मोरया !

अरे, आमच्या माझगांवच्या गणपतीचे फोटो बघून बरं वाटलं. Happy

माझगाव डॉकच्या गणपतीला आम्ही दरवर्षी जायचो. अंजीर वाडी आणि (बहुतछि) चिकूवाडीच्या गणपतीलासुद्धा.

नंदिनी, माझगावच्या घरगुती गौरीगणपतींचे विसर्जन भाऊच्या धक्क्यालाच होते. रात्री कधीतरी उशीरा घरी परतताना तिथले बघत यायचो.

अदिती, ... अभिजीत नाही अभिषेक Sad
आणि हो कसे म्हणजे काय, माझगाव हा आपलाच एरीया आहे Wink
अ‍ॅक्चुअली माझगावच्या गणपतींना बाहेरची गर्दी कमी असते हल्ली, त्यामुळे निवांतपणे काढता आले फोटो. आणि मुलीला घेऊन गेलेलो तर शक्य होते तिथे गणपतीच्या पायावर तिचे डोके ठेवायची परवानगी मागितली Happy

अमा, पाऊसाला टांग देऊनच घराबाहेर पडलेलो, आणि वरीलपैकी आमच्या घरापासून सर्वात लांबचा गणपती निव्वळ ५-६ मिनिट वॉकेबल अंतरावर आहे. येऊन जाऊन एकूण चालणे २० मिनिटांपेक्षा जास्त झाले नाही. Happy

जिप्सी, सेम टू यू रे, तुलाही धन्यवाद, कारण इथे प्रचि शेअर करायची प्रेरणा तूच !
आणि प्रचि ७ बाप्पासाठी पुन्हा सेम टू यू.. कारण आमच्या घरच्या बाप्पाची आठवण करून देणारी मुर्ती आहे ती.. पर्रफेक्ट मोजमापात..