आता कशाला शिजायची बात - sadho - तारातोर (कूल काकडी सूप ).

Submitted by sadho on 7 September, 2014 - 03:27
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. काकडी, मोठे तुकडे करून - १.

२. शेपू - १ जुडी.

३. अक्रोड - ३ - ४ तुकडे.

४. लसूण पाकळ्या १- २.

५. दही - १ वाटी.

६. जिरेपूड, मिरेपूड, मीठ - चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

DSC_0040_a.jpg

१. काकडीची साल काढून मोठे तुकडे करून घ्यावेत.

२. शेपू निवडून धुवून चिरून घ्यावा.

३. लसूण पाकळ्या सोलून छोटे तुकडे करून घ्यावेत.

४. अक्रोडाचे तुकडे करून घ्या.

५. मिक्सरमध्ये दही, काकडी, शेपू, लसूण, अक्रोड, मीठ, जिरेपूड, मिरेपूड घालून बारीक वाटून घ्यावे.

६. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सूप प्यावे.

DSC_0056_a.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

१. तारातोर ह्या बल्गेरियन सूपची ही रेसिपी आहे, त्यात जिरेपूड आणि मिरेपूडची अ‍ॅडिशन केली आहे.

२. कच्च्या लसणीची चव आवडत नसल्यास एकच पाकळी घातली तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
बल्गेरियन सूप रेसिपी - तारातोर व स्वप्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव ! मस्तं दिसतय. तोंपासू

एकंदरीत या स्पर्धेन ऊन्हाळ्याची सोय करुन ठेवलेली आहे. Wink

मस्त दिसतंय हे कोल्ड सूप!

एक बदल कराल का प्लीज? या सूप चं नाव 'तारातोर' आहे. तेव्हढं प्लीज बदलाल का हेडरमध्ये.
ही लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Tarator

ही रेसिपी आवडली. सगळे घटकपदार्थ ओळखीचे आहेत शिवाय काजूबदामखजूर वगैरे "तिकडच्या" कॅटेगरीमधले नाहीत. Happy

नक्की करणार.

सोपी पाकृ आहे पण
काकडी+शेपू+लसुण कॉम्बो आवडेल का नाही ते कळत नाहीये.