रंगात रंगुनी सार्‍या - गजानन - आरोही

Submitted by गजानन on 6 September, 2014 - 12:46

पाल्याचे नावः आरोही
वयः पाच वर्षे १० महिने.

चित्र १: बाप्पाची किक!
बाप्पाच्या मागे वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत वगैरे शेप्स आहेत. त्यांनाही खेळायला आवडतं म्हणून ते आलेत पाठीमागे लागून. मागे छत्रीही आहे. पण पाऊसच नसल्याने हिरमुसली आहे.

चित्र २ : निसर्गप्रेमी बाप्पा
मागे मार्बल बॉल्स आणून ठेवलेत. झाड लावून झाल्यावर त्या गोट्यांनी खेळणार आहे. इथे डावीकडे निळी छत्री वर उंच गेली आहे. पाऊस शोधायला. तिथे वारा आल्यामुळे जरा वाकडी झाली.

शेप्स इथेही तरंगताहेत हवेत. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरोही , मस्त रंगवले आहेस बाप्पा...का म्हणुन बाप्पाला एकाच रंगात बांधून ठेवायच?.... तुझ्या जगात सगळे मुक्त आहेत हे खूप आवडलं....शेप्स... छत्री Happy
काम झाल्यावर लगेच गोट्या खेळायची सोय आहे हे पाहून बाप्पा लगेच काम आवरतील Wink

आरोही, मस्तच गं!

पहिल्या चित्रातल्या बाप्पाच्या मुकुटावरचे डीझाइन आणि दुसर्‍या चित्रातले रंगीत रोपटे मला खूपच आवडले.

मागे छत्रीही आहे. पण पाऊसच नसल्याने हिरमुसली आहे.>>> ओ बाबा , ती छत्री नाही हो. छत्र आहे बाप्पाच्या डोक्यावरचे. तुम्हाला चित्र नीट बघताच येत नाही Happy