आता कशाला शिजायची बात - आरती.- मस्तानी पान

Submitted by आरती. on 6 September, 2014 - 02:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खजूर - ४
लवंग - २
वेलची - २
सुक खोबर - एक छोटा तुकडा
विड्याची पान - २
P05-09-14_22.06[1].jpg

तुम्हाला जेवढी मस्तानी पान बनवायची असतील तेवढी तुम्ही घ्या. आमच्याकडे खाणारी तोंड कमी म्हणून मी दोनच पान घेतली. Happy

क्रमवार पाककृती: 

१. खजूराच्या बिया काढून सुरीने छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे हाताने मळून गोळा करून घ्या.
२. वेलची आणि लवंगची पावडर खलबत्त्यात करून घ्या.
३. सुक्या खोबर्‍याची पाठ खरवडून किसणीवर किसून घ्या. थोड किसलेल सुक खोबर बाजूला काढून ठेवा.
P05-09-14_22.41[1].jpg
४. खजूराच गोळा, वेलची आणि लवंगाची पावडर, किसलेल सुक खोबर एकत्र करून त्याचे छोटे लाडू करा.
५. किसलेल्या खोबर्‍यात लाडू घोळबून घ्या.
६. विड्याच्या पानावर हे गोळे ठेवा.
P05-09-14_23.02.jpg
७. पान तयार करा Happy व लंवगाने टोचा.
P05-09-14_23.28.jpg

वाढणी/प्रमाण: 
मस्तानी पान तुम्हाला जेवढे आवडते तेवढे खा. :)
अधिक टिपा: 

१. ह्यात मसाला सुपारी, गुलकंद घालू शकता पण इथे मी वापरल नाही आहे.
२. लवंग ने टोचायच नसेल तर एक चेरी टुथपिकला लावून ते पानाला टोचा.

माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती, नियमानुसार शिर्षक बदल आणि शब्द खुणांमधे मायबोली गणेशोत्सव २०१४, आता कशाला शिजायची बात या दोन खुणा टाक Happy

धन्यवाद दिनेशदा, तुमचा पहिला प्रतिसाद बघून खूप छान वाटल आणि पान चवीला मस्त लागत.
अग प्रचि टाकतच आहे. शिर्षक बदलते.

आता कशाला शिजायची बात - आरती.- मस्तानी पान

असं नाव हवं Happy शब्दखुणा अपडेट कर. फायनल प्रॉडक्टचा फोटो टाक

या पानाला कात, चुना यांपैकी काही लावत नाहीत का?<<<< नाही. तरीसुद्धा मस्त लागत. Happy
सृष्टी, आसा, प्रभाकाकू, जाई धन्यवाद.

छान

विड्याची पानं वेगळी कधी बघितली नाहीत इथे. पानपट्टीवरूनच आणावी लागतिल बहूदा.
मिळालीच तर नक्की करेन. कात, चुना, सुपारी यातलं काहीच नसल्याने लहान मुलं पण खातिल.