हिंदी आणि कानडी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
1’

या गणेशचतुर्थीला मायबोलीला १८ वर्षे पूर्ण झाली आणि त्याच शुभमुहुर्तावर मायबोलीने हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या आहेत.

२०१२ मधे बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली समुहाचा भाग बनली. या दोन वर्षात या साईटला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. एक थोडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मायबोली.कॉम किंवा बातम्या.कॉम या ठिकाणी पहिल्यांदा धडकणारा वाचकवर्ग हा बहुतांशी वेगळा आहे. आणि हळूहळू त्यांना दुसर्‍या साईटची माहीती होते आहे :)

"आमची कुठेही शाखा नाही" असे म्हणायचे दिवस संपले. किंवा आजच्या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर जितक्या जास्त ठिकाणी तुमची शाखा असेल तितकं चांगलं हे व्यावसायिक यशाचं सूत्र होत चाललं आहे.

बातम्या.कॉमच्या साचावर आधारित या दोन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस करतो आहोत. पहिल्यांदाच या दोन भाषांमधे काम करतो आहोत. कानडी फाँंटही आमच्यासाठी नवीन आहे. काही चुका राहिल्या असतील, आणि त्या इथे सांगितल्या तर आम्हाला दुरुस्त करता येतील.

hindi.khabar.io - हिंदी.खबर.आयो - खबर आयो, समाचार लायो !

kannada.khabar.io - kannada suddi - ಕನ್ನಡ.ಖಬರ್.ಅಯೋ - ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ಆನ್ಲೈನ್

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अभिनंदन.
ते हिंदी वाल मस्त आहे, पण कन्नडाला मस्त कसं म्हणायच की वो आता. काय कळत नाय काय नाय तिकडं. निसतच आपल गोल गोल दिसतय बघा. Wink

अभिनंदन.

मोनालीला मम. मुलाच्या टीचर आल्या कि त्यांना दाखवीन कन्नडा, त्या आहेत कन्नड.

मराठी फाँट मधल्या कानडी गप्पांची मराठी भाषेत भाषांतराची सोय हवी आहे पिंचिं च्या गप्पांच्या पानावर.. आरती, मल्ली यांना दिवे... Wink

अभिनंदन अन खुप सार्‍या शुभेच्छा Happy

Pages