केल फॅन क्लब

Submitted by अदिति on 2 September, 2014 - 20:20

केल ही एक बहुगुणी भाजी फार उशिरा नजरेस पडली. हिरव्या भाज्यांमधे हिचा पहिला नंबर लागतो. वेब एमडी मधे हिचा न्युट्रीशन पावरहाउस म्हणुन उल्लेख केला आहे. माझ्या दृष्टीने ह्यातच सगळे आले. पण एकदा तिचा आहारात समावेश झाल्यावर जवळ जवळ दिवसा आड एकाच रेसीपीमुळे कंटाळा आला. (करण्याचा. खायचा नाही Happy ). मी काही रेसीपीज गोळा केल्या आहेत तुम्हीही ह्यात भर घाला.. Happy

केल ची भाजी :१:
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल
२. १ कांदा बारीक चिरुन
३. ५/६ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरुन
४. ३/४ हिरव्या मिरच्या
५. तेल (ऑ ऑ)
६. मिठ
कृती: तेलावर (ऑ ऑ, थोड जास्त असत, भाजी हेल्दी आहे अस म्हणुन मी स्वत:ला माफ करते स्मित ), बारीक कापलेला कांदा, लसुन, हिरवी मिरची परतवुन कांदा शिजला की त्यात बेबी केल टाकुन हलवुन सारखी करुन झाकण ठेउन शिजवुन घ्यायची. शेवटी चवीपुरते मिठ टाकुन सारखी करुन गॅस बंद करायचा. मेथी करतांना मिठ टाकल्यावर झाकण ठेवल तर भाजीचा रंग बदलतो अस सांगितल गेल असल्यामुळे ह्या भाजीतही मी झाकण ठेवत नाही. फुलक्यांबरोबर एक नंबर लागते.
केल कोवळीच घ्या नाही भाजी शिजायला वेळ लागतो आणि खातांना कचकच लागते.

kel.jpg

केलच्या भाजीचे अजुन एक वेरीयेशनः२:
हिरव्या मिरच्यांच्या एवजी लाल मिरचीची पुड (क्रश्ड रेड पेपर). ह्यात मी कांदा टाकत नाही बाकी कृती वरील प्रमाणेच.

केल ची भाजी मोड आलेल्या मसुर मधे :३:
१. बेबी केल साधारण ३ वाट्या
२. मोड आलेले मसुर
३. १ कांदा बारीक चिरुन
४. १ चमचा अद्रक लसुन पेस्ट
५. १ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापुन
६. १ चमचा तिखट
७. तेल (ऑ ऑ)
८. मिठ
कृती:
तेलावर अद्रक लसुन पेस्ट ब्राउन झाल्यावर त्यात कांदा परतवुन शिजला की टोमॅटो घालुन एक जीव करुन घ्या. २/३ मिनीटांनी तिखट टाकुन हलवुन २ मिनीट ठेवा. मग त्यात मसुर, केल टाकुन परत एकदा हलवुन घ्या. झाकण ठेवा. मी ह्यात पाणी टाकत नाही त्यामुळे लागल तर झालणावर पाणी ठेवते. मसुर शिजली की मिठ टाकुन एक जीव करुन २ मिनीटात गॅस बन्द करा.

kale.jpg
ह्यात हिरवी मिरची वापरली आहे.

केल चिप्सः
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल
२. ऑलीव्ह ऑइल
३. मिठ, मिरे चवी पुरते
कृती:
केल ओली असेल तर पेपर टॉवेलने कोरडी करुन एका भांड्यात मिठ मिरे पावडर आणि ऑ ऑ टाकुन चोळुन घ्या. एकीकडे ओव्हन ३५० फॅ ला सुरु करा. ऑव्हन तापले की एका ओव्हन ट्रे मधे केलची पानं एका लेअर मधे पसरवुन ओवन मधे १५/२० मिनीटे क्रिस्पी होउ द्या.
मिड डे स्नॅक्स साठी छान आहे.
kale_0.jpg

केल सॅलेड:
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल १ कप
२. कोवळी पालक १/४ कप
३. फेटा चीज १/४ कप
४. ड्राईड क्रॅनबेरी/रेसीन किंवा तत्सम काहीही
५. अक्रोड १/४ कप
६. ऑलीव्ह ऑइल बेस्ड ड्रेसिंग
अ. ऑ ऑ +मिरे पावडर्+ लिंबू+चवीला किंचीत मिठ
ब. ऑऑ, लिंबु, मध, कोथींबिर, नखभर मिठ (१/२ वाटी तेलाला ५/६ पानं) मिक्सर मधे एकजीव होईपर्यंत फिरवुन घेते
कृती: वरील सगळे जिन्नस वाढण्याआधी पाच मिनीट आधी एकत्र करुन वाढावे. सोबत ग्रील्ड फिश/ चिकन , वेजी असाल तर सॅलेड मधेच १/२ कप बिन्स मिक्स करायला हरकत नाही.

ग्रीन स्मुदी - विथ केलः
१ कप पालक
१/२ कप केल
१ छोटी काकडी
१/२ अव्हाकाडो
सेलेरी चे १, २ तुकडे
१ कप ज्युस (मी पेरुचा वापरला)

ब्लेन्डर मधे मिक्स करा. मस्त स्मुदी तयार होते. एन्जॉय Happy

smoothie.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केलची भाजी करण्यात आली अदितिच्या रेसिपीने. वरच्या फोटोत दिस्ते अगदी तश्शीच झाली Happy घरच्या पालेभाजीप्रेमी मेम्बरांना आवडली. मला मुळात पालेभाज्या आवडतात आणि ही विशेष हेल्दी वगैरे असल्यामुळे जास्तच आवडली.
पालेभाजीप्रेमी नसलेल्या नाठाळ मेम्बराने मात्र ही भाजीही पानात वाढली तितकीच खाल्ली. आता त्याच्यासाठी नव्याने बेबी केल आणून salad व चिप्स करण्यात येतील. चिप्सचा पण फोटो टाका ना कोणीतरी.

ह्या काल आणलेल्या केल चिप्स. वँपायर किलर असा फ्लेवर आहे ज्यात सनफ्लावर सीड्स, काजू, गार्लिक आणि विगन चीज असा अगम्य मालमसाला आहे.

photo (5).JPG

रॉबीन, बहुतेक नाही.

सायो,

भरपुर मालमसाला दिसतो आहे म्हणजे टेस्टी असणार. मला वाटत चिप्स साठी मोठी (बेबी नाही) केलच वापरायला हवी.

http://noteatingoutinny.com/2012/03/04/kale-saag/

इथे केल = सरसोंका साग म्हणताहेत. पण मला नाही वाटत हे बरोबर आहे.

श्री केल साठी इन्डियन नाव शोधतांना केल = ब्लॅक गाय असाही रिस्पॉन्स बघितला Uhoh

बेबी केलच्या चिप्स मला आवडल्या.

ऑफिसच्या कॅफेटेरियात वॉटरक्रेस अ‍ॅपल वॉलनट सॅलड असायचं नेहमी. आज तेच कॉम्बो वापरून केल सॅलड केलं होतं. मला आवडलं Happy

घरी सॅलड करते तेव्हा मी एकच गावरान गंगू छाप ड्रेसिंग करते. त्याचे काही सोपे प्रकार असतील तर सांगा.

केल हा फक्त आणि फक्त शिजवून आवडतो. सॅलड मध्ये तो फर चावत बसावा लागतो आणी मला फार कंटाळा येतो खरं सांगायचं तर.

सध्या अमेरिकेत केल, किन्वा, किया सीड्स या प्रकारांना सोन्याचे दिवस आले आहेत खरे.

मी अग्गदी कालच इथे लिहिणार होते की विकतच्या चिप्स खाऊ नका. नाहीनाही ती पिठं आणि फ्लेवर्स अ‍ॅड करतात आणि मग केलशी नजरानजर/दिलजमाई होत नाही. Proud

kale_pulav.jpg

केल पुलाव्/खिचडी (काहीही म्हणा Happy )

ही खिचडी मी अगदी हेतेढकल टाइप करते. राइस (ब्राउन), डाळ (ह्यात मोड आलेले मुग वापरलेले आहेत), आललसुण पेस्ट, कांदा, टोमॅटो, भाज्या(केल, पालक, फ्लावर, वांगी, बिन्स), कोथिंबीर, कढीपता, आणि हवे ते. सगले राइस कुकर मधे ढकलुन पाणी टाकुन शिजवयचं की झाली खिचडी.

रेस्पी म्हंजी असं बगा....चकलीच्या ब्लॉगवर पालक सूपची रेसिपी आहे. केल आणि भिजवलेली ह.डाळ, एक हिरवी मिरची असं कूकरला शिजवून घेतलं आणि बाकी कृती चकलीच्या पालक सूपची. तिच्याच ब्लॉगवर की कुठे तरी डाळ-पालक सूपची रेसिपी पण आहे बहुतेक. स्पायसी सूप मस्त लागलं एकदम (असं लिहायचं असतं).

ओके ओके, धन्यवाद. आज जाणार आहे सब्जी मंडीत तेव्हा आणते केल (आणि पुन्हा चिप्सच करते! :P)

अदिती, मस्त दिसतोय पुलाव. Happy

मी केल्यात अंजली. पण त्या मक्याच्या पिठात कॉर्न घालून केलेल्या आहेत. मला तरी त्या टॉर्टिया चिप्स सारख्याच लागताहेत.

हो ना, सूपची रेसिपी मलाच वाचून अगागा झालं पण सूप खरंच छान लागलं Happy

मला पण चिप्ससाठी म्हणून नवं प्याक आणायचं आहे.

Pages