साईबाबा होते तरी कोण?

Submitted by उडन खटोला on 31 August, 2014 - 15:32

शिर्डीच्या साईबाबांना देव-सन्त-गुरु मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्र ,भारत आणि जगभरात अस्तित्वात आहे. सुमारे १५० वर्षापुर्वी या अवतारी पुरुषाने दीनजनोद्धार आणि सामाजिक कार्याद्वारे अनेक भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या समाधीनंतरही गेली १०० वर्षे सद्गुरु साईनाथ आपल्या भक्तगणाना सत्प्रेरणा अन शुभाशीर्वाद देत आहेत .

अशा परिस्थितीत द्वारका पीठाचे स्वघोषित शंकराचार्य स्वरुपानंद यानी साईनाथांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वादाला तोंड फोडले. त्यातच कथित भंपक धर्मसंसद भरवुन साईबाबा देव नाहीत ,असे जाहीर केले. त्यावर चर्चा अन भाष्य करणारा चैतन्य प्रेम यांचा दैनिक लोकसत्ता मधील हा उत्तम लेख !

दुवा :

http://www.loksatta.com/vishesh-news/who-was-sai-baba-830122/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्व हिंदु परिषद सुध्दा या वादात पडलेली नाही. शंकराचार्यांना नाराज करावे तर हिंदु समाजाचे सर्वोच्च धर्माचार्य नाराज होतात. लोकांना नाराज करावे तर हे सर्व लोकांसाठी चाललय.

विश्व हिंदु परिषदेने एके काळी कधीही एकमेकांना न भेटणार्‍या चारही पीठाच्या शंकराचार्यांना एका प्रसंगी एकत्र एका व्यासपिठावर आणले होते.

वाद संपायला हवा असे मनापासुन वाटते. धर्माचे तुकडे पुन्हा पुन्हा पडु नयेत.

येड्यागत वागल्यावर वाद कसा संपणार?

धर्मसंसद जेंव्हा स्थापन झाली त्याच्यानंतर आस्तित्वात असलेल्या लोकांना संत असल्याचे सर्टिफिकेट त्यानी दिले तर समजु शकते.

२०० वर्शापूर्वीच्या माणसाला आम्ही सर्टिफिकेट देणार हा अट्टाहास कशाला ?

त्यापेक्षा जे बाबा आज आस्तित्वात आहेत त्यांचे चारित्र्य तपासुन त्याना ही संसद का सर्टिफिकेट देत नाही ?

हा धागा काढण्याचा उद्देश समजला नाही.
हे कोण होते आणि ते कोण होते ही चर्चा सरते शेवटी निष्फळ ठरणार आहे. ज्यांच्या मनात साईबाबा किंवा इतरांबाबत श्रद्धा आहे ती तशीच राहणार आहे.
हिदूच काय कुठल्याच धर्मात देव पाहिलेला माणूस आज हयात आहे का ? जेव्हा काही प्रत्यक्षात सिद्ध करता येत नाही तेव्हा उपलब्ध पुराण आणि तर्काचा आधार घेतला जातो, जे स्वाभाविक आहे. लोकसत्तासारख्या फूटकळ दैनिकात कोण काय लिहीते याला अवास्तव महत्व का द्यावे.

चघळण्यासाठी नवे विषय हवे म्हणून उगाच काहीतरी काढत बसू नये, मग उद्या आमचे देव अप्सरा नाचवायचे आणि रुशी (टायपोबद्दल क्षमस्व) मेणकेवर भाळायचे असे म्हणायचे का.

वाद संपायला हवा असे मनापासुन वाटते. धर्माचे तुकडे पुन्हा पुन्हा पडु नयेत.
>>>>>>
काय वाद? कसला वाद?
धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आपसात भांडून धर्माचे तुकडे पाडू शकतात?

Proud

चैतन्य प्रेम यांचे लिखाण नेहमीच उत्तम असते. लेख सुंदरच आहे. पण माझे स्पष्ट मत आहे की, साईबाबा हे एक संत, समाजसुधारक होते. आज ‌शिर्डीला जे काही भयानक स्वरूप प्राप्त झालंय, त्यामागे साईबाबांना बळजबरी चिकटवलेले चमत्कार आणि मनोज कुमारने काढलेला सिनेमा जबाबदार आहे. या सिनेमात साईबाबांचे अनेक चमत्कार दाखवले आणि ‌जसजसे भाविक वाढू लागले, तसतसे या चमत्कारांचे मा‌र्केटिंग केले गेले. त्यातच आंध्रच्या देवभोळ्या (की देववेड्या) लोकांपर्यंत बाबांची कीर्ती पोहचली आणि मग शिर्डीला भविकांचा अक्षरशः महापूर सुरू झाला. सुरुवातीला ‌शिर्डीला ‘भाविक’च येत होते, पण आता शिर्डी हे तीर्थस्थळ नव्हे तर पर्यटनस्थळ झालंय. गेल्या काही वर्षांत तेथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. बलात्कार, आत्महत्त्या, फसवणुकीच्या बातम्यांनी दररोज वृत्तपत्रांचे रकाने भरलेले असतात. अंडरवर्ल्डचे धागे शिर्डीपर्यंत पोहचलेले आहेत. शिर्डीचे दरवर्षी अनेक पटींनी वाढत गेले आणि त्यामुळे शिर्डीचे धर्मादाय कार्यालयाने नियुक्त केलेले (की स्थानिक लोकांनी नियुक्त केलेले) विश्वस्त मंडळ बरखास्त करून राजकीय लोकांची वर्णी लावण्यात आली. त्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सगळ्यांना योग्य ‘स्पेस’ मिळेल याचा विचार करण्यात आला. मी स्वतः शिर्डीजवळ सात वर्ष राहिलेलो आहे आणि तिथली व्यवस्था चांगलीच अनुभवली आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांपासून कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत आणि सिक्युरिटी गार्डपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची कार्यपध्दती पाहिली आहे. ही सगळी कार्यपध्दती पाहता साईबाबा देव नव्हते, या मतापर्यंत मी तरी पोहचलेलो आहे. केवळ पैसा मिळवण्यासाठीच त्यांना स्थानिक जनतेने देवत्व बहाल केले आहे. संताला जेव्हा देवत्व बहाल केलं जातं तेव्हा तिथे अवास्तव चमत्कारांची अपेक्षा निर्माण होते आणि मग इतर देवस्थानांसारखंच तिथेही केवळ श्रध्देचा बाजार भरतो.

हा विषय मोदी सरकारवर आणून दाखवल्यास पारितोषिक आहे म्हणे कसले तरी

>>>>>.

बेफिकीर मला पारितोषिकाची हाव नाहीये, पण सहज आठवले म्हणून लिहितो,

निवडणूक काळात मोदी सरकारच्या जाहीराती उपक्रमात एक व्हॉट्सआप मेसेज फिरायचा.
भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेम्सचा संदर्भ देऊन, एक हिंदू नेता सर्व विश्वात हिंदू राज्य स्थापन करणार आहे अशी त्याची फेमस भविष्यवाणी फिरवून तो नेता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून श्री नरेंद्र मोदी हेच आहेत.... वगैरे !

जर याला धर्मसंसदेने मान्यता दिली तर धमाल उडेल Happy

धर्मसंसदेचा संघाशी संबंध नाही, हे सांगू इच्छितो आणि धर्मसंसद ज्या पद्धतीने वक्तव्ये केली आहेत, ती मुळातच चुकीची आहेत.

मी १९८८ ला पहिल्यांदा गेलो होतो. त्यावेळेसची शिर्डी आणि आताची शिर्डी यात जमिन आस्मानाचा फरक आहे. सत्यसाईबाबांमुळ तेलगु पब्लिकनी सगळ्यात पहिल्यांदा बाजारु पणा चालु केला तिथ आणि आत्ताच हिडीस स्वरुप गुजराथी लोंढ्यांमुळ आलय.....
मनोज कुमारच्या चित्रपटानी असा काही खुप मोठा फरक पडलेला नाहीये अस मला तरी वाटत.

मनोज कुमारच्या चित्रपटानी असा काही खुप मोठा फरक पडलेला नाहीये अस मला तरी वाटत.>>
सुशांत, मनोज कुमारच्या चित्रपटामुळेच शिर्डीचा उध्दार झाला, हे शिर्डीचे स्थानिक लोकच नव्हेत तर संस्थानचे पदाधिकारीही मानतात. त्यामुळे मनोज कुमार यांच्या नावाने तेथे एक मार्गही बनविण्यात आला आहे. मनोज कुमारच्या पिक्चरमुळे मुंबईची पब्लिक शिर्डीकडे वळली आणि त्याबरोबर व्यावसायिक, अंडरवर्ल्डचे लोकही बाबांचे भक्त झाले. आज दर गुरुवारी मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रांमध्ये जे काही हिडीस प्रकार चालतात, ते पाहून हे खरेच दर्शनासाठी शिर्डीला चाललेत का, असा प्रश्न पडतो.

साईबाबा चित्रपटामुळे शिर्डी आणि सुधिर दळवी, दोघांचेही भाग्य उजळले. Happy

मी १९७८ साली प्रथम शिर्डीला गेलो होतो. मस्त होती तेव्हा शिर्डी. गांवच होतं म्हणाना. साईबाबांच्या मूर्तीपर्यंत जाता येत होतं. अगदी मूर्तीच्या पायाला हात लावुन नमस्कार करता येत होता. त्यानंतर २०१० साली गेलो बहुधा. फार वाईट वाटलं एकंदरीत सर्व प्रकार पाहुन. असो.

साईबाबांना उगीचच देवत्व बहाल केलं गेलंय या टोच्या यांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्यानिमित्ताने एक ईंडस्ट्री उभी राहिली, काही शेकडो लोकांना रोजगार मिळाला, साईबाबांचे अवतार म्हणवुन घेणार्‍या बाबा-बापुंनाही आपला बिझनेस सुरु करता आला, त्याची वेगळी ईंडस्ट्री उभी राहिली हे देखिल चांगलेच. Happy

क्रोसिनची कंपने हिडिस प्रकारे मार्केटिंग करते म्हणुन क्रोसिनचे औषधत्वच अमान्य करणार का ?

साईबाबा नसते तरी मार्केट राहिलेच असते. लोकसंख्या अफाट वाढले व त्यांना काहे ना काही उपाय लागणारच होता.. क्रोसिनवर बन्दी आनले तर दुसरा ब्रँड वापरुन लोकानी आपले डोकेदुखी शमवली असतीच ना ?

शंकराचार्यांनी पैगंबरावतार धारण kàrun सगळ्याच देवळातील कर्मकांडाना विरोध करावा. देवळात काहीही ठेऊ देऊ घेऊ नये. यावे अन प्रार्थना करुन निघुन जावे.

असे केले तर लोक ऐकतील.

पण आधी साईबाबा मुसलमान होते असे म्हणायचे. मग म्हणायचे लोक तिथे पैसा घालतात. मग विरोध करायचा. तर शंकराचार्यांचा नेमका विरोध कशाला आहे? मुसलमान संत पुजण्याला ? की तिथे जाउन पैसा घालण्याला ? अशी शंका उत्पन्न होते.

एकट्या मनोजकुमारवर का बिल फाडत आहात?
अकबर इलाहाबादीचे शिर्डीवाले साईबाबा गाणे आणि निरुपा रॉयला बाबांच्या चमत्काराने मिळालेली द्रुष्टी हे पण मग जबाबदार आहेत.
लोकांना चमत्कार दिसले की ते नमस्कार करणारच.
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे, इथे संतांबद्दल आपल्याला आदर आहेच. त्यांच्या शिकवणीला आपण मानतोच. मात्र तेच जर तिथे चमत्कार आला तर इथे डोके टेकल्याने आपल्यालाही चमत्काराने काहीतरी मिळेल हा विचार कोणीही करणे साहजिक आहेच. त्यामुळे तो संत ओवरहाईप होणेही साहजिकच आहे.

* ओवरहाईप हा शब्द चुकीचा असेल आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

मॉरल ऑफ द स्टोरी - खरा प्रॉब्लेम आहे आपल्याच डोके टेकण्याच्या वृत्तीचा.
जेव्हा एखाद्या बाबामहाराजाचे ढोंग उघडे पडते तेव्हा त्यांच्या ज्या आंधळ्या भक्तांचे डोळे उघडतात ते काय करतात......... तर दुसरा बाबा शोधतात !

I said same thing. If you restrict crocin , people will buy Anacin !

संमि, येस्स कर्रेक्ट Happy

यात आपण काही करू शकतो तर यात आर्थिक भ्रष्टाचार किंवा सामाजिक गुन्हेगारी होणार नाही, किंवा कमीत कमी कसे होईल हे बघू शकतो.

बाकी प्रत्येकाला स्वताच्या श्रद्धाच नाही तर अंधश्रद्धाही जपण्याचा पुरेपूर अधिकार आहे.

ज्या आंधळ्या भक्तांचे डोळे उघडतात ते काय करतात......... तर दुसरा बाबा शोधतात !>>

नाही नाही, ते प्रथम त्यात राजकारण आहे अशी बोंब करतात. नन्तर ते रस्ते, रेल्वे वगैरे रोखतात . परमेश्वर परीक्षा घेत आहे , शेवटी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होइल, सत्याचाच विजय होईल अशी विधाने करतात.

टोच्या तो चित्रपट आल्यानंतर पण येव्हडा फरक पडला नाही जेव्हडा तेलगु (सत्यसाईबाबा)आणि गुजराथ्यांनी (येका गुज्जु अंधळ्या मुलीला बाबांच्या भक्तिमुळ द्रुष्टी आल्याची दंतकथा )शिर्डीचा कचरा केला.....
टोच्या तुमच्या मतानुसार मग आता देहु आणि जेजुरीची पण अशीच अवस्था होणार ना?
सडेतोड ९२- ९३ पर्यंत मंदिरात डायरेक्ट प्रवेश होता..... छोटासाच सभामंडप होता.....

रॉबीनहूड, ते आपण डोळे न उघडलेल्या आंधळ्या भक्तांबद्दल बोलत आहात, मी म्हणतोय डोळे उघडलेले तरी कुठे योग्य मार्गाला लागतात. Happy

Pages