साईबाबा होते तरी कोण?

Submitted by उडन खटोला on 31 August, 2014 - 15:32

शिर्डीच्या साईबाबांना देव-सन्त-गुरु मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्र ,भारत आणि जगभरात अस्तित्वात आहे. सुमारे १५० वर्षापुर्वी या अवतारी पुरुषाने दीनजनोद्धार आणि सामाजिक कार्याद्वारे अनेक भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या समाधीनंतरही गेली १०० वर्षे सद्गुरु साईनाथ आपल्या भक्तगणाना सत्प्रेरणा अन शुभाशीर्वाद देत आहेत .

अशा परिस्थितीत द्वारका पीठाचे स्वघोषित शंकराचार्य स्वरुपानंद यानी साईनाथांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वादाला तोंड फोडले. त्यातच कथित भंपक धर्मसंसद भरवुन साईबाबा देव नाहीत ,असे जाहीर केले. त्यावर चर्चा अन भाष्य करणारा चैतन्य प्रेम यांचा दैनिक लोकसत्ता मधील हा उत्तम लेख !

दुवा :

http://www.loksatta.com/vishesh-news/who-was-sai-baba-830122/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख !

साईबाबा, सबका मालिक एक ! हिंदू-मुस्लिमच नाही तर प्रत्येक जाती-धर्मातील सलोख्याचे हे ब्रीदवाक्य त्यांच्या तसवीरीखाली मी बघतो आणि ते पाहून हात जोडतो !

शिर्डीला शाळा-कॉलेजात असताना आजवर ७-८ वेळा जाणे झाले ते कोणतीही श्रद्धा वा भक्ती नसून मित्रांबरोबर छोटीशी धमाल-मस्ती पिकनिक म्हणूनच कारण मी नास्तिक आहे, हे देखील प्रामाणिकपणे नमूद करतो.

खाली हाथ आये थे हम, खाली हाथ जायेंगे ... हे ज्याला ज्याला समजते आणि जो कोणी हे आचरणात आणतो त्या प्रत्येकात मी साधूसंत बघतो Happy

साईबाबा हे संत होते.

गेल्याच महिन्यात शंकराचार्यांनी सर्टिफाय केले होते.. साईबाबा मुसलमान्होते. तसॅ असेल तर अल्लाने या देशावर उप्कारच केले आहेत

त्याच लोकसत्तात अजुन दोन लेख आहेत. तेही इथे द्या. धर्मसंसद हे संघ आणि विहिप चे बाळ आहे, त्याबद्दल त्या लेखात दिलेले आहे. या लबाड लोकांना बलात्कारी बाबा चालतो, साईबाबा चालत नाही.

आधी अफझलखान झाला.

आता साईबाबा.

पुढचा नंबaर कुणाचा ? कबीर ?

एका माणसाने दुस-या माणसाचा असा अध्यात्मिक दर्जा ठरवायची कुवत देवाने मनुष्यजातीला दिलेलीच नाही.

अशी किती वादळे आली नि गेली, साईबाबा त्याच्या पार आहेत. त्याना त्याचा फरक पडत नाही.

लोकसत्ता हे कम्युनिस्ट लोकांचे वर्तमान ? मुख पत्र आहे. कम्युनिस्ट जे देवच मानत नाहित ते धर्मसंसद कुठुन मानणार. असल्या लोकांच्या विचारसरणीला भारतात कधीच थारा मिळाला नाही.

वैयक्तिक मत : साईबाबा हे अनेकांचे गुरु आहेत. ही श्र्ध्दा आहे. याबाबत धर्मसंसदेने काही बोलु नये.

उडन खटोला,
तुम्ही संदर्भ असंलिहिलंय ,त्याऐव़जी लोकसत्तेतून साभार अशी दुरुस्ती करल का? तसेच सप्तर्षी, रवी आमलेंच्या लेखांच्या लिंक्स द्या.

गिरिश कुबेर आल्यापासुन मध्यपूर्वेतल्या राष्ट्रांचे गोडवे गाणे, इस्त्राईल-अमेरिकेला कारण नसताना झोडपणे हा एक कलमी कार्यक्रम लोकसत्ता नी चालवला आहे. हेच कुबेर तेलाबद्दल अभ्यास करायला मध्यपूर्वेत गेले होते म्हणे, त्यावरुन त्यांना कुठुन पगार मिळतो हे कळेलच.

लोकसत्ताचा दिल्ली प्रतिनिधीतर किळस यावा असे लिहीत असतो.

टोचा, तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे.
सगळाच्या सगळा लेखच ढापलाय लोकसत्तावरुन. धन्यवाद विजय आंग्रे. अ‍ॅडमिनच्या लक्षात आणून द्यावे.

इथे सगळा लेख देता येत नाही. लेखाची लिंक चालते व त्यावर (असलेच तर) स्वतःचे भाष्य लिहीणे अपेक्षित आहे. आख्खा लेख कॉपी पेस्ट करता येत नाही.

साईनाथांबद्दलचा मजकूर खूप छान लिहिला आहे स्मित. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजही नाही.>>>अश्विनी पूर्ण अनुमोदन

लेखकाचे आणि आपले मत १०० % जुळत असेल तर सगळा लेख कॉपी पेस्ट केला तर का चालु नय्र?

Proud

तसा मायबोलीचा नियम आहे म्हणून. अ‍ॅडमिन यांनी वेळोवेळी तसे निदर्शनास आणून दिले आहे.

साईबाबां बद्दलचा इतका सुरेख लेख इथे दील्याबद्दल धन्यवाद..
<साईनाथांबद्दलचा मजकूर खूप छान लिहिला आहे स्मित. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजही नाही>
+१

साईबाबा कोण होते, कोण होते असे म्हणायला हवे, ह्याबद्दल काही माहीत नाही.

पण हा लेख सुंदर वाटला. Happy

असे म्हणतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
>>>>>
मान्य, पण इथे साईबाबा ऋषी होते का इथपासून शोधमोहीम चालू आहे.

अवांतर - गाडगेबाबा कोण होते?

धर्म संसद नक्की काय आहे? आजपर्यंतची त्यांची भरीव अशी काय कामगिरी आहे? याचे सभासद वगैरे कोण असतात?

मी धर्मसंसदेची मान्यता यापूर्वीच काढलेली आहे हे वाचले नाही का पलिकडच्या बीबीवर ( का ह्याच कुणास ठाऊक )

मग कशाला हे चर्वित चर्विण?

Pages