दरवळ

Submitted by गण्या. on 31 August, 2014 - 03:26

तुझ्या घरातून हल्ली

रातराणीचा गंध येत नाही पहाटे

ना मोगरा दरवळतो सकाळी

दुपारच्याला पारीजातकाखाली

सावली येत नाही

म्हणायला यातलं राह्यलंय काय ?

उध्वस्त बाग आणि रानगवत

पाऊल टाकलंच आत

तर चुरगळलेल्या मोग-याचा उग्र दर्प

आणि तुझ्या भकास चेह-याने

वाहीलेल्या लाखोल्या

हेच दरवळतंय इथं आताशा

सभ्य लोक हल्ली

टाळू लागलेत हा रस्ता

तू बदनाम झालीहेस बयो

पुन्हा एकदा

गण्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users