खो... दहा पुस्तकांचा!!!!

Submitted by हर्ट on 31 August, 2014 - 02:33

तुम्हाला आवडलेली कुठल्याही भाषेतील दहा पुस्तकांची नावे इथे लिहायची आहेत. हे असे लिहिता लिहिता साधारणः

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
४) नक्की कुठल्या वयात वाचले?

ह्याबद्दल लिहू शकता.

इथे तुम्हाला "खो" मिळालाच पाहिजे असे नाही. कधी कधी आपण मित्रांच्या यादीत नसतो म्हणून आपल्याला खो मिळत नाही :(. पण म्हणून इथे लिहायचे नाही असे नाही. तुम्हाला आवडलेली दहा पुस्तके ह्याबद्दल इथे कुणीही लिहू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बी, इथे लिहिले नाही म्हणजे माबोवर वाचकच नाहियेत असे काही नाही. लोकांना लिहायचे नसेल वा अशी दहा किम्वा मर्यादित पुस्तकांची यादी करायची नसेल किंवा फेसबूकवर लिहून वैतागले असतील किंवा तू लिहायची वाट बघत असतील. अनेक कारणे असू शकतात. नाही म्हटले तरी तीन पाने प्रतिसाद आले आहेतच की.

एक शून्य मी - पु. ल.
अप्रतीम पुस्तक. पु.लंच्या निधनानंतर प्रकाशित.

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?

वैचारिक लेख् संग्रह. जर का एखाद्या हल्लीचा पिढीतील नव्या वाचकाने पुलंचे वाचन हाती घेताना हे पुस्तक प्रथम वाचले तर तो पुल ना 'विनोदी लेखक' अशा चौकटीत चुकुनही बसवणार नाही. पुलंचे वैचारिक लेखन किती जबर्दस्त असू शकते याचे हे पुस्तक उत्तम उदा. आहे.

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
मी हे पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले. त्याच्या शीर्षकाने आकर्षीत झालो.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?<
एक अभिजात पुस्तक. त्यातील 'एक शून्य मी' हा लेख तर कळसाध्याय! त्यातील समारोपाचे वाक्य असे आहे: ...प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!..

४) नक्की कुठल्या वयात वाचले? माझ्या ४६ व्या वर्षी.

मला आवडलेल्या १० पुस्तकांबद्दल लिहितो आहे:

१) काही आंबट काही गोड - शकुंतला परांजपे

२) बारोमास - सदानंद देशमुख

३) भोवरा - ललित लेख - इरावती कर्वे

४) विदेश - आशा कर्दळे

५) गोठलेल्या वाटा - शोभा चित्रे

६) माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग

७) विरुपिका - विंदा करंदीकर

८) आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे

९) सोयरे सकळ - सुनिताबाई देशपांडे

१०) ऋतुचक्र - ललित निंबध - दुर्गा भागवत

बी, सोयरे सकळ माझ्याही निवडक दहांत आहे. कधीही उघडून वाचते मी ते. मला करायचीय यादी. फेसबुकवर खो मिळालाय तिथे लिहिन आधी Happy

खूप पुस्तके आवडली आहेत. अजूनही बरीच वाचायची आहेत.

१) मृत्युंजय- शिवाजी सावंत. हे पुस्तक वाचून कर्ण जो मनावर ठसला तो अजूनही.

२) आनंदी गोपाळ- श्री.ज. जोशी. हे पुस्तक बडोद्याला वाचलं सुट्टीत आजोळी गेले तेव्हा. छोट्या आनंदीच्या शिक्षणासाठी प्रसंगी खूप कठोर वागायचे गोपाळराव. आता खूप आठवत नाहीये पण आनंदीनेपण खूप मेहेनत घेतली. डॉक्टर झाली, परदेशात जाऊन शिकली पण अल्पायुषी ठरली हे आठवतंय.

३) पु.ल. देशपांडे यांची बरीचशी पुस्तके- पु.ल. सिर्फ नामही काफी है, काय बोलू.

वरची सर्व पुस्तके ५ वी ते ७ वी ह्या वयात वाचली.

४) दुर्गभ्रमणगाथा- गो.नि. दांडेकर. खूप सुंदर माहिती, ह्यांच्याबरोबर गड-किल्ले फिरले.

५) आहे मनोहर तरीही- सुनीताबाई देशपांडे. खूप उलट-सुलट चर्चा ऐकली होती पुस्तकाबद्दल पण मला खूप आवडलं हे पुस्तक. मला प्रांजळ कथन वाटलं.

६) आकाशाशी जडले नाते- जयंत नारळीकर. हे खास नवऱ्यासाठी लायब्ररीतून आणले, त्याला विज्ञानसंबधी पुस्तके आवडतात म्हणून पण मीही वाचले, खूप सुंदर आहे. आता परत एकदा वाचायला हवे कारण लक्षात खूप रहात नाही हल्ली.

७) झाडाझडती- विश्वास पाटील. धरणग्रस्त झालेल्या गावांवर हे पुस्तक आहे. मनात खोलवर भिडले हे पुस्तक.

८) कुणा एकाची भ्रमणगाथा- गो.नि. दांडेकर. वेरी टचिंग. लहानपणी इतके विचित्र आणि निगेटिव्ह अनुभव येऊनही गो नि दा हे पुढे आपल्या लेखणीने एका उंचीवर गेले आणि वाचकांना केवढी सुंदर पुस्तके दिली, हरले नाहीत ते हे कौतुक वाटलं.

९) प्रकाशवाटा- प्रकाश आमटे. सॉलिड आवडलं. त्यांचा संघर्ष, काम सगळं. सलाम पूर्ण आमटे परिवाराला.

१०) ब्र- कविता महाजन. हे पुस्तक पण मनाला भिडले. खूप माहिती नसलेल्या चळवळीतील गोष्टी कळल्या, आदिवासी लोकांचे प्रत्यक्ष आयुष्य वगैरे.

एक होता कार्व्हर हे वीणा गवाणकरांचे पुस्तकपण खुप आवडलं.

त्यानंतर बारोमास.

अनिल अवचट हेही माझे आवडते लेखक आहेत त्यांची पुस्तके.

मीना प्रभूंची अलीकडील दोन वाचली नाहीत अजून पण बहुतेक सर्व वाचली आणि आवडली. माझी आवडती लेखिका आहे. इतिहास, भूगोल अगदी सर्व सामाजिक परिस्थिती ह्यांचा पण खूप अभ्यास आहे त्यांचा. त्या आपल्याला त्यांच्याबरोबर फिरवतात.

गौरी देशपांडे, इरावती कर्वे यांची पुस्तके आवडतात.

अजून बरीच आहेत. आता थांबते इथे.

अन्जू, कुणा एका वेड्याची भ्रमणगाथा- गो.नि. दांडेकर >> कुणा एकाची भ्रमणगाथा असे नाव आहे पुस्तकाचे.

मी वाचलेली माझी खास आवडती पुस्तके
१. निवडक गूढकथा - रत्नाकर मतकरी
२. अनिल अवचट यांची अनेक पुस्तके, विशेषतः कार्यरत, धार्मिक, संभ्रम, धागे उभे आडवे
३. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
४. युगांत - इरावती कर्वे
५. व्यासपर्व - दुर्गा भागवत
६. हा जय नावाचा इतिहास आहे - लेखकाचे नाव आठवत नाही, महाभारतावर लेख होते
७. स्वामी - रणजित देसाई
८. मृत्युंजय- शिवाजी सावंत
९. राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे
१०. पु.लं.ची सगळीच !

०) विदूषक, इस्किलार, बखर बिम्मची आणि इतर …. - जी. ए कुलकर्णी (वाचतानाचे वय १९)

१) कवीता, काळे पाणी, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, जात्य्छ्चेदक निबंध आणि इतर… - स्वातंत्र्यववीर सावरकर (वाचतानाचे वय १३)
२) पर्व - भैरप्पा (अनु. श्रीमती कुलकर्णी) (वाचतानाचे वय २१)
३) मृत्युंजय - शिवाजी सावंत ((वाचतानाचे वय १२)
४) एक दोन तीन … अनंत - जी. गमाव्ह (George Gamov) (अनुवाद ??) (वाचतानाचे वय १५)
५) जागर, मनुस्मृती व इतर - नरहर कुरुंदकर ((वाचतानाचे वय १९)
६) साने गुरुजींच्या गोष्टी भाग १ ते १० (वाचतानाचे वय १०)
७) ज्ञानयोग - स्वामी विवेकानंद (वाचतानाचे वय १८)
८) कोल्हाट्याचं पोर - डा. किशोर शांताबाई काळे (वाचतानाचे वय १८) (व इतर दलित सहित्य)
९) गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर - (??) (वाचतानाचे वय ११)
१०) मराठी म्हणी व पारंपारिक कविता (कितीतरी भाग उ.दा. बाळराजा) - महाराष्ट्र राज्य सरकार प्रकाशित (शांताबाई शेळके होत्या त्या संपादन मंडळामधे असे वाटते)

इतर आवडते लेखक - बाबासाहेब पुरंदरे, पु. भा. भावे, गो.नी.दा, पु. ल,, अण्णाभाऊ साठे, प्र. के अत्रे, ना इनामदार, दुर्गाबाई, खूप मराठी कवी, आणि कितीतरी

०) Mathematics can be fun - Mir publication, By Perelman (वाचतानाचे वय १९)
१) One day in the life of Ivan Denisovich - Alexander Solzhenitsyn (वाचतानाचे वय > २५)
२) Lafcadio,The Lion Who Shot Back and Giving Tree - shel silverstein (वाचतानाचे वय > 25)
३) Collapse - Jared Diamond (वाचतानाचे वय > २५)
४) Cartoon History of World (Volume 3 specifically) (वाचतानाचे वय > २५)
५) Surely you are joking Mr. Feyman - Dr. Feyman (वाचतानाचे वय > २५)
६) Bunch of thoughts - Maadhav Golwalkar (वाचतानाचे वय > 25)
७) Greek tragedies - (वाचतानाचे वय १६ ते २०)
८) Bury my heart at wounded knee - Dee Brown ((वाचतानाचे वय > 25)
९) Logicomix - Apostolos Doxiadis (वाचतानाचे वय > 25)

मस्त धागा आहे. खुप नव-नवी (मला अज्ञात असलेली) पुस्तके कळताहेत. धन्स बी Happy

मला अशी आवड-निवड अशी नाही सांगता येणार, कुठ्ल्या गोष्टीचा/पुस्तकाचा प्रभाव पडला आहे असेही नाही म्हणता येणार. पण वर्षानुवर्षे जपलेल्या मनाच्या तटबंदीला ’ आयन रॅंड’च्या ’ The Fountainhead ' ने पहीलं खिंडार पाडलं. Atlas Shrugged ने ते अजुन पक्कं केलं.

या व्यतिरीक्त....

जी.एं.ची पत्रे (आणि अर्थातच इस्किलार, विदूषक व इतर लेखन)
ग्रेसच्या ’संध्याकाळच्या कविता’ आणि 'चंद्रमाधवीचे प्रदेश'
मर्ढेकरांची कविता

हे वाचताना ग्रेसच्याच कुठल्याश्या एका पुस्तकात दुर्गाबाईंची ओळख झाली आणि मग ’पैस’ आणि ’व्यासपर्व’ वाचनात आलं.

’बाकिबाब’ तर आठवी-नववीत असताना जे व्यसनासारखे चिकटले ते सुटता सुटत नाहीयेत.

किरण नगरकरांचं ’सात सक्कं त्रेचाळीस' , रंगनाथ पठारेंचं 'शंखातला माणुस', गोनीदांची समग्र साहित्यसंपदा ...

मॅक्झीम गोर्कीचं 'द मदर' , दोस्तोव्हस्कीचं 'क्राईम & पनीशमेंट' हेमिंग्वेचं 'द ओल्ड मॅन अँड द सी' आणि अर्थातच ’The Yearling’ by Marjorie Kinnan Rawlings ... खरेतर आधी पटवर्धनांचं ’पाडस’ मग ’The Yearling' !

यादी खुप मोठी आहे. आठवेल तसं लिहीत जाईन.

बाप्रे तुम्ही लोकं वाचता त्यापेक्षाही ते तितकं लक्षात ठेऊन त्याबद्दल चर्चा करू शकता हेच खूप कौतुकाचं आहे (हे मी खरंच मनापासून लिहिते कारण मला मी माझ्या टीनेजमधल्या आवडलेल्या पुस्तकांना परत नीट वाचल्याशिवाय काही संदर्भ लागणार नाही हे माहित आहे)

मी पहिल्या पानावरचे प्रतिसाद वाचूनच हबकलेय...त्यापुढचे प्रतिसाद आत्ताच वाचत नाही..

टण्याची लिस्ट भारीच समग्र आहे बै....पार्टनर्,डार्लिंग, सावर रे....खतरनाक...

Pages