खो... दहा पुस्तकांचा!!!!

Submitted by हर्ट on 31 August, 2014 - 02:33

तुम्हाला आवडलेली कुठल्याही भाषेतील दहा पुस्तकांची नावे इथे लिहायची आहेत. हे असे लिहिता लिहिता साधारणः

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
४) नक्की कुठल्या वयात वाचले?

ह्याबद्दल लिहू शकता.

इथे तुम्हाला "खो" मिळालाच पाहिजे असे नाही. कधी कधी आपण मित्रांच्या यादीत नसतो म्हणून आपल्याला खो मिळत नाही :(. पण म्हणून इथे लिहायचे नाही असे नाही. तुम्हाला आवडलेली दहा पुस्तके ह्याबद्दल इथे कुणीही लिहू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुसरवाला लेख असलेला डोहच की. मयेकर ललित गद्य म्हणजे काय हो? कथा ललित गद्य नाहीत काय? डोह मला तरी एक कथासंग्रहच वाटतो. त्यांचा अजुन एक कथासंग्रह बहुतेक सोनेरी दिवस.

पानवलकरांचे सूर्य आणि औदुंबर हे मला आठवणारे दोन कथासंग्रह. गाडगीळ, गोखले, व्यं. माडगुळकर यांचे मी 'अमुक अमुकचे कथासंग्रह' वालेच संग्रह वाचलेत.

मयेकर ललित गद्य म्हणजे काय हो? कथा ललित गद्य नाहीत काय >> अगदी काटेकोरपणे नाहि पण fictional नसलेले गद्य ते ललित अशा द्रुष्टीने बघ रे. हि सम्यक व्याख्या नाही हे मीच लिहितो. Happy

धन्यवाद, केदार. पुस्तक मिळवून वाचण्याच्या यादीत टाकलं आहे.

बाकी कथांबद्दल सहमत. डोह, कडू आणि गोड, पानवलकर व दि.बा.मोकाशींच्या कथा या सार्‍यांचे प्लेसहोल्डर म्हणून 'मराठी कथा: विसावे शतक' ह्या नेटक्या संकलनाची (के.ज. पुरोहित, सुधा जोशी) यादीत भर घालता येईल.

काही पुस्तके मित्रमैत्रीणींनी वाचलेली म्हणून वाचत गेले अगदी ५वी-६वी पासून, बरेच अर्थ लागत नसत पण पुन्हा कळत्या वयात वाचताना त्यातली काही आवडली काही नाहीतही.

१ समस्त जी. ए. - एकतर अगदी १०व्या १२ व्या वर्षी हातात पडलेली त्यामुळे तेव्हा गूढ वाटलेली वाढत्या वयानुसार उलगडत गेली.

२ समस्त व. पु.- टीन एजमधे स्वप्नांच दालन उघडल्या गेलं, मनुष्यस्वभाव, एखाद्या प्रसंगाकडे वा सानिध्यात येणा-या व्यक्तिंच्या वर्तवणुकीकडे, एकदंरीत जगाकडेच पाहण्याचा दृष्टीकोन विस्तारत गेला. विचारांना चालना मिळाली . आजतागायत पारायण चालूच आहेत. 'सखी' सगळ्यात आवडती व्यक्तीरेखा.

३ कोसला- ग्रामीण व कॉलेज जीवनाची ओळख जवळून होत गेली.

४ चरित्रे- किरण बेदी, शोभा डे, एक होता कार्व्हर, गांधीजी अशा अनेकांची आत्मचरित्र त्या-त्या वेळी प्रभावित करून गेली.

५ बाप-लेकी- संपादक- पद्मजा फाटक, दिपा गोवारीकर, विद्या विद्वांस.
अगदी जवळच पुस्तक, नावाजलेल्या दहा बापांच आणि त्यांच्या तितक्याच नावाजलेल्या २१ कन्यांचं मनोगत.
इतकेच नाही तर तळा-गाळाच्या वा सुशिक्षित म्हणवून घेणा-या सुसंस्कृत घरातही मुलींवर होणा-या अत्यांचारांना व त्यामुळे पुढील आयुष्यात खोलवर होणा-या त्याच्या विकृत परिणामांना बोल्डपणे मांडणार पुस्तक खुप खोलवर पडसाद उमटवून गेलं.

६ भिन्न - कविता महाजन - 'धरल तर चावतंआणि सोडल तर पळतं' अशी अवस्था झाली होती वाचताना, खूप वेगळ्या विश्वाची ओळख झाली. एडस चे दुषःपरिणाम व त्यामुळे ब-याच निष्पाप स्त्रीयांची, मुलांची होरपळ विध्द करून गेली.

७ 'ब्र'- कविता महाजन.

८ नातीचरामि - मेघना पेठे.

९ आंधळ्यांच्या गायी - मेघना पेठे.

१० रत्नाकर मतकरींच्या अनेक रहस्यकथा.

>> ललित गद्य म्हणजे काय हो? कथा ललित गद्य नाहीत काय?
कथा हा ललित गद्यांचा सबसेट आहे असं मला वाटतं.

लघुनिबंध (फडक्यांचे वगैरे), स्फुटं गद्य ललितातच येतात.

खरच अशी १० पुस्तक वेगळी काढणं कठीण आहे. वरच्या लिस्ट मधली जवळपास सगळीच वाचलीत पण तरिही माझी काही खास आवडती यामधे आली नाहित असं वाटल.

सुरुवात हॅन्स एंडरसन्सच्या परिकथांनी झाली होती. त्यानंतर 'राजकन्या आणी राक्षस ई.ई. बरेच प्रकार झाले. रितीने स्वामी आणि त्या मालिकेतली सर्व तसच मृत्यंजय आणि त्याही मालिकेतली सर्व फडशा पाडून झाली. आणि अवचित हाती आलेले 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' मनावर खोल खोल ठसा उमटवून गेले.

२-३ वर्षांपुर्वी वाचलेले किरण नगरकरांचे 'प्रतिस्पर्धी' पण अगदी खास आवडिचे.

पाडस , चौघीजणी, सेकंड सेक्स, गॉन विथ द विंड, कार्ल सॅगन सिरिज...क्या केहने!!!

आत्मचरित्रांपैकी श्रीराम लागुंच 'लमाण', जयंत नारळिकरांच 'चार नगरात माझे विश्व', शांतारामा', 'मला उध्वस्त व्हायचय ही आणि खूप ईतरही. छे..शक्य नाही १० मधे बसवणं!!! कमितकमी १०० पुस्तकांचा तरि खो द्यायला हवा.

अरे पर्व, ग्रिशेम, कूक , कविता महाजन, गौरी, मेघरी, ईयान रँड, पेशवे, दाभोलकर कित्ती कित्ती राहिलय....

अशी १० पुस्तकं निवडता नाही येणार . काही पुस्तकं वाचल्या वाचल्या खूप आवडली असतात पण ती आताही तेवढीच आवडतील याची खात्री नाही .बहुथा काही पुस्तकं आपण आयुष्याच्या कुठल्या फेज मध्ये वाचतो त्यावर ती आवडतील की नाही ते ठरत असावं

१ रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
२ आरण्यक - मिलिंद वाटवे
३ मौनराग - महेश एलकुंचवार
४ नातिचरामी - मेघना पेठे
५ माचीवरला बुधा - गो नी दांडेकर
६ मोगरा फुलला -गो नी दांडेकर
७ किमया - माधव आचवल
८ आहे हे असं आहे - गौरी देशपांडे
९ नर्मदे हर - जगन्नाथ कुंटे
१० एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
११ रावीपार - गुलझार
१२ युगांत - इरावती कर्वे
१३ रत्नाकर मतकरींच्या कथा
१४ झाडाझडती - विश्वास पाटील
१५ यक्षांची देणगी - जयंत नारळीकर

१)पर्क बक- गुड अर्थ
२)स्टोन फॉर डेनी फिशर : हेरॉल्ड रॉबिन्स=मला माझ्या आयुष्याची झलक यात दिसली
३)ए जे क्रॉनिन- सिटॅडेल- एका आदर्श वादी डॉक्टरच्या आयु ष्याची आणि मूल्यांची वाताहत व त्याच्या पत्नीचा स्ट्रगल
४) रेझर्स एज्ज - सॉम रसेट मॉम अननुकूल प्रे यसी व नायजातील द्वंद्व
५) त्युसडेज विथ मॉरी
६) असा मी असा मी- पु ल
७) डे ऑफ द जकाल- फ्रॅदरिक फोर्सिथ ग्रेट सस्पेन्स
८) भीमसेन जोशी
९) फुले वेचिता- लता मंगेशकर
१०) फॉर हूम द बेल टोल्स-

फुले वेचिता- लता मंगेशकर >>> तुम्हाला 'मोगरा फुलला' म्हणायचे आहे का? ते लता मंगेशकरांवरचे पुस्तक आहे. लताने लिहिलेले नाही. फुले वेचीता शोधल्यावर ते 'सुनंदा साठे' यांनी लिहिले आहे असे सापडले.

'फुले वेचिता' हे लता मंगेशकरांचे अधिकृत आत्मचरित्र आहे. शब्दांकन लताबाईंचं नाही, तरी पुस्तकावर लेखिका म्हणून लता मंगेशकर हे नाव आहे (निदान माझ्याकडे असलेल्या आवृत्तीत तरी).

१) आहे मनोहर तरी - सुनीत देशपांडे
२) श्रीमानयोगी - रणजित देसाई
३) द्रोहपर्व - अजेय झणकर
४) ह(फ)सवणूक - पु. ल. देशपांडे
५) पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
६) क्लोरोफॉर्म - अरुण लिमये
७) झिम्मा - विजया मेहता
८) युगांत - ईरावती कर्वे
९) शहेनशहा - ना.सं.ईनामदार
१०) चार नगरात माझे विश्व - जयंत नारळीकर

'फुले वेचिता' हे लताने वेळोवेळी लिहीलेल्या लेखांचे संकलन आहे. त्याला अधिकृत आत्मचरित्र असे कोणत्या आवृत्तीत म्हटले आहे बरे!

'फुले वेचिता' हे वेळोवेळी लिहिलेले लेख नाहीत. एकाच व्यक्तीनं या पूर्ण पूस्तकाचं शब्दांकन केलं आहे. सलग आठवणी या पुस्तकात आहेत. मी या पुस्तकाचं ब्रेलीकरण केलं आहे. लता मंगेशकरांनी त्यासाठी मला प्रस्तावना लिहून दिली आहे. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार त्यांच्या आणि प्रकाशकांच्या मतेतरी ते त्यांचं आत्मचरित्र आहे. आता या आठवणी पूर्ण नाहीत. त्यामुळे त्याला 'आत्मचरित्र म्हणू नये' इत्यादी असेल, तर तसं समजावं.

चिन्मय, 'फुले वेचिता' आत्मचरीत्र असो वा नसो, ते मायबोली-खरेदीत उपलब्ध होउ शकेल का?

माधव,
माझ्या समजुतीप्रमाणे सध्या हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. तरी एकदा खात्री करून लवकरच सांगतो.

काही वर्षांपूर्वी फुले वेचिताचा काही भाग ऑनलाईन वाचायला उपलब्ध असल्याचे / वाचल्याचे आठवतेय. (त्याची लिंक इथे मायबोलीवरच कोणत्यातरी बाफवर मिळाली होती.)

@विनी: अशी १० पुस्तकं निवडता नाही येणार . काही पुस्तकं वाचल्या वाचल्या खूप आवडली असतात पण ती आताही तेवढीच आवडतील याची खात्री नाही .> अतिशय सहमत. वयाचे एकेक दशक ओलांडल्यावर आवडी खूप बदलत जातात.
'एक शून्य मी' -पु.ल. बद्दल मात्र नन्तर सविस्तर लिहेन. त्यातील त्याच नावाचा लेख केवळ जबरदस्त!

मायबोलिवर इतके कमी वाचक बघून खेद वाटतो आहे... इथे तर पाने ओसंडून वहायला हवी होती.. कदाचित मी उघडला हा धागा म्हणून असेल Sad

आणि ज्यांना "दहा"बद्दल आक्षेप आहे त्यांनी कितीही पुस्तकांची नावे लिहिली तरी काही हरकत नाही.. पण असे मागे वळून जाऊ नये Sad

Pages