माँ - सीमंतिनी - मलाही कोतबो

Submitted by Barcelona on 30 August, 2014 - 20:43

माँ
माझी समस्या गंभीर आहे तेव्हा धाग्यावर कृपया आपली बहिण समजून मार्गदर्शन करा. मी माँsssss आहे आणि (सिनेम्याच्या बजेटमध्ये एवढीच अक्षरे बसत असल्याने) माझा रक्तगट 'आरएच' आहे. अमर, अकबर आणि अँथनी ह्या तीन तरुणांचे रक्त मी पेट्रोल जसे टाकीतून गाडीत टाकतात तसे थेट स्वीकारले आहे. पण ती माझी समस्या नाही कारण पुढे अख्खा सिनेमा मी एचआयव्ही पॉझीटिव्ह किंवा इतर कुठला आजार न होता जगले. अर्थात एवढा एकच वैद्यकीय नियम मी धाब्यावर बसवलेला नाही. मला फक्त नवरासमोर असला की टिबी होतो किंवा तसा चेहरा होतो (अर्थात माझा नवरा ही असा आहे - मुले “हमने दो दिनसे खाना नही खाया” म्हणतात तर तो त्यांना खेळायला बॅट देतो. टिबी चेहऱ्याशिवाय मी दुसरे काय करणार?) माझा टि.बी. औषधाशिवाय जातो. कोर्नियल ट्रान्सप्लांट किंवा मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया मला लागत नाहीत. लोडशेडींग असल्यासारखी माझी आंखो की रोशनी जाते आणि येते. त्याप्रोसेस मध्ये रेल्वेतील सर्व भिक्षेकरी लोकांसाठी "शिर्डीवाले साईबाबा" ह्या गाण्याची सोय मी केली. नशीब तरी कसं असत बघा तीन मुलगे मला पण एकाला पण सुलोचनाबाईंसारख ‘तुम हाथ मुंह धो लो’ सांगायची संधी मिळाली नाही. मला गाजर का हलवा बनवण्याची संधी मिळाली नाही की माझा एक पण मुलगा बी.ए पास होऊन आला नाही. पण पदरी पडल आणि पवित्र झाल म्हणून मी मुलांना फुले, गजरे देण्यात मी सिनेमा घालवला. पण ती पण माझी समस्या नाही.
नुकताच मला 'मदर्स डे' ला एन्डेजर्ड कॅरेक्टर हा किताब देण्यात आला. हल्ली पाठक भगिनींनी एम्पवर्ड मां (जाने तू या जानेना, नवा खुबसूरत, वेक अप सिड आणि राम लीला असले अनेक सिनेमे) बनून माझ्यासारख्या अभागी दुखियारी अबला मां लोकांची स्पिशीज, जी मी आणि करण-अर्जुनच्या आईने वाढवली होती ती स्पिशीज, धोक्यात आणली आहे. खूप दडपण येते. मला सुचत नाही मी काय करू?
आपला प्रतिसाद मला खालील बाबतीत हवा आहे:
​१. मला एन्डेजर्ड कॅरेक्टर म्हणून देण्यात येणारा किताब मी स्वीकारावा का? का नवीन माँ विरोधी निषेधपत्रक काढावे?
२. मुलांच असल तरी रक्तच ते- ह्या वयात रक्तगट आणि एचआयव्हीची तपासणी करावी का?
३. संजय लीला भन्साळीने रिमेक बनवायला घेतला तर जॉब सिक्युरिटीसाठी फ्लोरीस्ताचे ट्रेनिंग घ्यावे का स्पर्शमधील शबानाप्रमाणे ब्रेल शिकावी?
४. ‘शिर्डीवाले साईबाबा’ म्हणणाऱ्या भिक्षेकर्यांसाठी खास असा एखादा रिमिक्स मिकासिंगला करावयाला सांगू का? का योयो हनीसिंघला शोधू? ​

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एन्डेजर्ड कॅरेक्टर म्हणून देण्यात येणारा किताब मी स्वीकारावा का? का नवीन माँ विरोधी निषेधपत्रक काढावे?<<< अज्जिब्बात स्विकारू नका. येतील बहु झालेत बहू पण सांस मात्र एकच. तुम्ही!!!! कुणीही कितीही आव आणला तरी तुमच्यासारखा करूण चेहरा करून साक्षात अमिताबच्चनला रडवणारं जगात कुणीही नाही. (करणार्जुनाची आई अख्ख्या थेटरालाच रडवते. बाई अजून कायतरी बोल..... आयेंगे आयेंगे आयेंगे एवढंच काय ते)

मुलांच असल तरी रक्तच ते- ह्या वयात रक्तगट आणि एचआयव्हीची तपासणी करावी का? >> तुमच्या नवर्‍याला तुम्हाला सोडून वीस वीस वर्षं भटकायची सोय आहे. शिवाय त्यांची याद्दाश पण गेलेली असतेच. रिस्क नको. तपासणी करा. नवर्‍याची तर नक्कीच. अधिक माहितीसाठी स्टेट ट्रान्स्पोर्टच्या बसेस बघा.

संजय लीला भन्सालीने रिमेक बनवला तर सिल्कच्या साड्ञा नेसून आणि झवेरीबाजार अख्खा अंगावर घेऊन गरीब कसे दिसता येईल आणि अख्खा सेट्भर धावत कसे नाचता येईल याचे ट्रेनिंग घ्या (चंदीगडच्या खासदारीण बाई यात उस्ताद आहेत!) त्यांच्याकडे शिकवणी लावा.

शिर्डीवाले साईबाबा’ म्हणणाऱ्या भिक्षेकर्यांसाठी खास असा एखादा रिमिक्स मिकासिंगला करावयाला सांगू का? का योयो हनीसिंघला शोधू? ​भिक्षेकरी त्यांचे स्वतःचे रिमिक्स स्वतःच बनवून घेतात. साईबाबावरून सध्या पेटलेलं असल्यानं सेफर साईड म्हणून "ए मालिक तेरे बंदे हम" असे सेकुलर गाणं म्हणा.

बी, कोतबो - कोणाशी तरी बोलायचय.
मयेकर, आता त्या मातेला एव्हढ्च कोतबो असेल तर आपण काय करणार?

सिमंतीनी, Biggrin

मस्त
आणि एवढ्या लगेच नवीन पोस्ट तयारही.. सही

पण क्षमस्व, मी मां ला बहीण समजून मार्गदर्शन नाही करू शकत Proud

:haahaa: