जात

Submitted by सुरज डोंगरे on 29 August, 2014 - 16:56

कुणी तयार केली ही जात,
मानवतेला काळिमा ही जात…

कुणाला अभिमानाच प्रतिक,
तर कुणाला हिनवते ही जात…

बंद होऊन मतदानाच्या पेटीत,
मूर्खाना सत्तेत आणते ही जात…

सामाजिक न्यायासाठी मग,
गुणवत्ताही डावलते ही जात…

आवडीच्या जातीत जन्माचं,
ऑप्शनही देत नाही ही जात…

सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांनाही
लग्न ठरवताना आठवते ही जात..

अशी घट्ट चिकटते जन्माला की,
मेल्यावरही जात नाही ही जात…

-- सुरज

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users