ना ब औ ल खो - द्वितीय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2014 - 14:16

प्रथम इथे

दुसरा किस्सा क्रमांक २

छोटासाच किस्सा आहे, याचा संबंध शिर्षकाशी असल्याने एकाच लेखाअंतर्गत डकवले आहे परंतु पहिल्या किस्श्याशी याचा थेट संबंध जोडू नका.

डिसक्लेमर पुन्हा देतो - नाव-संदर्भ बदललेले आहेत.

बहुराष्टीय कंपनी म्हटले की परदेशी क्लायंट वा परदेशी सहकर्मचार्‍यांचे येणेजाणे असतेच. अशीच एक आमच्याच कंपनीची परदेशी कर्मचार्‍यांची टीम आमच्या ब्रांचला विजिटसाठी आली होती. अर्थात, सारेच मोठ्या पोस्टवरील अधिकारी होते. देशाचे नाव घेऊन कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमाचे उल्लंघन करायची इच्छा नाही पण छान गोरेचिट्टे लोक होते. रंगाचा उल्लेख मुद्दाम केला कारण "गोर्‍या" फॉरेनर लोकांसमोर बरेचदा भारतीय दबून जातात हा अनुभव. (ज्यांना वरचेवर फॉरेनर बघायची आणि त्यांच्यात मिसळायची सवय नसते त्यांना हे लागू, तसेच ज्यांचे ईंग्लिश कच्चे असते त्यांना आणखी लागू, इतरांना कदाचित गैरलागू) असो, तर तीन दिवस त्यांचा आमच्याकडे मुक्काम होता. सर्वांना आपापले वर्कस्टेशन नीट नेटके अ‍ॅण्ड क्लीन ठेवायची सूचना झाली होती. ड्रेसकोड देखील कोणतीही सबब न देता फॉर्मलच हवा होता. आदल्या दिवशी एच.आर. डिपार्टेमेंटने याचा खास रिमाईंडर मेल टाकला तेव्हाच खरे तर लक्षात आले होते की कंपनीच्या दृष्ट्टीने हि महत्वाची मंडळी दिसताहेत.

सकाळी ठरल्यावेळी ते आले आणि पुर्ण ऑफिसभर फिरत सर्वांच्या वर्कस्टेशनला भेट देऊन गेले. आम्हा सर्वांना पोशाखाबद्दल जो आदेश दिला होता तो त्यांना लागू नसावा कारण त्यांच्यापैकी काही जण सूटबूटमध्ये आले होते तर काही जणांनी चक्क जीन्स-टीशर्ट घातले होते. त्यांचा राऊंड संपल्यावर आमच्यात यावर चर्चा सुरू झाली - जर ते गोरे लोक बिनधास्त आपल्या कम्फर्टनुसार कॅज्युअल पोशाख घालू शकतात तर एकाच कंपनीचे असून शिष्टाचाराची हि पॉलिसी फक्त आपल्यालाच का पाळायला लावत आहेत. पण तरीही चलता है, इटस ओके, त्यांचा देश वेगळा, त्यांची विचारसरणी वेगळी, पण आपण आपल्या भारतीय ब्रांचची संस्कृती जपायला हवी यावर बहुतांश लोकांचे एकमत झाले. उर्वरीत लघुतांश लोकांमध्ये अर्थातच मी एक होतो, ज्याने भारतीय संस्कृतीचा मुद्दा निघताच मग पारंपारीक भारतीय पोशाख का नको? असे म्हणताच सर्वांनी विषय तिथेच संपवला.

असो, तर त्यानंतर कंपनीतील मोठ्या साहेबांबरोबर त्यांची मिटींग वगैरे झाली आणि ते जेवायला बाहेर गेले. दुपारी कधीतरी परत आल्यावर त्यातील एक सूट-बूटवाला विलायती बाबू मला वॉशरूममध्ये भेटला. त्यांची इतर सारी खातरदारी जोरात असली तरी त्यांना वॉशरूम मात्र सर्वांसाठी असलेलेच वापरायचे होते. वॉशरूममध्ये फारशी वर्दळ नव्हती. मी ज्या कामासाठी गेलो होतो ते आटोपून हात धुवायला बेसिनवर आलो तर तिथे तो विलायती बाबू आरश्यासमोर उभे राहून केस ठिकठाक करत होता. माझ्याकडे बघून उगाचच ओळखीचे हसला आणि कुठल्यातरी अगम्य अ‍ॅक्सेंटमध्ये पण ओळखीच्या अश्या ईंग्रजी भाषेत काहीतरी बोलला. मला त्यातील अक्षरही न कळता तो असेच काहीतरी अरबट चरबट बोलला असणार या विश्वासावर मी पुर्ण जबडा फाडत एक स्माईली दिली. पण जर माझा अंदाज चुकला असेल तर उगा पंचाईत नको म्हणून त्याच्या चेहर्‍यावरील नजर फिरवून घेतली, आणि ती फिरता फिरता त्याच्या पायांवर स्थिरावली. तिथे जे काही दिसले ते पाहता आता मी खरोखरच मनातल्या मनात मोठ्याने ह्यॅं ह्यॅं करू लागलो. माझ्या सोबत असलेल्या आणि मगासच्या आमच्या चर्चेत सामील असलेल्या मित्रालाही ते इशार्‍यानेच दाखवले. तसे तो देखील कुजकटपणेच हसत म्हणाला, वड्डे लोग वड्डी बाते.. पण माझ्या मनात आले, ‘नाम बडे और लक्षण खोटे’.. कारण ज्यांच्यासाठी आम्ही सो कॉलड फॉर्मल शिष्टाचार पाळत होतो त्यातीलच एक उच्च परदेशी अधिकारी आमच्या वॉशरूममध्ये चक्क सॉक्सवर म्हणजे बूट न घालता फक्त मोज्यांवर आला होता .. आता बोला ! Happy

सर्व तळटीपा पहिल्या भागाप्रमाणेच.
याउपर अध्येमध्ये येणार्‍या ईंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व! पटापट प्रतिशब्द न सुचल्याने जे डोक्यात येईल तसे लिहून काढलेय.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद प्रितीऽऽजी ...... शिकतोय Happy
आणि तसेही सगळंच पहिल्याच फटक्यात चांगले जमणेही चांगले लक्षण नसते नाही.. Wink

कंपनी बहुराष्ट्रीय असो अथवा कोणतीही, तिचा डेकोरम हा कंपनीचा स्वतःचा निर्णय असतो.
गोरे लोक तो कधीही डिमांड करत नाहीत. त्यांना हे चालत नसेल, ते चालत नसेल असं आपणच ठरवलेलं असतं. शिवाय लोकांनी फॉर्मल घातले आणि डेस्क क्लिन ठेवला तर चांगलं इम्प्रेशन पडेल असा समज ही फक्त आपलाच (म्हणजे कंपनीचा) असतो. त्यापेक्षा उत्तम काम आणि वेळेत डिलिव्हरी ही त्यांच्यासाठी जास्त इंप्रेसिव्ह ठरते हे सोयिस्कररित्या विसरले जाते आणि तुम्ही वर उल्लेख केलेल्या 'इतर' गोष्टीनी गोर्‍यांना इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यांची रिक्वायरमेंट इतकीच असते की दिलेला शब्द पाळला जावा, वेळेत प्रोजेक्ट ची डिलिव्हरी विथ लेस डिफेक्ट्स. मग तुम्ही ते फॉर्मल घालून करा नाहीतर धोतर. त्याच्याशी त्यांचं काही देणंघेणं नसतं.

साधारण डेकोरम ठिक आहे. सर्वांनी वेळेत हजर राहणं, त्या प्रोजेक्ट विषयी योग्य ती माहिती बाळगून असणं. इ. बाकी तर निव्वळ देखावा. हे मा वै म.

शिवाय लोकांनी फॉर्मल घातले आणि डेस्क क्लिन ठेवला तर चांगलं इम्प्रेशन पडेल असा समज ही फक्त आपलाच (म्हणजे कंपनीचा) असतो. >> यानिमित्तानं लोकं फॉर्मल्स घालून येतात आणि डेस्क क्लीन करतात हेही एक कारण असेल. प्रोफेशनल म्हणून काम करतानासुद्धा बरेचजण या गोष्टी करत नाहीत.

लेखाचे प्रयोजन कळाले नाही. तो सॉक्सवरती फक्त वॉशरूममधे आला होता ना? पूर्ण ऑफिसमधे तर तसाच फिरत नव्हता?

तो सॉक्सवरती फक्त वॉशरूममधे आला होता ना? पूर्ण ऑफिसमधे तर तसाच फिरत नव्हता?
>>>>>>>
मंदिरासारखे वॉशरूमच्या बाहेर पादत्राणे काढून नक्कीच नाही आला, ऑफिसमध्ये तसाच फिरत होता हे ओघानेच आले.
खरे तर जिथे फॉर्मल ड्रेस साठी खास मेल वगैरे टाकून सुचित केले जाते तिथे सॉक्सवर फिरणेही नियमबाह्यच. त्यामुळे दक्षिणा म्हणत आहेत तसे "तो त्याचा प्रश्न" हा मुद्दा इथे गैरलागू. तुम्ही कंपनीत आहात, घरी नाही. कित्येक कंपनीमध्ये पावसाळा वगळता शूज सुद्धा फॉर्मलच हवेत असाही नियम असतो.

बाकी कॉमन वॉशरूममध्ये सॉक्सवर फिरणे हा मला स्वताला तरी थोडाफार गचाळ प्रकार वाटतो, सदर पार्श्वभूमीवर उठून दिसला इतकेच.

दक्षिणा,
<<त्यापेक्षा उत्तम काम आणि वेळेत डिलिव्हरी ही त्यांच्यासाठी जास्त इंप्रेसिव्ह ठरते>>
या आपल्या मुद्द्याशी मात्र शतप्रतिशत सहमत !
किंबहुना माझा स्वताचाही अ‍ॅटीट्यूड आजवरच्या प्रत्येक कंपनीत असाच राहिलाय की जोपर्यंत मी कामात माझे १०० टक्के देतोय तोपर्यंत मला इतर पॉलिसींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मात्र बरेच जण मला समजवतात की जेव्हा कामात गडबडशील तेव्हा तुझे हे इतर सारे जुनेपुराणे उकरून काढले जाईल. असो !

जोपर्यंत मी कामात माझे १०० टक्के देतोय तोपर्यंत मला इतर पॉलिसींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.>>>'
असं काही नाहीये, भले तुम्ही काम करताय पण त्याबरोबर कंपनीच्या कोअर व्हॅल्युज, नियम इ इ, ही महत्वाच्या असतात, त्याकडे काना डोळा करता येत नाही. माझ्या कंपनीत 'सहकार्‍यांशी वागणुक' ही कोअर व्हॅल्यु आहे, एका व्यक्तीला कामात चांगला परफॉरम्न्स असुनही बढती मध्ये खोडा आला तो ह्या कोअर व्हॅल्यु मुळे, कारण त्याने त्याच्या हाताखाली काम करणार्‍यांच थोडसं चुकल्यावर, पाण उतारा केला होता.

जिथे फॉर्मल ड्रेस साठी खास मेल वगैरे टाकून सुचित केले जाते तिथे सॉक्सवर फिरणेही नियमबाह्यच >> अहो तो खास ईमेल तुमच्यासाठी होता, क्लायंटसाठी नव्हे. क्लायंटला सांगितले होते का हे नियम?
की त्यानेच ईमेल करून सांगितलं होतं तुम्हा सर्वांना? Uhoh

जपानमधे शूज न घालता वॉशरूमात जावं लागतं ना? Wink

त्याला बिचार्‍याला कुणी तरी इस्टर्न एटिकेट म्हणून इंडियात पायातलं न घालता इन्डॉअर्स फिरायचं सांगितलं असेल एकादेवेळी. एकतर तो काय बोल्ला ते समजलं नाही तुम्हाला. कदाचित तो विचारत असेल तुम्हाला, की 'काय हो, तुमच्या पायात चपला कशा? मला तर बिनाचपलेने फिरा असं ब्रिफिंग आहे?'

विंग्रजी अ‍ॅक्सेंट शिका पाहू पटापटा!

कारण वॉशरूमात सॉक्सवर फिरणं गचाळ वाटत असेल, तरी युरोपातल्या अन अमेरिकेतल्याही अनेक ठिकाणी थंडी इतकी असते, की वॉशरूम सोडा, बेडरुमातही बिनाबुटाचे फिरत नाहीत लोक. शिवाय आपल्याकडची स्वच्छता ओली असते. सॉक्स ओले झालेले आवडत नाहीत कुणालाच. तेव्हा त्या माणसाने तसं फिरण्याचं काहीतरी कारण नक्कीच असणार.

त्या माणसाने तसं फिरण्याचं काहीतरी कारण नक्कीच असणार.>> +१

तुम्ही त्याला सरळ विचारलं का नाहीत की शूज ना काय झालं म्हणून? कंपनीने त्यांच्याशी बोलू नका असं तर काही नाही ना सांगितलं?
आता उगाच हा जीवघेणा सस्पेन्स इथे सगळ्यांना. Proud Light 1

अग्निपंख,
माझ्या म्हणण्याचा अर्थ मी ईतर पॉलिसी आणि नियम फाट्यावर मारतो (हा वाक्यप्रचार मला घाण वाटतो, Sad कोणी प्रतिवाक्यप्रचार सुचवेल का?) असा नव्हता. पण त्याचा बाऊ करत नाही.
तसेच सहकार्‍यांशी चांगली वागणूक हे मी कंपनीची पॉलिसी म्हणून नाही तर स्वताचे तत्व म्हणून पाळतो. किंबहुना सहकारी वगैरे नंतर आले चांगुलपणा मुळातच प्रत्येकाच्या अंगी असावा. Happy

रिया,
प्रतिसादासाठी धन्यवाद

दक्षिणा,
ते क्लायंट नव्हते, हा त्याचा लेखातील उल्लेख <<अशीच एक आमच्याच कंपनीची परदेशी कर्मचार्‍यांची टीम आमच्या ब्रांचला विजिटसाठी आली होती. >>

चिखलू,
सारे भारतीय माझे बांधव आहेत, एवढेच आमच्यात नाते असावे.
बाकी वेग वगैरे काही नाही मराठी टायपिंग स्पीड बरेपैकी आहे. तसेच घडलेलेच किस्से आणि मनातलेच विचार उतरवायचे असल्याने लिहायचे ठरवले कि पंधरा मिनिटे आणि ऑफिसचा लंच टाईम देखील पुरतो

ईब्लिस,
आपली पोस्ट आपल्या नेहमीच्याच शैलीत, मात्र अश्या काही शक्याशक्यतांचा विचार करून झाला आहे, माझा एकट्याचाच नाही तर सर्वसमावेशक चर्चेअंती हा निष्कर्श निघाला की हे जरासे weird विचित्रच आहे.

शूम्पी,
आम्हाला कोणाला तरी तसे कारण सुचले नाही की समजले नाही Sad उगाच एखाद्या भल्या गोर्‍या माणसाला मराठी आंतरजालावर बदनाम करून मला काय मिळणार ??

यात ना ब औ ल खो कसं ते कळ्ळं नाही.
<बहुतांश लोकांचे एकमत झाले. उर्वरीत लघुतांश> 'बहुतांश'साठी विरुद्धार्थी शब्द 'अल्पांश' असा असावा.

की पुढच्या प्रकाराचे सूतोवाच म्हणून लघुतांश?

यात ना ब औ ल खो कसं ते कळ्ळं नाही. >>>>>>>>
असेलच असे नाही, कदाचित मी चुकतही असेल. बहुधा त्या आधी आमच्यात जी शिष्टाचारावरून चर्चा झाली त्याचा परीणाम म्हणून मला तसे वाटले असावे. पण तरीही हे वागणे जर चुकीचे असेल तर ती चूक एका मोठ्या अधिकार्‍याने केली हे आणखी चूक नाही का. इथे मग त्याचा रंग गोरा होता हे देखील विसरून जाऊया.
.

'बहुतांश'साठी विरुद्धार्थी शब्द 'अल्पांश' असा असावा. >>>>>>>>> ह्म्म हा शब्द मलाही अतीव समर्पक वाटतोय. तसेही मलाही माझ्या लघुतांश शब्दावर शंका (हि लघु नव्हे) होतीच. पण तेवढ्यासाठी धागा अडायला नको म्हणून ती गाठ न सोडवताच पुढे सरकलो.

ते फॉर्मल घालून यायची सक्ती तुमच्या एंप्लॉयरनी केली असणार. भारतात फॉर्मल म्हंटलं की पबलिक नीट आवरून येतं आणि कंपनीकरता त्यांचं इमेज अर्थातच महत्वाचं असतं.

माझ्याकडे बघून उगाचच ओळखीचे हसला आणि कुठल्यातरी अगम्य अ‍ॅक्सेंटमध्ये पण ओळखीच्या अश्या ईंग्रजी भाषेत काहीतरी बोलला. मला त्यातील अक्षरही न कळता तो असेच काहीतरी अरबट चरबट बोलला असणार या विश्वासावर मी पुर्ण जबडा फाडत एक स्माईली दिली.>>>>>>>>> हे काही कळलं नाही. अरबट चरबट खाणे माहित होते पण अरबट चरबट बोलणे काय असते? बरं जर कळलच नाही काय बोलला तर ते अरबट चरबट की जे काय आहे तस्सच असेल हा निष्कर्ष कसा काय काढला?

सॉक्सचं म्हणाल तर थोडं फार बरोबर आहे. बरोबर म्हणजे आपल्याला (भारतीय माणसाला) विचित्र किंवा घाण वाटू शकते.
इथे अमेरिकेत पबलिक बिन्धास्त घरात अगदी बेडरुम मध्ये सुद्धा बूट घालून जातात (सगळेच असं नाही पण सर्रासपणे हे दिसून येतं).
ह्यावरुन अजून एक गोष्ट आठवली. ऑफिस मध्ये बर्‍याच बायका मोठ्या हील्स असलेल्या सॅंडल्स, शूज घालतात. घरातून निघाल्यापासून कशाला पायाला ताण द्यायचा म्हणून कित्येक बायका (न्यु यॉर्क सिटीत तर खुप कॉमन आहे) घरुन निघताना मस्त फ्लॅट चपला घालतात आणि पर्स मध्ये त्यांचे कामावर घालायच्या सॅंडल्स, बूट वगैरे ठेवतात. ऑफिस मध्ये आलं की ते बूट बाहेर आणि फ्लॅट चपला आत ठेवतात. मी पाहिलेल्या उदाहरणांमध्ये तरी कोणीच त्या चपला, बूट आधी एखाद्या पिशवीत ठेवून मग पर्स मध्ये नाही ठेवल्या. अर्थात वेगळा कप्पा असू शकतो पर्स/हॅंडबॅग मध्ये पण तरीही बघताना विचित्र वाटतच.

वैद्यबुवा,
खरेय आपले, अरबट चरबट हे खाण्याबाबतच बोलतात.
मला इकडचे तिकडचे या अर्थाने ते बोलायचे होते, पटकन जो शब्द सुचला तो वापरला.

बेडरूममध्ये बूट घालून जाण्यात बेडरूम खराब होते पण वॉशरूममध्ये सॉक्स घालून जाण्याने वॉशरूम नाही तर सॉक्स आणि पर्यायाने पायही खराब होतात, पुन्हा ते तसेच बूटात जातात.

आपल्या पुढच्या उदाहरणावरून आठवले, मी जुन्या कंपनीत बूट घालून जायचो आणि तिथे मस्त फॅन्सी, कलरफूल आणि स्टायलिश स्लिपर वर फिरायचो. कारण ये अपने कम्फर्ट का मामला था. तो जोड कायम ऑफिसमध्येच असायचा. कधीतरी घरी धुवायला न्यायचो.

पण तेच सध्याच्या कंपनीत पावसाळा सोडता सँण्डल देखील अलाऊड नाही. विकेंडला तेवढे काहीही चालते.

काहीही म्हणजे सिक्स पॉकेट चालते, थ्री-फोर्थ नाही. यातही गंमत अशी की महिला कर्मचार्‍यांना मात्र थ्री-फोर्थ चालते, चालवून घेतात. भेदभावच म्हणा एक प्रकारे. पण असो, तो या धाग्याचा विषय नाही. कधीतरी वेगळा काढू Wink

हा किस्सा अगदी काहीच्या काही झाला आहे.

दक्षिणा पहिल्या पोश्टीला +११

दक्षिणा,
ते क्लायंट नव्हते, हा त्याचा लेखातील उल्लेख <<अशीच एक आमच्याच कंपनीची परदेशी कर्मचार्‍यांची टीम आमच्या ब्रांचला विजिटसाठी आली होती. >> म्हणजे तुमचा मेमो त्यांनाही गेला होता अस का? मग विचारायचा होता ना जाब, नाहीतर एच आर मधे कम्प्लेन करा.

काहीही म्हणजे सिक्स पॉकेट चालते, थ्री-फोर्थ नाही. यातही गंमत अशी की महिला कर्मचार्‍यांना मात्र थ्री-फोर्थ चालते, चालवून घेतात. भेदभावच म्हणा एक प्रकारे. पण असो, तो या धाग्याचा विषय नाही. कधीतरी वेगळा काढू डोळा मारा <<< करुन टाका हो इथेच चर्चा उगाच तेव्हड्यासाठी अजुन कुठे नविन धागा काढता?

तो माणूस तुमचा क्लायंट नव्हता पण तुमचा "गेस्ट" होता. त्यामुळे ड्रेस कोड बाबतीत थोडी लिबर्टी असतेच.
तसंच तुमच्या ऑफीसातल्या एअर कंडीशनींगची जी लेव्हल असेल ती त्याला हवी तेव्हडी नसेल कदाचित. म्हणून गर्मी सहन न होऊन तो डेस्कपाशी शूज काढून बसला असेल ( शूज नवे असतील ते चावत असतील म्हणूनसुद्धा काढले असू शकतात) व "कॉल" आल्यावर घाई घाईने तसाच गेला असेल. थोडक्यात त्याच्या नकळत तो तसा आला होता. आणि तेच त्याने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असणार, ज्याला तुम्ही अचकट बिचकट म्हणत आहात. तुम्हाला केवळ अ‍ॅक्सेंट समजला नाही. हेही नॉर्मल आहे. तर इतक्या साध्या गोष्टीचा तुम्हाला इश्यु का वाटावा हेच कळले नाही.

हे काही जमलं नाही बुवा. उगाच ओढुन ताणुन संबंध लावला आहे असं वाटलं. बुट न घालता रेस्टरूम मधे आल्यामुळे नाव मोठं आणि लक्षण खोटं कसं झालं? ते परदेशी लोक येणार म्हणून अमुकच प्रकारचा वेष करा हे तुमचं एच आर तुम्हाला सांगत होतं.. त्या परदेशी पाहुण्यांनी तर तसा निरोप धाडला नव्हता ना?

रच्याकने - आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणारे, एवढ्या मोठ्या चकाचक ऑफिसात बसणारे, एकदम कडक इस्त्रीचे कपडे; पॉलीश केलेले बूट घालुन हिंडणारे तुम्ही, आणि साधं इंग्रजी कळत नाही - तेव्हा तुमचच नाव मोठं आणि लक्षण खोटं असं तो सूट-बूटवाला विलायती बाबू त्याच्या मित्रांना सांगत नसेल कशावरून?

एक उच्च परदेशी अधिकारी आमच्या वॉशरूममध्ये चक्क सॉक्सवर म्हणजे बूट न घालता फक्त मोज्यांवर आला होता .. आता बोला ! ..........नक्की आक्षेप कशाला आहे? मला ऑफिस मध्ये सतत हिल्स घालून वाव्ररताना तेवढ सुखदायक नाही वाटत. शेवटी काम करणे महत्वाचे.

द्वितीय म्हटलं की काय भारी वाटतं. लेख वाचल्यावर तेवढं भारी वाटत नाही! ना ब औ ल खो - ने काय टोटल लागत नाही. तशी ती लागावी अशी तुमची इच्छा नसावी. प्रथम भाग वाचला नाही आणि आता वाचणार नाही. हा वाचला.
तुम्हाला होणारा त्रागा समजू शकतो, तुम्ही हा किस्सा एचारला सांगितला नाही का? त्या गो र्‍या माणसामुळे होणारा त्रास इथं का मांडावासा वाटला? की

काहीही म्हणजे सिक्स पॉकेट चालते, थ्री-फोर्थ नाही. यातही गंमत अशी की महिला कर्मचार्‍यांना मात्र थ्री-फोर्थ चालते, चालवून घेतात. भेदभावच म्हणा एक प्रकारे. पण असो, तो या धाग्याचा विषय नाही. कधीतरी वेगळा काढू डोळा मारा <<< पुढचा धागा तृतीय असेल. त्यासाठी शुभेच्छा.

अवांतर - माझ्या ऑफीसमध्ये काहीही घातलं तरी चालतं Wink तुम्ही धोतर नेसून आलात तरी मोस्ट वेलकम! टारगेट्स अचिव्ह करा म्हणजे झालं.

आणि साधं इंग्रजी कळत नाही >>>> ते सांधं नव्हतंच .. पण तरीही .. फारच वादग्रस्त विधान आहे हे.
ईंग्लिश न समजणे किंवा न जमणे हे ज्या दिवशी आपल्याला "लक्षण खोटे" वाटू लागले की समजायचे आपला सर्वांचा मातृभाषेचा अभिमान संपला. Happy
कृपया वैयक्तिक घेऊ नका, पण मी लिहितो मराठी, मी बोलतो मराठी, मी ऐकतो मराठी .. अरे मी जगतो मराठी !!!!

अवांतर - आयडू, तुमचा मेल आयडी मिळेल का? सीवी फॉर्वर्ड करतो Happy
कारण आजवर मी ज्या ज्या ऑफिसमध्ये काम केलेय तिथे धोतर फक्त दसरा-दिवाळी फंक्शनलाच घालायची परवानगी मिळालीय Sad

अहो पण इन्टर्नॅशनल कंपनीत काम करता ना? मग ईग्लिश कळायला काय प्रोब्लेम आहे? त्यात कसला मराठीचा अभिमान आडवा येतो?

मराठीचा अभिमान आडवा येण्याचा आणि ईंग्लिश भाषा जमण्या न जमण्याचा संबंधच नाही.
सहज माहितीसाठी म्हणून सांगतो, माझे रोजचे कामानिमित्त ५० टक्क्याहून अधिक बोलणे ईंग्लिशमध्येच होते.
ईंटरनॅशनल कंपनीत काम करत असलो तरी मी कॉल सेंटरमध्ये कामाला नाही, ईंग्लिश बोलता येणे या निकषावर नाही तर माझे टेक्निकल ज्ञान पाहून मला नोकरी देण्यात आली आहे.
माझा वरच्या पोस्टमधील मुद्दा हा होता, की ईंग्लिश बोलता येत नाही म्हणून एखाद्याचे लक्षण खोटे ठरवणे चूक आहे Happy

Pages