"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 06:04

"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

डिसक्लेमर - घटनेतील सर्व नावे बदलली आहेत.

नायक = रुपेश. आमच्या ऑफिसमधील एक अविवाहीत पण कमिटेड कर्मचारी. गर्लफ्रेंड आहे आणि प्रेमप्रकरण सिरीअस आहे.
नायिका = हेमांगी. आमच्याच ऑफिसमधील महिला कर्मचारी. विवाहीत आहे. विवाहाला ४-५ वर्षे झालीत. एक लहान मुलगी आहे.
नायक-नायिका संबंध = निखळ मैत्री !

रुपेश आणि हेमांगी हे केवळ मित्र नव्हते तर त्यांची जोडीच होती. दोघांचे कामाचे डिपार्टमेंट एकच आणि बसण्याच्या जागा गप्पांच्या अंतरावर म्हणून सतत त्यांची आपसात बडबड चालूच असायची. जेवायला जायचे असो वा अ‍ॅडमिन डिपार्टमेंटमध्ये कामाला जायचे असो दोघेही एकत्रच दिसायचे. त्यांच्यातील मैत्री किती घनिष्ट होती हे सांगायला आता किस्से रंगवत बसत नाही मात्र कॉर्पोरेट लाईफमधील सारे शिष्टाचार पाळूनही टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटावा अशी जोडी. त्याचबरोबर आपण मित्र असलो तरी स्त्री-पुरुष भिन्न लिंगाचे आहोत याची जाण ठेऊन त्या मर्यादा पाळून असलेली मैत्री.

हेमांगीने महिन्याभरापूर्वी जॉब बदलला आणि जोडी तुटली. यात रुपेशचे मात्र वांधे झाले. आधी सतत कामाचे आठ तास हेमांगीबरोबरच जोडी बनवून फिरत असलेला रुपेश आता अचानक एकटा पडल्यासारखा झाला. आम्हा इतरही ऑफिस कर्मचार्‍यांचा ग्रूप होताच आणि त्या पातळीवर तो आमच्यात कम्फर्टेबलही होताच, पण हक्काचा असा मित्र असतो तो गेल्याने त्याला गर्दीतही एकटे एकटे वाटणे साहजिकच होते. हेमांगीबरोबर फोनवरून त्याचा थोडाबहुत संवाद साधला जात असेलही पण नेहमीचे जवळ दिसणारे सवयीचे माणूस गेले होते. त्यामुळे आता नव्याने सवय होईपर्यंत निदान ऑफिसचा आठ-नऊ तासांचा वेळ त्याला खायला उठत होता.

अश्यातच हेमांगी आणि रुपेशची एका सुट्टीच्या संध्याकाळी मॉलमध्ये फिरताना अनपेक्षितपणे भेट झाली. रुपेशबरोबर त्याची गर्लफ्रेंड रुपाली होती तर हेमांगीबरोबरही तिचा नवरा हिमेश होता. अचानक दोघांचा आमनासामना झाल्याने रुपेशने आनंदाच्या भरात अनवधानाने हेमांगीला हलकेसे आलिंगन दिले (Hug केले). या आधी खरे तर ऑफिसमध्येही त्याने कधी असा प्रकार केला नव्हता ना कधी करायचा विचारही केला असावा. अगदी सहजच घडावे तसे घडले आणि लगेच तो दूरही सरला. मात्र आपण काहीतरी वेगळे केलेय, काहीतरी लिमिट क्रॉस केलेय, ते देखील हेमांगीचा नवरा तिच्याबरोबर असताना असे वाटल्याने तितक्याच पटकन तो सॉरी देखील म्हणाला. प्रसंगावधान राखत त्याच्या गर्लफ्रेंड रुपालीने, "इट्स ओके ! हो जाता है यार ..." म्हणत त्याच्या मनावरचा ताण आणि अपराधीपणाची भावना दूर सारत विषय संपवून टाकायचा प्रयत्न केला. मात्र जे व्हायचे ते घडून गेले होते. त्यानंतर तिथे आणखी काही रामायण महाभारत घडले नाही. अवघडलेल्या अवस्थेतच त्यांची ती भेट संपून दोन्ही जोड्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

पुढे जे घडले त्याला अपेक्षित म्हणावे वा दुर्दैवी वा धक्कादायक हे मी वाचकांवरच सोडतो. पण त्यानंतर दोघांची मैत्री तिथेच संपली. रुपेशच्या गर्लफ्रेंडने म्हटलेले "हो जाता है यार.." हे तेवढ्यापुरतेच नसून तिने तसेच या प्रकाराला फारसे महत्व देणे गरजेचे समजले नाही. कदाचित या आधीही रुपेशने आपल्या मैत्रीची कल्पना रोजच्या किस्स्यांकहाण्यांमधून तिला दिली असावी. मात्र हेमांगीने आपल्या नवर्‍याला ऑफिसमधील मित्राची काय किती कल्पना दिली होती हे तिलाच ठाऊक. पण तिच्या नवर्‍याला मात्र त्या दिवशीचा प्रकार पाहता त्यांची मैत्री रुचली नाही. परिणामी हेमांगीने रुपेशला तसे स्पष्टपणे सांगून त्याच्याशी संपर्क आणि मैत्रीचा संबंध कायमचा तोडून टाकला. आपल्या फेसबूकलिस्टमधूनही त्याला हटवत ब्लॉक करणे यावरून याची गंभीरता लक्षात यावी. आणि ती तशी रुपेशच्या लक्षात आल्याने त्यानेही मग आपल्या मैत्रीणीला त्रास होईल असे न वागण्याचे ठरवत स्वताहून पुन्हा येनेकेन प्रकारे कसलेही संबंध जोडण्याचे प्रयत्न पुढे रेटले नाहीत.

यापुढे रुपेशच्या आयुष्यात अजूनही मैत्रीणी येतील, मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही. रुपेशच्या गर्लफ्रेंडने कितीही "इट्स ओके ! हो जाता है यार" म्हटले असले आणि तशीच वागली असली, तरी इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली होती एवढे मात्र खरे !

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भई, कहना क्या चाहते हो?? कुणाच्या तरी आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवरून अख्ख्या समाजाचे चित्रण करण्याचा अट्टहास का असतो तेच समजत नाही!

यापुढे रुपेशच्या आयुष्यात अजूनही मैत्रीणी येतील, मात्र हेमांगीच्या आयुष्यात यापुढे कधीही पुरुष कर्मचार्‍यासोबत मैत्रीचेच काय साधे ओळखीचेही पाऊल पुढे टाकले जाणार नाही>> कशावरून? नवर्‍याने काय डाग वगैरे दिले काय तिला? अरे वो आजकी नारी है. जरा समझो. असले पारंपारिक गड्डे आता चालत नाहीत. जर तिचा निर्णय असेल तर ठीक आहे पण फोर्स करून कदापि नाही. नॉट डन.

आठवडाभर धमाल आता!>>>
सहमत बेफिजी, पॉपकॉर्न धाग्याचं पोटेंशियल वाटतय ह्या धाग्यात Happy

या पानावर या लिंक्स दिसताहेत मला !

हे पण पहा
मी काढलेल्या संस्कारभारतीच्या रांगोळ्या... अर्चना पुराणिक
मुंबईमध्ये घर भाड्याने मिळण्यासंबंधी अल्पना
आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ४ वरदा
ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग. विवेक पटाईत
विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ" बकुल

जेव्हा एखाद्या समस्येवर सुचणारे उत्तर ठोकळेबाज असते तेव्हा मग स्वताच त्या समस्येला पॉपकॉर्न कॅटेगरीत टाकायचे जेणेकरून आपल्यासारख्या इतरांनाही त्याची री ओढता येईल.. तरी असे न करणार्‍यांचे स्वागतच आहे.

असो,
नंदिनी, कोणाच्या तरी आयुष्यात एखादा प्रसंग घडतो त्याला समाजरचनाच कारणीभूत असेल तर त्यासाठी वेगळे चित्रण करायची गरज नाही.

दिनेश,
असुरक्षित वाटायचा हक्क हेमांगीच्या नवर्‍याने चोख बजावला असेही आपण म्हणू शकतो.

अमा,
एका घनिष्ट मित्राशी मैत्री कायमची तोडावी लागल्यानंतर आपण हि अपेक्षा करत आहात का?

दिनेश. | 22 August, 2014 - 16:05

या पानावर या लिंक्स दिसताहेत मला !
>>

malaa he
हे पण पहा
प्रगती म्हणजे नक्की काय? जाईजुई
सहजीवन सौ. वंदना बर्वे
विचार करून कंटाळलो ! pareshkale
विषय क्र. १ - "मोदी जिंकले ! पुढे काय ?" अतुल ठाकुर
श्श्शश्श्श...गप्प आशिष राणे

Lol Biggrin

नंदिनी, कोणाच्या तरी आयुष्यात एखादा प्रसंग घडतो त्याला समाजरचनाच कारणीभूत असेल तर त्यासाठी वेगळे चित्रण करायची गरज नाही.
>>
Lol

घनिष्ठ असलेली मैत्री अशी एका ओझरत्या मिठीमुळे आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या तथाकथीत वादळामुठे तुटत असेल तर ती मैत्री म्हणावी का?
कुणा एका मित्राच्या घरात (इथे हेमांगी) दुसर्‍या मित्रामुळे वादळ निर्माण होते आणि तो मित्र आपल्या घनिष्ठ मित्राला जाब विचारुन मैत्री संपुष्टात आणतो. यात त्या दुसर्‍या मित्राचा हकनाक बळी जात नाही का?
असो.

वाचल नाहीये मी अद्याप, पण ऋन्मेष काय हे उगाच त्या ओयेनयेस ला स्पर्धा? हे बर नव्ह. तिकडची गर्दी उगाच इकडे खेचताय.:फिदी:

हे म्हणजे असे झाले की एकीकडे दिल चाहता है आणी दुसरीकडे दिल है की मानता नही.:फिदी:

मैत्रिणीला मिठी मारणे समाजसंमत नाही... ये न्याय नही अन्याय है.. असलं काहीतरी म्हणताय की काय?

दिनेश मी पण उत्सुकतेपोटी यापानावर दिसणार्‍या इतर धाग्यांची नावं पाहिली
पहिलाच धागा तनवीर सिद्दिकींचा 'सेकंड हेन्ड' दिसतोय. Lol

बाकी चालू द्या... (फारेन्डा धन्यवाद रे, मुद्देवंचितांची चांगलीच सोय केली आहेस :फिदी:)

नंदिनी, कोणाच्या तरी आयुष्यात एखादा प्रसंग घडतो त्याला समाजरचनाच कारणीभूत असेल तर त्यासाठी वेगळे चित्रण करायची गरज नाही.>>> या वाक्याचा मज पामरास अर्थ समजावून सांगाल का?

तो जो कोण रूपेश आणि हेमांगी आहे त्याच्यामध्ये जे काय घडलं असेल नसेल त्याचं इथं येऊन इतकं चर्वितचर्वण करायची काय गरज आहे? त्यामध्ये कसली आली बोडक्याची स्त्री पुरूष समानता!!! लोकांच्या भानगडीमध्ये लक्ष खुपसायचंच आणि गॉसिपिंग करायचं.

शुभांगी,

घनिष्ठ असलेली मैत्री अशी एका ओझरत्या मिठीमुळे आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या तथाकथीत वादळामुठे तुटत असेल तर ती मैत्री म्हणावी का?
>>>>>>>
मैत्रीचे नाते जर लग्नाची गाठ तोडायला कारणीभूत होत असेल तर...
नक्कीच त्या हेमांगीला हि मैत्री तोडून आनंद झाला नसणार Sad

.
.

कुणा एका मित्राच्या घरात (इथे हेमांगी) दुसर्‍या मित्रामुळे वादळ निर्माण होते आणि तो मित्र आपल्या घनिष्ठ मित्राला जाब विचारुन मैत्री संपुष्टात आणतो. यात त्या दुसर्‍या मित्राचा हकनाक बळी जात नाही का?
>>>>>>
हो, नक्कीच दुसर्‍या मित्राचा हकनाकच बळी गेलाय. त्याबद्दलही वाईट वाटतेय. पण त्यापेक्षा जास्त वाईत हेमांगीबद्दल वाटतेय.
का यासाठी शेवटचा पॅरा वाचा.

नंदिनी,
हाच पामर जरा मराठी ग्रामर मध्ये कच्चा आहे तरी मी वेगळ्या भाषेत सांगतो.

एखागी घटना कोणाच्या आयुष्यातील वैयक्तिक असली तरी ती प्रातिनिधिक असते. कोणी एखादी हुंडाबळीची दुर्दैवी घटना इथे दिली तर आपण त्यांचा वैयक्तिक प्रश्न म्हणून सोडून देणार की आजही आपल्या समाजात हुंड्यासाठी सूनेचा जीव घेतला जातो याचा विचार करणार? तसे करणार नसू तर खरेच दुर्दैव आहे.

Pages