तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

Submitted by वैवकु on 20 August, 2014 - 11:03

हवा आनंदली थोडी विखारी गारवे गेले
तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

जसे सांगीतले मी वाट गझलेची निवडल्याचे
तसे वाटेतुनी माझ्या सुखांचे हायवे गेले

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

किनारे पश्चिमेचे बोलवत होते अश्यावेळी
न जाणे का उगवतीच्या दिशेला नाखवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले<<<

व्वा वा, सुंदर

छान

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले >>> हे शेर विशेष आवडले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले...... क्लासिक !

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले.........वा वा !

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले.......क्या बात !!

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले.........आह !!

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले.........निशःब्द !!

जियो !! खुप दिवसांनी काहितरी अस्सल वाचायला मिळाल.
धन्यवाद !!

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

व्वा. उतरून की बुडून असा एक विचार मनात आला.
शंकावून, भादवे हे वापर फार आवडले. मूढ-मूड हा शेरसुध्दा छान झालाय.
सांगीतले खटकले. तसेच उडुन माझ्या मनातुन ह्यातील सुटी टाळता येतील असे वाटते.
हवा आनंदली, खुळ्या आशेवरी सारखे वापरून वापरून चोथा झालेले शब्द-प्रयोग टाळता यायला हवे.
शुभेच्छा.

बेफीजी ,अरविंदजी ,जयदीप, नाहिदभाई, गामाजी, सुप्रियातै, समीरजी, कणखरजी सर्वांचे खूप खूप आभार

@समीरजी =वाहून असे नंतर सुचलेले पण आधीचे उतरून असेच बरोबर वाटले ते दोनही तर्‍हेने वापरता येते>> मी तुझ्या डोहात उतरून (उतरल्याने) माझे जानवे गेले ...&..तुझ्या डोहात माझे जानवे उतरून गेले (परिधान केलेले वस्त्र उतरते तसे ) <<< एकच शब्द दोन प्रकारे वापरता येतो आणि जानवे उतरणे/उतरून जाणे हा एक छान वाक्प्रचारही तयार होतो Happy

सांगीतले आणि उडुन माझ्या मनातुन बाबत सहमत बदल सुचल्यास आणि ते बदल अधिक उत्तम वाटल्यास नक्की बदल करीन

वापरून वापरून चोथा झालेले शब्द-प्रयोग <<< असहमत !!!!!
आपण असे शब्दप्रयोग वापरत नसाल म्हणून ते चावून चोथा झाल्यासारखे वाटत असतील वास्तवात ते किती मधुर आहेत हे आपण स्व्तः एकदा चघळून बघावेत अशी मी आपल्याला सुचवणी करू इच्छितो . अ‍ॅक्च्युअली ह्या गझलेची जी शब्दकळा आहे तिला ते मॅच होताहेत असे मला वाटते किंबहुना ते तसे आहेत म्हणूनच रचनेतील त्या ओळी मला हव्यातश्या मी खुलवू शकलो आहे

मुळात असे शब्दप्रयोग चावून चोथा झाले आहेत वगैरे मते आजमितीला अनेक लोक इतरांचे ऐकून / प्रभावाखाली बनवत आहेत असे मला वाटते . अश्यांनी स्व्तःच्या आधी रचनांमध्ये ते वापरून तरी पहावेत मग मते बनवावीत असे मला वाटते .

चूक भूल देणे घेणे
धन्यवाद समीरजी Happy

@समीरजी =वाहून असे नंतर सुचलेले पण आधीचे उतरून असेच बरोबर वाटले ते दोनही तर्‍हेने वापरता येते>> मी तुझ्या डोहात उतरून (उतरल्याने) माझे जानवे गेले ...&..तुझ्या डोहात माझे जानवे उतरून गेले (परिधान केलेले वस्त्र उतरते तसे ) <<< एकच शब्द दोन प्रकारे वापरता येतो आणि जानवे उतरणे/उतरून जाणे हा एक छान वाक्प्रचारही तयार होतो

आता लक्षात आले. आपले बरोबर आहे.

आपण असे शब्दप्रयोग वापरत नसाल म्हणून ते चावून चोथा झाल्यासारखे वाटत असतील वास्तवात ते किती मधुर आहेत हे आपण स्व्तः एकदा चघळून बघावेत अशी मी आपल्याला सुचवणी करू इच्छितो . अ‍ॅक्च्युअली ह्या गझलेची जी शब्दकळा आहे तिला ते मॅच होताहेत असे मला वाटते किंबहुना ते तसे आहेत म्हणूनच रचनेतील त्या ओळी मला हव्यातश्या मी खुलवू शकलो आहे

वापर मधुर असणे नसणे आवडी-निवडीवर आहे. चावून चावून चोथाचा अर्थ इतकाच की प्रचलित, वापरले गेलेले.
निम्म्या मराठी कवितात लोकांना खुळी आस असते, का कुणास ठाऊक. खरेतर लोक खुळे असतात, आस नाही (गंमतीत घ्याल). अश्या वापरांना मी शब्दांच्या कुबड्या म्हणतो, मात्रापूर्तीसाठीच्या.

मुळात असे शब्दप्रयोग चावून चोथा झाले आहेत वगैरे मते आजमितीला अनेक लोक इतरांचे ऐकून / प्रभावाखाली बनवत आहेत असे मला वाटते . अश्यांनी स्व्तःच्या आधी रचनांमध्ये ते वापरून तरी पहावेत मग मते बनवावीत असे मला वाटते .

No thanks.

समीर

अश्या वापरांना मी शब्दांच्या कुबड्या म्हणतो, मात्रापूर्तीसाठीच्या.<<<<<< आपण वाटेल ते म्हणू शकता . खरे पाहता मी माझ्या कुवतीप्रमाणे आणि माझ्या आवडीप्रमाणे गझल करून पाहिली आहे . ती आपल्याला आवडली नाही आहे इतकाच निष्कर्श मी आतापर्यंतच्या चर्चेवरून काढला आहे .

अवांतर :
१) खरेतर लोक खुळे असतात, आस नाही << असूद्यात ! ही भाषेची गणिते आहेत ती तुमच्या अय्टिआयच्या पद्धतीने सुटणार नाहीत गुरुजी Lol
.
२)No thanks.<<< इतकुस्सं करून पहा म्हटलं तर तुम्हाला जमत नाही आहे . कोल्ह्याला द्राक्षे खरीच इतकी आंबट आहेत का ? आता तुम्हाला इतकंही जमतच नसेल तर र्‍हाऊचद्यात Lol

(तृटी तुमच्याही गझलेत असू शकतीलच शोधल्यावर मला सापडतीलच बघूच Wink )

आपण वाटेल ते म्हणू शकता
थोडा बदल सुचवासा वाटतो. वाटेल ते नाही, वाटलं ते.

ती आपल्याला आवडली नाही आहे इतकाच निष्कर्श मी आतापर्यंतच्या चर्चेवरून काढला आहे .

चुकीचा निष्कर्श.
बाकी, गणिताचे आपले विधान वाचून देवपुरकरांची आठवण झाली (हा हा हा).

तृटी तुमच्याही गझलेत असू शकतीलच शोधल्यावर मला सापडतीलच बघूच
माझ्या गझलांत जास्त सुटी असतात, -हस्व-दीर्घच्या, व्याकरणाच्या, एकवचन-अनेकवचनाच्या.
तुम्ही फार सफाईदार लिहिता, थोडी-फार चांगलं होण्याची शक्यता वाटली म्हणून लिहिले.
जो कलाकार टीका गंभीरपणे घेतो त्याचा प्रोगेस होतो हे मी शिकत आलोय.
मी माझ्या गझलांवरचे प्रतिसाद अधून-मधून काळजीपूर्वक वाचतो.
क्षणिक निराशा होते टीका वाचून पण त्यावर अमल केला तर लांब पल्ल्यात फायदाच होतो

वैभव , गझल छान जमलिये.. थव्याचा शेर उच्च.

अवांतर- प्रत्येक मत / मुद्दा मनावर घेतलाच पाहिजे असे नाही. काही विचाराधीन ठेवायला हरकत नसावी. समीर यांचे प्रतिसाद संयत आणि सकारात्मक असतात असा अनुभव आहे.. आणि आपण आपले गझल लिहून मोकळे व्हावे... चांगले ते टिकणार असतेच. त्यासाठी रसीक महत्वाचा ... बाकी दुनिया झूठ है!!!

जो कलाकार टीका गंभीरपणे घेतो.......<<<<<<<
लांब पल्ल्यात फायदाच होतो..........<<<<<<<

मी मान्य करू शकेन असे मुद्दे आहेत हे . पण आपण सांगत आहात त्या आपल्या तथाकथित सीरीयसनेसला खुन्नशीचा वास येतो मला .(आपले हेतू क्लीअर वाटत नाहीत )

सरळसरळ सांगा की ही गझल जमली नाही आहे म्हणून फाटे फोडू नका
मी पुरेसा नम्र माणूस नाही आपला अपमान चुकून माकून झालाच तर मलाच वाईट वाटेल

माझी चूक झाली ती इतकीच की मी तुमच्या नंतर गझल करायला लागलो समीरजी . आपला हा सो कॉल्ड संयत पणा ह्याचा कुजका वास मी ओळखलाय

येइल एक दिवस माझाही मी सोडणार नाही व्हायचंय ते होवूद्या

मी असाच आहे बरका त्यामुळेच जगतो आहे
नाहीतर मी नसते का मरण्याचे धाडस केले

आपण समजता तितकाही दुध्खुळा नाही मी
मुद्दाम करताय तुम्ही

मी तुमचा हा सो कॉल्ड संयतपणा खपवून घेणार नाही !!!!!!!! च्यायला होवूदे खर्च

आता ह्यावर माझं डो़कं खाल तर तुमच्या सासर्‍यावर केला तसला शेर करीन मग माझा देवपूरकर होवो नाहीतर कोण व्हायचाय ते होवो !!! हाय काय नाय काय

आपल्या प्रतिसादांमागचे खोटे उमाळे खोटे आहेत त्याणा मी खरे म्हणू शकत नाही
जे खोटय ते खोटय बस्स !!

जमल्यास पुढील वेळी माझ्या गझलेबाबत खरोखर आत्मीयता जिव्हाळा वाटला तरच प्रतिसाद द्याल ! अन्यथा नाही दिला तरी चालेल
________________________________________________
बेफीजी शामजी सॉरी मी हा खोटेपणा पचवू नाही शकलो ह्यावेळीतरी

आता मला खुन्नस आलीय. तरीही सांगतो की गझल जमलीय.
तुम्ही नम्र नाही आहे हे पण माहिती आहे.
तरीही फाटे फोडत आहे. काय करता ?

मी आलो !!
तुम्हाला काय बुवा आय्टीआय वाल्यांकडून फुकटात लॅपटॉप नेट सगळं मिळालं असणार माझे इथे ५० रुपये गेलेत तुमच्या पायात . मी वसूल करणार . भेटाच तुम्ही !!

आणि स्ट्रेस काय तुम्हालाच असतो का लोकानाही असतो ....

मी पुन्हा निघालो
आता पुन्हा उद्याच येणार मी

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

वा वा व्वा ! हे जास्त आवडले . छान गझल . Happy

वाचताक्षणीच 'विशेष' वाटतील असे ट्रिकी शेर
आहेत. >> सहमत कणखरजींशी ...