लेकीच भरत काम

Submitted by सायु on 19 August, 2014 - 05:50

मैत्रीणीचा वाढदिवस, आई काय गिफ्ट देऊ ग!
मी म्हटलं आम्ही स्वताह तयार केलेली भेट वस्तु देत असु..
जस की, एखादा भरत काम केलेला रुमाल...शुभच्छा पत्र, लोकरीची फुलं, क्रोशाचा रुमाल...
तीला कल्पना आवडली..
लेकीने पहिलांदाच भरत काम केलं आहे.. खुप सफाई नाहीये... सांभाळुन घ्या... Happy

SAEE.jpgSAEE1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे सायली.:स्मित: लेकीला सतत प्रोत्साहन देत रहा, त्यातुनच ती शिकेल. मायबोली आणी इतर ठिकाणी केलेले भरतकाम पण तिला दाखव. जरुर पडल्यास क्लास पण लाव. कितवीत आहे ती?

मायबोली वरचे हे दिवाळी अन्कातले भरतकाम बघ, मिनोतीचे आहे. लेकीला सहज जमेल.:स्मित:

http://vishesh.maayboli.com/node/877

रश्मी, नलिनी, दिनेश दा, स्वाती खुप खुप धन्यवाद
रश्मी ८ वी मधे आहे ती.. कीती छान लिंक दिलीस.. खुप आभार नक्की दाखवील तीला...
हो दा, अगदी मधुमालती सारखीच दिसताय... Happy

व्वा मस्त. Happy <<करावस वाटल हेच खूप आहे ग.>>> १००

प्रोत्साहन मिळत राहिलं की खूप गोष्टी शिकून होतात.. प्रॅक्टीस ने जमत जातात.. हा स्वानुभव.. लेकीला आवड असेल तर नवीन गोष्ट बघितल्यावर एकदा करून नक्कीच सोडून देणार नाही ती.. पण महत्त्वाचं हे की तू ते तिला दाखवून देत आहेस.. आणि स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.. मीही कायम बनवून देत आले. पण मला कधी कोणतीच मैत्रिण नव्हती जी स्वतः काही बनवून द्यायची.. त्यामुळे मला आवडलं तू तिला हे प्रोत्साहन देत आहेस ते..:)

साती,देवकी , अन्जु, सोनचाफा मनापासुन आभार...
स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.++ १००%
तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप हुरुप आला आहे लेकीला...
आणि तीच्या मैत्रीणीला पण खुप आवडलं, म्हणाली की तु मला खुप स्पेशल फील करवलस...:)

मस्त केलंय लेकीने, सायली.स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.++ १०००
खूप छान ...

गिफ्टची कल्पना आणि ती अंमलात आणण्याची तुमच्या लेकीची कलाकुसर दोन्ही छान. असेच प्रोत्साहन देत जा आणि सरावाने अजुन सफाईदारपणे जमेलच.